(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Tata Motors Nexon: टाटा मोटर्सच्या इलेक्ट्रिक कारला आग, सरकारने दिले चौकशीचे आदेश
Fire In Electric Car: टाटा मोटर्सच्या इलेक्ट्रिक वाहनाला आग लागल्याची घटना समोर आली आहे. ही घटना मुंबईतील आहे. जिथे टाटा मोटर्सच्या नेक्सन ( Nexon) इलेक्ट्रिक कारला आग लागली.
Fire In Electric Car: टाटा मोटर्सच्या इलेक्ट्रिक वाहनाला आग लागल्याची घटना समोर आली आहे. ही घटना मुंबईतील आहे. जिथे टाटा मोटर्सच्या नेक्सन ( Nexon) इलेक्ट्रिक कारला आग लागली. त्यानंतर सरकारने चौकशीचे आदेश दिले आहेत. डीआरडीओ (Defence Research and Development Organisation ) या आगीच्या घटनेची चौकशी करणार आहे.
कारला लागलेल्या आगीच्या घटनेबाबत टाटा मोटर्सने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, नुकत्याच झालेल्या वाहनाला लागलेल्या आगीशी संबंधित घटनेचे तथ्य शोधण्यासाठी आम्ही सखोल तपास करत आहोत. आमचा तपास पूर्ण झाल्यानंतरच आम्ही यासंदर्भात सविस्तर माहिती देऊ. आपली वाहने आणि ग्राहकांच्या सुरक्षेसाठी आम्ही वचनबद्ध असल्याचे कंपनीने म्हटले आहे. टाटाच्या इलेक्ट्रिक कारला आग लागल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे. त्यानंतर कंपनीने हे निवेदन जारी केले आहे. टाटा मोटर्सच्या म्हणण्यानुसार, आगीची ही पहिलीच घटना आहे आणि आतापर्यंत कंपनीने 30,000 हून अधिक इलेक्ट्रिक वाहने विकली आहेत, बहुतेक नेक्सन मॉडेल्स आणि या वाहनांनी 10 कोटी किलोमीटर अंतर कापले आहे.
महत्वाच्या बातम्या :