एक्स्प्लोर

Birthday Special | क्रिकेटमध्ये फ्लॉप, राजकारणात सुपर हिट, 26 व्या वर्षी उपमुख्यमंत्री बनलेल्या तेजस्वी यादव यांची कहाणी

बिहार विधानसभा निवडणुकीचा निकाल उद्या जाहीर होणार आहे. सगळ्यांच्या नजरा तेजस्वी यादव यांच्याकडे लागल्या आहेत. क्रिकेटपटू ते बिहारचे उपमुख्यमंत्री असा प्रवास केलेला हा युवानेता आज (9 नोव्हेंबर) आपला 31 वा वाढदिवस साजरा करत आहे. तेजस्वी यादव इतिहास रचतील असा अंदाज सगळ्याच एक्झिट पोलमध्ये वर्तवला आहे. त्यामुळे बर्थ डे बॉय तेजस्वी यांना उद्या विजयाची भेट मिळणार का?

पाटणा : बिहारच्या राजकारणात सध्या सर्वाधिक चर्चेत जर कोणी असेल तर ते आहेत तेजस्वी यादव. क्रिकेटपटू ते बिहारचे उपमुख्यमंत्री असा प्रवास केलेला हा युवानेता आज (9 नोव्हेंबर) आपला 31 वा वाढदिवस साजरा करत आहे. बिहार निवडणुकीच्या बहुतांश एक्झिट पोलमध्ये महागठबंधनचे सरकार सत्ते येऊन, राजदचे नेते आणि महागठबंधनचे उमेदवार तेजस्वी यादव बिहारचे नवे मुख्यमंत्री बनू शकतील असा अंदाज वर्तवला जात आहे. एक्झिट पोलचा अंदाज खरा ठरला तर तेजस्वी यादव बिहारमध्येच नाही तर संपूर्ण देशात इतिहास रचू शकतात. तेजस्वी यादव बिहारचे मुख्यमंत्री बनले तर ते राज्याचे सर्वात तरुण मुख्यमंत्री ठरतील.

राजकारण येऊ आणि एवढ्या लवकर विक्रम बनवण्याच्या जवळ पोहोचतील याचा विचार तेजस्वी यादव यांनी कधीच केला नव्हता. पण काळाचं चक्र असं काही फिरलं की क्रिकेटच्या मैदानात चौकार-षटकार लगावणाऱ्या तेजस्वी यादव यांना बॅट आणि बॉल दूर सारुन राजकारणाच्या पीचवर नव्या इनिंगसाठी तयार व्हावं लागलं. यादरम्यान त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. परिस्थिती अशीही आली की जम बसण्याआधी त्यांची इनिंग संपतेय की काय अशी शंका आली. पण यंदाच्या निवडणुकीत तेजस्वी विरोधकांवर भारी पडत असल्याचं दिसत आहेत.

विसाव्या वर्षी क्रिकेटपटू सव्वीसाव्या वर्षी उपमुख्यमंत्री तेजस्‍वी यादव यांनी एकेकाळी क्रिकेटची करिअर म्हणून निवड केली होती. यामध्ये त्यांना कुटुंबीयांचंही पाठबळ मिळालं होतं. त्यावेळी लालू प्रसाद यादव हे क्रिकेटशी संबंधित होते. तेजस्वी यादव 20 वर्षांचे असताना म्हणजेच 2009 मध्ये त्यांनी आपल्या क्रिकेट कारकीर्दीची सुरुवात केली होती. त्या वर्षी तेजस्‍वी यादव यांचा झारखंडच्या प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये समावेश झाला होता. तेजस्वी यादव यांनी क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली खरी पण त्यांना म्हणावी कामगिरी तशी झाली नाही. तेजस्‍वी यांनी रणजीसह आयपीएलकडेही वळले. आयपीएलच्या अनेक मोसमात त्यांचा दिल्ली डेअरडेव्हिल्स संघात समावेश करण्यात आला होता. परंतु त्यांना एकाही सामन्यात खेळण्याची संधी मिळाली नाही. तेजस्‍वी संघात एक अष्टपैलू होते.

