Vaishno Devi Stampede: वैष्णोदेवी यात्रा पुन्हा सुरु; चेंगराचेंगरी दुर्घटनेप्रकरणी चौकशी समिती, 13 जणांचा मृत्यू
Stampede at Mata Vaishno Devi Bhawan: वैष्णोदेवी मंदिर परिसरात झालेल्या चेंगराचेंगरी दुर्घटनेनंतर चौकशी समिती गठित करण्यात आली आहे. कोरोना काळात एवढी गर्दी कशी जमली? असे सवाल उपस्थित केले जात आहेत.
Stampede at Mata Vaishno Devi Bhawan: जम्मूच्या कटरा (Jammu Katara)मधील वैष्णो देवी मंदिर परिसरात रात्री 2 वाजताच्या सुमाराम चेंगराचेंगरी झाली. या चेंगराचेंगरीत 13 लोकांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेत अनेक जण जखमी झाले आहेत. नवीन वर्षाच्या निमित्तानं इथं दर्शनासाठी मोठ्या प्रमाणावर भाविकांनी गर्दी केली होती. या घटनेनंतर आता जम्मू काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनी चौकशी समिती गठित केली आहे.
या दुर्घटनेनंतर प्रशासनावर अनेक सवाल उपस्थित केले जाऊ लागले आहेत. कोरोना काळात एवढी गर्दी कशी झाली? गर्दी झाली तर सुरक्षेची व्यवस्था का नव्हती? असे प्रश्न उपस्थित केले जाऊ लागलेत. आता घटनेनंतर प्रशासनाला जाग आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उपराज्यपाल मनोज सिन्हा या घटनेवर लक्ष ठेवून आहेत. सोबतच घटनेतील मृतांच्या परिवारांना पंतप्रधान मदत निधि आणि राज्य सरकारकडून मदतीची घोषणा करण्यात आली आहे.
पंतप्रधान मदत निधितून मदत
मृतांच्या नातेवाईकांसाठी- 2 लाख रुपये
जखमींना उपचारासाठी - 50 हजार रुपये
राज्य सरकारकडून मदत
मृतांच्या नातेवाईकांसाठी- 10 लाख रुपये
जखमींना उपचारासाठी - 2 लाख रुपये
रात्रीच्या सुमारास अचानक गोंधळ झाल्यानं चेंगराचेंगरी
नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी वैष्णो देवी मंदिरात भाविकांची गर्दी झाली होती. रात्रीच्या सुमारास अचानक गोंधळ झाल्यानं चेंगराचेंगरी झाली. पंतप्रधान मोदी यांनी या चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेबाबत शोक व्यक्त केला आहे. सरकारकडून दुर्घटनेत मृत पावलेल्या भाविकांच्या नातेवाईकांना दोन लाख रुपये प्रत्येकी तर जखमींना 50 हजार रुपयांची मदत घोषित केली आहे. शिवाय मदतीसाठी हेल्पलाईन नंबर देखील जारी करण्यात आला आहे.
स्थानिक अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार या दुर्घटनेत अनेकजण जखमी झाल्याची माहिती आहे. जखमी भाविकांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून बचावकार्य सरु आहे. जखमींना नारायण रुग्णालयात नेण्यात येत असून, एकूण जखमींच्या संख्येबाबत अधिक माहिती स्पष्ट झाली नाही. माता वैष्णोदेवी मंदिर परिसरात अचानकपणे झालेल्या या चेंगराचेंगरीचे नेमके कारण समजू शकलेले नाही.
हेल्पलाईन नंबर जारी
पीएम मोदींकडून शोक व्यक्त
पंतप्रधान मोदी यांनी या चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेबाबत शोक व्यक्त केला आहे. त्यांनी ट्वीट करत म्हटलं आहे की, माता वैष्णो देवी भवनातील चेंगराचेंगरीत झालेल्या मृत्यूंमुळं दु:खी आहे. सर्व मृतांना श्रद्धांजली अर्पण करतो. जम्मू-काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा,केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह आणि गृह राज्य मंत्री नित्यानंद राय यांच्याशी चर्चा केली आहे.
