Air India: टाटा समूहाची मोठी तयारी, एअर इंडियामध्ये तिन्ही विमान कंपन्यांच्या विलीनीकरणाची प्रक्रिया सुरू -रिपोर्ट
Air India: टाटा सन्सचे नियोजन यशस्वी झाल्यास, एअर इंडिया विमानसेवा क्षेत्रातील देशातील दुसऱ्या क्रमांकाची विमान कंपनी बनेल.
Air India : टाटा समूहाने (TATA Group) नुकतीच सरकारी विमान कंपनी एअर इंडिया (Air India) विकत घेतली. टाटा सन्स (TATA Sons) आता त्यांच्या उर्वरित तीन एअरलाइन्स विस्तारा (Airlines Vistara), एअर एशिया (Air Asia) आणि एअर इंडिया एक्सप्रेस एअर इंडियामध्ये विलीन करणार आहे. एका रिपोर्टनुसार, एअर इंडियामध्ये त्यांचे विलीनीकरण करण्याची प्रक्रियाही सुरू झाली आहे. टाटा सन्सचे हे नियोजन यशस्वी झाल्यास एअर इंडिया फ्लीट आणि मार्केट शेअरच्या बाबतीत देशातील दुसरी सर्वात मोठी एअरलाइन बनेल. सिंगापूर एअरलाइन्स ही टाटा समूहाची भागीदार आहे. टाटा यांनी सिंगापूर एअरलाइन्सशी याबाबत बोलणी केल्याचे समजते. इकॉनॉमिक टाईम्सच्या रिपोर्टनुसार ही बातमी समोर येतेय.
कमी किंमतीत पूर्ण सेवा देणारी विमानसेवा
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एअर इंडिया कमी किंमतीत पूर्ण सेवा देणारी विमानसेवा असेल. आठवडाभरात याबाबत अधिकृत घोषणा होऊ शकते. दोन्ही विमान कंपन्या लवकरच व्यावसायिक ऑपरेशन सुरू करू शकतात. पण एक संस्था म्हणून काम सुरू होण्यासाठी एक वर्षापेक्षा जास्त कालावधी लागू शकतो.
टाटा सिंगापूर एअरलाइन्सशी चर्चा
रिपोर्टनुसार, टाटांनी सिंगापूर एअरलाइन्सशी याबाबत चर्चा केली असून विस्तारा टाटामध्ये विलीन करण्याचे मान्य केले आहे. सिंगापूर एअरलाइन्स टाटा समूहाच्या विस्तारामध्ये भागीदार आहे आणि या विलीनीकरणानंतर, विस्तारा चालवणारी टाटा सिंगापूर एअरलाइन्स एअर इंडियामध्ये विलीन होऊ शकते.
विलीनीकरणानंतर काय होणार?
या एकत्रीकरणानंतर एअर इंडिया कमी किमतीची विमानसेवा आणि पूर्ण सेवा देणारी विमानसेवा तयार होईल. ही संपूर्ण प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी एक वर्ष लागू शकेल. विस्तारा आणि एअर इंडिया लवकरच व्यावसायिक कामकाज सुरू करू शकतात. मात्र, टाटा सन्स आणि विस्ताराने सध्या यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
सिंगापूर एअरलाइन्सची एअर इंडियामध्ये 20-25 टक्के भागीदारी
सिंगापूर एअरलाइन्सची एअर इंडियामध्ये 20-25 टक्के भागीदारी असेल. यासोबतच 'विस्तारा'च्या काही बोर्ड सदस्यांना एअर इंडियाच्या बोर्डात समाविष्ट करण्यात येणार असल्याचं बोललं जातंय. सध्या, सिंगापूर एअरलाइन्सची विस्ताराची मूळ कंपनी टाटा सिंगापूर एअरलाइन्समध्ये 49 टक्के भागीदारी आहे. टाटा सन्स आणि विस्ताराने यावर भाष्य केले नाही. विस्तारामध्ये टाटा सन्सची 51 टक्के हिस्सेदारी आहे. अलीकडेच टाटा समूहाने एअर इंडिया एक्सप्रेस आणि एअरएशिया इंडियाचे एकत्रीकरण पूर्ण केले.
इतर महत्वाच्या बातम्या