क्रिकेटमध्ये 'फ्लॉप' पण राजकारणात 'हिट' फलंदाजी किंवा गोलंदाजीमध्ये अपेक्षित कामगिरी करु न शकल्याने तेजस्वी यादव यांचं क्रिकेटपटू बनण्याचं स्वप्न अधुरं राहिलं. आपल्या छोट्याशा क्रिकेट कारकीर्दीत तेजस्वी यादव एकमेव प्रथम श्रेणी सामना, दोन 'ए' श्रेणी आणि चार ट्वण्टी-20 सामन्यात खेळले आहेत. फलंदाजीमध्ये त्यांच्या सर्वाधिक धावा 19 होत्या. तर गोलंदाजीमध्ये त्यांनी 10 षटकात केवळ एकच विकेट घेतली होती. परंतु आपल्या दोन वर्षांच्या राजकीय कारकीर्दीत तेजस्वी आतापर्यंत हिट ठरले आहेत. हेच कारण आहे की विरोधकांवर त्यांच्या टीकेचे बाण निशाण्यावर लागतात. तरुण त्यांना युथ आयकॉनच म्हणतात.

Birthday Special | क्रिकेटमध्ये फ्लॉप, राजकारणात सुपर हिट, 26 व्या वर्षी उपमुख्यमंत्री बनलेल्या तेजस्वी यादव यांची कहाणी

राजदच्या भविष्याचा चेहरा तेजस्‍वी यादव यांचा राजकीय प्रवास सात वर्षांपूर्वी सुरु झाला. पण आता ते आपल्या पक्षासाठी म्हणजेच राजदसाठी भविष्याचा चेहरा बनले आहेत. जर एक्झिट पोलचे अंदाज खरे ठरले तर ते केवळ बिहारचेच नाही तर संपूर्ण देशातील सर्वात तरुण मुख्यमंत्रीही ठरतील. तेजस्वी यादव यांनी स्वत:ची ओळख 2015 च्या बिहार विधानसभा निवडणुकीत निर्माण केली होती. 2010 मध्ये त्यांचे वडील लालू प्रसाद यादव त्यांना आपल्या सभांमध्ये सहभागी करायचे आणि लोकांना त्यांची ओळख करुन द्यायचे. परंतु 2015 च्या निवडणुकीत तेजस्‍वी यादव आपल्या पक्षाचे स्टार बनले. आपल्याच पक्षाचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या वैशाली जिल्ह्यातील राघोपुर मतदारसंघातून तेजस्वी यादव पहिल्यांदा आमदार बनले आणि त्यानंतर उपमुख्यमंत्रीपदाची माळ त्यांच्या गळ्यात पडली.

मोठ्या भावाची साथ तेजस्वी वयाने तेजप्रताप यांच्यापेक्षा लहान असले तरी लोक तेजस्वी यांनाच मोठे समजतात. त्याचं कारण म्हणजे तेजस्वी यादव यांची राजकारणातील सक्रियता. घोटाळ्याच्या आरोपांनंतरही तेजस्वी यांना मोठे बंधू तेजप्रताप यांची सातत्याने साथ मिळते. दोन्ही भाऊ सभागृहात सोबतच दिसतात. तर सोशल मीडियावरही दोघेही सक्रिय असतात.