Extremely saddened by the loss of lives due to a stampede at Mata Vaishno Devi Bhawan. Condolences to the bereaved families. May the injured recover soon. Spoke to JK LG Shri @manojsinha_ Ji, Ministers Shri @DrJitendraSingh Ji, @nityanandraibjp Ji and took stock of the situation.
— Narendra Modi (@narendramodi) January 1, 2022
माता वैष्णोदेवी येथील दुर्घटनेमुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मी ताबडतोब कटरा येथे जात आहे. मी प्रशासनाशी सविस्तर चर्चा करण्यार आहे आणि पंतप्रधान मोदी यांना परत रिपोर्ट देणार आहे, असं केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी म्हटलं आहे.
I’m immediately rushing to #Katra to take stock of the situation arising out of the tragedy at Mata #VaishnoDevi Shrine. I look forward to have a detailed discussion with the administration and report it back to Hon’ble PM Sh @NarendraModi.
— Dr Jitendra Singh (@DrJitendraSingh) January 1, 2022
जम्मू (Jammu) मधील कटरा (Katra) येथील वैष्णोदेवी मंदिरामध्ये रात्री झालेल्या चेंगराचेंगरीत 12 भाविकांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक जण जखमी झाले आहेत. जखमींवर नारायणा हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी वैष्णो देवी मंदिरात भाविकांची गर्दी झाली होती. रात्रीच्या सुमारास अचानक गोंधळ झाल्यानं चेंगराचेंगरी झाली. पंतप्रधान मोदी यांनी या चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेबाबत शोक व्यक्त केला आहे. सरकारकडून दुर्घटनेत मृत पावलेल्या भाविकांच्या नातेवाईकांना दोन लाख रुपये प्रत्येकी तर जखमींना 50 हजार रुपयांची मदत घोषित केली आहे. शिवाय मदतीसाठी हेल्पलाईन नंबर देखील जारी करण्यात आला आहे.
स्थानिक अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार या दुर्घटनेत अनेकजण जखमी झाल्याची माहिती आहे. जखमी भाविकांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून बचावकार्य सरु आहे. जखमींना नारायण रुग्णालयात नेण्यात येत असून, एकूण जखमींच्या संख्येबाबत अधिक माहिती स्पष्ट झाली नाही. माता वैष्णोदेवी मंदिर परिसरात अचानकपणे झालेल्या या चेंगराचेंगरीचे नेमके कारण समजू शकलेले नाही.
हेल्पलाईन नंबर जारी
पीएम मोदींकडून शोक व्यक्त
पंतप्रधान मोदी यांनी या चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेबाबत शोक व्यक्त केला आहे. त्यांनी ट्वीट करत म्हटलं आहे की, माता वैष्णो देवी भवनातील चेंगराचेंगरीत झालेल्या मृत्यूंमुळं दु:खी आहे. सर्व मृतांना श्रद्धांजली अर्पण करतो. जम्मू-काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा,केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह आणि गृह राज्य मंत्री नित्यानंद राय यांच्याशी चर्चा केली आहे.
Extremely saddened by the loss of lives due to a stampede at Mata Vaishno Devi Bhawan. Condolences to the bereaved families. May the injured recover soon. Spoke to JK LG Shri @manojsinha_ Ji, Ministers Shri @DrJitendraSingh Ji, @nityanandraibjp Ji and took stock of the situation.
— Narendra Modi (@narendramodi) January 1, 2022
माता वैष्णोदेवी येथील दुर्घटनेमुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मी ताबडतोब कटरा येथे जात आहे. मी प्रशासनाशी सविस्तर चर्चा करण्यार आहे आणि पंतप्रधान मोदी यांना परत रिपोर्ट देणार आहे, असं केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी म्हटलं आहे.
I’m immediately rushing to #Katra to take stock of the situation arising out of the tragedy at Mata #VaishnoDevi Shrine. I look forward to have a detailed discussion with the administration and report it back to Hon’ble PM Sh @NarendraModi.
— Dr Jitendra Singh (@DrJitendraSingh) January 1, 2022
इतर महत्वाच्या बातम्या
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha