एक्स्प्लोर
20 हजारांवरील देणगीची माहिती आयकर विभागाला द्यावी लागणार!
नवी दिल्ली : दान म्हणून 20 हजार किंवा त्यापेक्षा अधिक रक्कम रोखीने मिळाल्यास त्याची माहिती आयकर विभागाला द्यावी लागणार आहे. आयकर विभागाच्या नव्या नियमानुसार दान देणाऱ्या व्यक्तीचीही 'पॅन'सह माहिती द्यावी लागणार आहे.
नोटाबंदीनंतर 18 लाख खातेधारक असे आढळून आले आहेत, ज्यांनी बँकेत जमा केलेली रक्कम ते भरत असलेल्या कराशी मिळतीजुळती नाही. या खातेधारकांना नोटीस मिळाल्यानंतर 10 दिवसात उत्तर द्यावं लागणार आहे. याचाच भाग म्हणून आयकर विभागाने हा नवा नियम काढला आहे.
8 नोव्हेंबर ते 30 डिसेंबर 2016 या काळात अनेक खातेधारकांनी बँकेत 2 लाखांपेक्षा आणि पाच लाखांपेक्षा अधिक पैसे जमा केले आहेत. मात्र त्यांनी त्यांच्या कमाईच्या तुलनेत तेवढा कर भरला नसल्याचं आयकर विभागाच्या निदर्शनास आलं आहे. आयकर विभागाने या सर्व 18 लाख खातेधारकांना नोटीस पाठवली असून त्यांच्या आयकर प्रोफाईलनुसार पुढील कारवाई केली जाणार आहे
आयकर विभागाच्या नियमानुसार सध्या 50 हजार किंवा त्यापेक्षा अधिक देणगी मिळाल्यास कर द्यावा लागतो. मात्र नव्या नियमानुसार आता ही मर्यादा 20 हजार रुपये करण्यात आली आहे.
संबंधित बातमी : मर्यादेपेक्षा जास्त रक्कम जमा, 18 लाख करदात्यांची चौकशी होणार
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement