एक्स्प्लोर

एक्झिट पोल 2024

(Source:  Poll of Polls)

Udhayanidhi Stalin : 'केंद्र सरकार दक्षिण भारताला विकास केल्याची शिक्षा देतयं'; लोकसभा पुनर्रचनेवरून उदयनिधींचा हल्लाबोल

Udhayanidhi Stalin On Bjp : दक्षिण भारताचा आवाज दाबण्याचा प्रयत्न भाजपकडून होत असल्याचा दावा तमिळनाडूचे मंत्री उदयनिधी स्टॅलिन यांनी केला आहे.

मुंबई : तमिळनाडूचे मंत्री उदयनिधी स्टॅलिन (udhayanidhi stalin) यांनी 'एबीपी न्यूज'च्या 'द सदर्न रायझिंग समिट' या कार्यक्रमामध्ये बोलताना केंद्र सरकारवर निशाणा साधला. यावेळी बोलताना त्यांनी म्हटलं की, 'दक्षिण भारतात आम्ही जो विकास केला त्याची शिक्षा म्हणून आता लोकसभेत आमच्या जागा कमी करण्याचा प्रयत्न केंद्र सरकारकडून करण्यात येत आहे. तसचे दक्षिण भारताचा आवाज दाबण्याचा प्रयत्न देखील भाजपकडून होत असल्याचा दावा त्यांनी यावेळी बोलताना केला आहे.' 

 एबीपी न्यूजच्या  द सदर्न रायझिंग समिट कार्यक्रमामध्ये त्यांनी हा दावा केला आहे. एबीपी न्यूज द सदर्न रायझिंग समिट 2023 चे उद्घाटन गुरुवारी (12 ऑक्टोबर ) रोजी झाले. या समिटमध्ये व्यवसाय, राजकारण, चित्रपट, क्रीडा, विज्ञान आणि इतर क्षेत्रातील दिग्गज व्यक्ती एकाच व्यासपीठावर आले. दक्षिण भारतातील आंध्र प्रदेश, कर्नाटक, केरळ, तामिळनाडू आणि तेलंगणा या पाच राज्यांमधील प्रगती, सांस्कृतिक समृद्धी या विषयांवर या कार्यक्रमामध्ये चर्चा करण्यात येणार आहे. 

मंत्री स्टॅलिन यांचे केंद्र सरकारवर आरोप

उदयनिधी स्टॅलिन यांनी यावेळी बोलताना केंद्र सरकार हल्लाबोल केला. राज्य सरकारच्या कामांमध्ये अडथळा निर्माण करण्यासाठी केंद्र सरकार राज्यपालांना पाठवत असल्याचा आरोप देखील त्यांनी यावेळी केला आहे. पुढे बोलताना त्यांनी म्हटलं की, 'लोकसभेत दक्षिण भारताच्या जागा कमी होऊ शकतात. त्यामुळे सर्व राजकीय पक्षांनी सतर्क राहण्याची गरज आहे. लोकसभेच्या एकूण जागांची संख्या न बदलता  पुनर्रचना केली तर तमिळनाडूच्या आठ जागा कमी होऊ शकतात. सध्या लोकसभेत तमिळनाडूच्या एकूण  39 जागा आहेत. पण त्या कमी होऊन 31 होऊ शकतात. त्यामुळे दक्षिण भारताचा आवाज दाबण्याचा प्रयत्न भाजपकडून करण्यात येतोय.' 

सनातन धर्माच्या वक्तव्यावर स्टॅलिन यांचं स्पष्टीकरण

सनातन धर्मावर मंत्री उदयनिधी स्टॅलिन यांनी केलेल्या वक्तव्यावरुन राजकारण चांगलचं पेटलं. तर यावर देखील स्टॅलिन यांनी 'एबीपी न्यूज'च्या कार्यक्रमामध्ये स्पष्टीकरण दिलं. यावेळी बोलताना त्यांनी म्हटलं की, भाजपने राजकीय फायद्यासाठी माझं वक्तव्य चुकीच्या पद्धतीने मांडलं. 

' सनातन धर्म हा सामाजिक न्याय आणि समतेच्या विरोधात आहे. काही गोष्टींचा विरोध करता येत नाही. त्या संपवल्याच पाहिजे. ज्याप्रमाणे आपण डेंग्यू, मलेरिया किंवा करोनाचा विरोध करू शकत नाही. त्याला संपवलच पाहिजे. तसेच, सनातन धर्मालाही संपवायचं आहे', असं वक्तव्य उदनिधी स्टॅलिन यांनी केलं होतं. 

लोकसंख्या नियंत्रणाच्या कार्यक्रमाचा उल्लेख

तामिळनाडूचे मंत्री उदयनिधी स्टॅलिन यांनी यावेळी राज्याच्या कामगिरीविषयी देखील भाष्य केलं. त्यांनी म्हटलं की, '70 च्या दशकात केंद्र सरकारने लोकसंख्या नियंत्रण कार्यक्रमाला चालना दिली. दक्षिण भारतीय राज्यांनी त्याची प्रभावीपणे अंमलबजावणी केली. त्यामुळे दक्षिण भारतीय राज्यांच्या लोकसंख्येमध्ये घट झाली. पण त्यचाच वापर आज आपल्याविरोधात केला जात आहे.' 