तरुणींमध्ये तेजस्वी यादव यांची जबरस्त क्रेझ लालू प्रसाद यादव यांच्या दोन्ही मुलांमध्ये तेजस्वी धाकटे आहेत, परंत मीडियापासून सोशल मीडियापर्यंत ते कायमच आपले मोठे बंधू तेजप्रताप यांच्यापेक्षा पुढे आहेत. तेजस्वी यांनी बिहाराची धुरा सांभळण्याआधी सोशल मीडियावर आपली सक्रियता दाखवली आणि निवडणुकीच्या वेळी त्यांनी वॉर रुम बनवला. ते आपल्या फेसबुक पेजपासून ट्विटर हॅण्डलवर फारच सक्रिय असतात. तरुणाईमध्ये तेजस्वी यादव यांची क्रेझ आहेच, पण तरुणींमध्ये ते जास्त लोकप्रिय आहेत. याची प्रचिती ते बिहारचे उपमुख्यमंत्री आणि रस्ते निर्माण मंत्री असताना पाहायला मिळाली. त्यांच्या विभागाच्या हेल्पलाईन नंबरवर तक्रारी आणि सल्ल्यांपेक्षा त्यांना लग्नाचे प्रस्तावच जास्त मिळायचे. तेव्हा तेजस्वी यादव यांना जवळपास 40 हजारांपेक्षा जास्त तरुणींनी लग्नासाठी प्रस्ताव ठेवण्याचं म्हटलं जातं. पण 'माझ्या लग्नाचा निर्णय कुटुंबीयच घेतील', असं तेजस्वी यादव यांनी सांगितलं होतं.

संबंधित बातम्या

ABP-CVoter Bihar Exit Poll 2020 LIVE: बिहार विधानसभा निवडणूक | एक्झिट पोल : कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत नाही

Bihar Election Poll of Polls | एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादव यांचीच हवा, नितीश कुमारांसाठी धोक्याची घंटा Bihar Election 2020 Exit Poll Results : बिहार निवडणुकीत एनडीए-महागठबंधनमध्ये कांटे की टक्कर; कोणालाही स्पष्ट बहुमत नाही
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Crime News: दिवा लावून सात फेरे घेतले; पॉवरच्या गोळ्या घेऊन बनला हैवान, गर्लफ्रेंडचा जीव घेतल्यानंतरही थांबला नाही, मृतदेहासोबत अत्याचार केलेल्या पियूषचा खळबळजनक दावा
दिवा लावून सात फेरे घेतले; पॉवरच्या गोळ्या घेऊन बनला हैवान, गर्लफ्रेंडचा जीव घेतल्यानंतरही थांबला नाही, मृतदेहासोबत अत्याचार केलेल्या पियूषचा खळबळजनक दावा
AI समिटमध्ये जागतिक नाचक्की सुरुच! 'चायनिज रोबोटिक डॉग' आमचाच शोध म्हटलेल्या गॅलगोटियास विद्यापीठाची थेट समिटमधून हकालपट्टी; व्हिडिओ व्हायरल होताच वाद पेटला
AI समिटमध्ये जागतिक नाचक्की सुरुच! 'चायनिज रोबोटिक डॉग' आमचाच शोध म्हटलेल्या गॅलगोटियास विद्यापीठाची थेट समिटमधून हकालपट्टी; व्हिडिओ व्हायरल होताच वाद पेटला
AI Impact Summit: AI समिटमध्ये PM मोदी येणार म्हणून लॉकडाऊन केला अन् चोरट्यांकडून स्टॉलवरील AI प्रॉडक्ट अवघ्या काही मिनिटात हडप! सीईओचा डोक्याला हात, आता पोलीस म्हणतात....
AI समिटमध्ये PM मोदी येणार म्हणून लॉकडाऊन केला अन् चोरट्यांकडून स्टॉलवरील AI प्रॉडक्ट अवघ्या काही मिनिटात हडप! सीईओचा डोक्याला हात, आता पोलीस म्हणतात....
भारताचा एआयमधील तीन सुपरपॉवर देशांमध्ये समावेश असला पाहिजे, तंत्रज्ञान मानवाच्या सेवेसाठी असावं : नरेंद्र मोदी 
भारताचा एआयमधील तीन सुपरपॉवर देशांमध्ये समावेश असला पाहिजे : नरेंद्र मोदी

