Tamil Nadu Fire: तामिळनाडूतील फटाक्यांच्या कारखान्याला भीषण आग; 5 जणांचा होरपळून मृत्यू, 10 जणांची प्रकृती चिंताजनक
Tamil Nadu Fire: फटाक्यांच्या कारखान्यात आग कशी लागली? याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नाही. याप्रकरणी जनाथामपट्टी पोलिसांनी पुढील चौकशीला सुरुवात केलीय.
Tamil Nadu Fire: तामिळनाडूच्या शिवकाशीतील (Sivakasi) पुडुपाट्टी (Pudupatti) येथील एका फटाक्यांच्या कारखान्याला भीषण आग लागल्याची घटना शनिवारी घडलीय. या आगीत 5 जणांचा होरपळून मृत्यू झालाय. तर, 10 जणांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर आलीय. दरम्यान, मृतांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आलंय. फटाक्यांच्या कारखान्यात आग कशी लागली? याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नाही. याप्रकरणी जनाथामपट्टी पोलिसांनी पुढील चौकशीला सुरुवात केलीय.
मिळालेल्या माहितीनुसार, केमिकल युनिटमध्ये स्फोट झाल्यानंतर ही आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर आलीय. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊ बचावकार्य सुरू केलं. शिवकाशी अग्निशमन केंद्राचे अधिकारी केपी बालमुरुगन यांनी सांगितले की, ढिगाऱ्यातून आतापर्यंत तीन जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. तर, दोन जणांचा रुग्णालयात मृत्यू झाल्याची सांगण्यात आलंय. याशिवाय, अनेकांचा शोध सुरू आहे.
या आगीत गंभीर जखमी झालेल्या दहा जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आग इतकी भीषण होती की आग विझवण्यासाठी शिवकाशी आणि वथारियारप्पू येथील अग्निशमन दलाच्या 20 गाड्या घटनास्थळी पाठवण्यात आल्या. शर्थीच्या प्रयत्नानंतरआगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आलंय. या आगीमुळं स्टोअर रुमचं पूर्णपणे नुकसान झाल्याचं समजतंय. याप्रकरणी जनथमपट्टी पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढील तपासाला सुरुवात केलीय.
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha
- Vaishno Devi Stampede: वैष्णोदेवी यात्रा पुन्हा सुरु; चेंगराचेंगरी दुर्घटनेप्रकरणी चौकशी समिती, 13 जणांचा मृत्यू
- Vaishno Devi Stampede: वैष्णोदेवीत चेंगराचेंगरीनंतर यात्रा स्थगित; हेल्पलाईन नंबर जारी, मृतांच्या नातेवाईकांना मदतीची घोषणा
- Vaishno Devi Bhawan Updates: वैष्णोदेवी मंदिर परिसरात चेंगराचेंगरी, आतापर्यंत दोन महिलांसह 12 भाविकांचा मृत्यू