हेही वाचा : 

ABP Southern Rising Summit : 'पाच राज्यांच्या निवडणुकांनंतर इंडिया आघाडी तुटणार', बीआरएसचा दावा

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

CBSE Exam Datesheet 2025: CBSE कडून दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या तारखा जाहीर, विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपली 
CBSE कडून दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या तारखा जाहीर, विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपली 
मतदान संपताच संभाजीराजेंच्या उमेदवारास अटक, भाजपसोबतचा वाद भोवला; 307 चा गंभीर गुन्हा दाखल
मतदान संपताच संभाजीराजेंच्या उमेदवारास अटक, भाजपसोबतचा वाद भोवला; 307 चा गंभीर गुन्हा दाखल
Pune Election Reaction भाग 108 : मतदानानंतर बारामतीच्या पत्रकारांचा अंदाज काय?
Pune Election Reaction भाग 108 : मतदानानंतर बारामतीच्या पत्रकारांचा अंदाज काय?
Exit Poll: महा एक्झिट पोल, महायुतीला 139 ते 156 जागा; 10 पैकी 3 संस्थांच्या सर्व्हेत महाविकास आघाडीला बहुमताचा अंदाज
महा एक्झिट पोल, महायुतीला 139 ते 156 जागा; 10 पैकी 3 संस्थांच्या सर्व्हेत महाविकास आघाडीला बहुमताचा अंदाज
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Mumbai Maharashtra Exit Poll 2024 | मुंबईत बिग फाईट, मविआला 18-19 तर महायुतीला 17-18 जागाMaharashtra Politics Rada | नेत्यांचे 'राडे' राजकीय संस्कृतीचे 'धिंडवडे' Special ReportBaramati Vidhan Sabha | विधानसभा निवडणुकीसाठी बारामतीत राजकारण आणि भावनांचा खेळ Special ReportDevendra Fadnavis : जेव्हा मतदानाचा टक्का वाढतो तेव्हा भाजपला फायदा होतो:फडणवीस ABP MAJHA

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
CBSE Exam Datesheet 2025: CBSE कडून दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या तारखा जाहीर, विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपली 
CBSE कडून दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या तारखा जाहीर, विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपली 
मतदान संपताच संभाजीराजेंच्या उमेदवारास अटक, भाजपसोबतचा वाद भोवला; 307 चा गंभीर गुन्हा दाखल
मतदान संपताच संभाजीराजेंच्या उमेदवारास अटक, भाजपसोबतचा वाद भोवला; 307 चा गंभीर गुन्हा दाखल
Pune Election Reaction भाग 108 : मतदानानंतर बारामतीच्या पत्रकारांचा अंदाज काय?
Pune Election Reaction भाग 108 : मतदानानंतर बारामतीच्या पत्रकारांचा अंदाज काय?
Exit Poll: महा एक्झिट पोल, महायुतीला 139 ते 156 जागा; 10 पैकी 3 संस्थांच्या सर्व्हेत महाविकास आघाडीला बहुमताचा अंदाज
महा एक्झिट पोल, महायुतीला 139 ते 156 जागा; 10 पैकी 3 संस्थांच्या सर्व्हेत महाविकास आघाडीला बहुमताचा अंदाज
Maharashtra Exit Polls Result 2024:  निवडणुकीत ठाकरे गटाचं काय झालं, एक्झिट पोलमध्ये उद्धव ठाकरेंना किती जागा?
मोठी बातमी: निवडणुकीत ठाकरे गटाचं काय झालं, एक्झिट पोलमध्ये उद्धव ठाकरेंना किती जागा?
Maharashtra Exit Polls Result 2024: कोकणचा गड कोण जिंकणार? कोणत्या पक्षाला किती जागा? एक्झिट पोलच्या आकड्यांनी उमेदवारांची धाकधूक वाढली
कोकणचा गड कोण जिंकणार? कोणत्या पक्षाला किती जागा? एक्झिट पोलच्या आकड्यांनी उमेदवारांची धाकधूक वाढली
Maharashtra Exit Polls Result 2024 : कोल्हापूर, सोलापूर, सांगली, सातारसह पश्चिम महाराष्ट्रात कोणाला किती जागा? एक्झिट पोलमधील आकडेवारी समोर!
कोल्हापूर, सोलापूर, सांगली, सातारसह पश्चिम महाराष्ट्रात कोणाला किती जागा? एक्झिट पोलमधील आकडेवारी समोर!
Exit Poll: मराठवाड्यात भाजपला फटका, जरांगे पॅटर्नमुळे महाविकास आघाडीचं पारडं जड; कोणाला किती जागा?
Exit Poll: मराठवाड्यात भाजपला फटका, जरांगे पॅटर्नमुळे महाविकास आघाडीचं पारडं जड; कोणाला किती जागा?
Embed widget