व्हिडीओ

Bhigwan Kidnapping Case : अपहरण झालेल्या तरुणीचा जबरदस्तीने व्हिडीओ बनवला, पडळकरांचा मोठा दावा
Bhiwandi Mahapalika भाजपने महापौरपदाचा उमेदवार बदलला,नारायण चौधरींऐवजी स्नेहा मेहुल पाटील यांना संधी
Imtiyaz Jaleel on Muslim Reservation : मुस्लिम आरक्षणावरुन रणकंदन,जलील यांचं मौलानांना थेट आव्हान
Mulund Metro Slab  : मुलुंडमधील मेट्रो स्लॅब अपघात प्रकरण, 2 कंपन्याना काळ्या यादीत टाकणार
Sanjay Raut PC : अजितदादांची 'ती' फाईल ते अमित शाहांवर निशाणा, राऊतांची स्फोटक पत्रकार परिषद

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Vijay Mallya : विजय मल्ल्यानं इंग्लंडमधील कोर्टाचं नाव घेतलं, भारतात कधी परत येणार हे सांगता येणार नाही म्हणाला, कोर्टात नवा कांगावा
भारतात कधी परत येणार हे सांगता येणार नाही, विजय मल्ल्याचा नवा कांगावा, इंग्लंडमधील कोर्टाचं नाव घेतलं
Raj Thackeray: एकनाथ शिंदेंसोबत दिलखुलास गप्प, राज ठाकरेंचं नंदनवन बंगल्यात बारीक निरीक्षण, सांगितली आठवण
एकनाथ शिंदेंसोबत दिलखुलास गप्प, राज ठाकरेंचं नंदनवन बंगल्यात बारीक निरीक्षण, सांगितली आठवण
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 फेब्रुवारी 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 फेब्रुवारी 2026 | बुधवार
भिवंडीत मोठा ट्विस्ट, भाजपचे नगरसेवक फुटले; महापौरपदावरुन राजकीय कुरघोड्या, ऐनवेळी उमेदवार बदलला
भिवंडीत मोठा ट्विस्ट, भाजपचे नगरसेवक फुटले; महापौरपदावरुन राजकीय कुरघोड्या, ऐनवेळी उमेदवार बदलला
रुग्णांच्या जीवाशी खेळ, ह्रदयविकाराची शक्यता; बीपीच्या बनावट गोळ्यांची विक्री करणाऱ्या दोघांना अटक
रुग्णांच्या जीवाशी खेळ, ह्रदयविकाराची शक्यता; बीपीच्या बनावट गोळ्यांची विक्री करणाऱ्या दोघांना अटक
Ishan Kishan: मैदानात फटके देताच अन् इशान किशनची गर्लफ्रेंड सुद्धा पहिल्यांदाच समोर येताच पाकिस्तानमध्ये गेल्या तीन दिवसांपासून भलताच सर्च ट्रेंड समोर
मैदानात फटके देताच अन् इशान किशनची गर्लफ्रेंड सुद्धा पहिल्यांदाच समोर येताच पाकिस्तानमध्ये गेल्या तीन दिवसांपासून भलताच सर्च ट्रेंड समोर
आमचे प्रेमसंबंध, जबरदस्ती नव्हे, मी मर्जीने आले, भिगवणच्या तरुणीचा VIDEO समोर, अपहरण नाट्यात ट्विस्ट!
आमचे प्रेमसंबंध, जबरदस्ती नव्हे, मी मर्जीने आले, भिगवणच्या तरुणीचा VIDEO समोर, अपहरण नाट्यात ट्विस्ट!
Gopichand Padalkar : मुलीवर जबरदस्ती करुन व्हिडिओ केला, पोलिसांना, घरच्यांना व्हिडिओ पाठवला म्हणजे त्यांचं धाडस वाढतंय, गोपीचंद पडळकरांचा आरोप
जनआक्रोश मोर्चापूर्वी मुलीचा व्हिडिओ समोर आला; मुलीवर जबरदस्ती करत व्हिडिओ तयार केला, गोपीचंद पडळकरांचा आरोप
Embed widget