एक्स्प्लोर
Advertisement
तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांचं आश्वासन, शेतकऱ्यांचं आंदोलन मागे
नवी दिल्ली : कर्जमाफीसाठी दिल्लीतील जंतरमंतर मैदानावर सुरु असलेलं आंदोलन तामिळनाडूच्या शेतकऱ्यांनी मागे घेतलं आहे. तामिळनाडूचे मुख्यमंत्री ई पलानीस्वामी यांच्याकडून आश्वासन मिळाल्यानंतर शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घेतलं.
शेतकऱ्यांच्या सर्व मागण्या आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे घेऊन जाऊ, असं आश्वासन पलानीस्वामी यांनी दिलं. त्यांनी जंतरमंतरवर जाऊन शेतकऱ्यांची भेट घेतली. त्यानंतर गेल्या 41 दिवसांपासून सुरु असलेलं आंदोलन शेतकऱ्यांनी मागे घेतलं.
दुष्काळासाठी 40 हजार कोटी रुपयांचं पॅकेज, शेतकरी कर्जमाफी आणि कावेरी व्यवस्थापन मंडळाच्या मागणीसाठी शेतकऱ्यांनी दिल्लीत जाऊन आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे.
दरम्यान आपल्या मागण्या पूर्ण झाल्या नाही, तर पुन्हा एकदा आंदोलन करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे. 41 दिवसांपासून शेतकरी राष्ट्रपती भवनासमोर विरोध प्रदर्शनं करत आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement