Taj Mahal case : ताजमहाल की तेजो महालय? नेमका वाद कशावरून? डॉ. विद्याधर ओक सांगतात...
Dr. Vidyadhar Oak : न्यायालयात सध्या ताजमहलातील 20 खोल्या उघडण्याची मागणी करण्यात आली आहे. याबाबत डॉ. ओक सांगतात की, ताजमहलात 20 खोल्याच नाहीत तर तेथे फक्त 14 खोल्या आहेत आणि या खोल्या फक्त तेथे राजवाडा होता एवढेच सिद्ध करतात.
Taj Mahal case in High Court : आग्रा येथील ताजमहलातील 20 खोल्या उघडण्याची मागणी सध्या न्यायालयात करण्यात आली आहे. परंतु, न्यायालयाने यावरून याचिकर्त्याला फटकारलं असून जनहित याचिकेचा गैरवार करू नका असे देखील न्यायालयाने म्हटले आहे. याबरोबरच ताजमहल की तेजोमहालय असा प्रश्न देखील सध्या उपस्थित होत आहे. यावर ताजमहलाचे अभ्यासक डॉ. विद्याधर ओक ( Dr. Vidyadhar Oak) यांनी 'एबपी माझा'सोबत (Abp Majha) संवाद शाधला असून त्यांनी याबाबत सविस्तर माहिती सांगितली आहे.
डॉ. विद्याधर ओक यांचं ताजमहलाच्या अभ्यासावर एक पुस्तक (Taj Mahal: Facts, Fiction and An Unbelievable Discovery) आहे. 2008 पासून त्यांनी ताजमहलाचा अभ्यास सूरू केला. 2014 ला त्यांनी यावर एक नाटक देखील लिहलं आहे. त्यानंतर त्यांनी ताजमहलावर सहाशे पानांचं पुस्तक लिहिलं आहे.
न्यायालयात सध्या ताजमहलातील 20 खोल्या उघडण्याची मागणी करण्यात आली आहे. याबाबत डॉ. ओक सांगतात की, ताजमहलात 20 खोल्याच नाहीत तर तेथे फक्त 14 खोल्या आहेत आणि खोल्या फक्त तेथे राजवाडा होता एवढेच सिद्ध करतात.
डॉ. विद्याधर ओक म्हणाले, "ताजमहलात फक्त 14 खोल्या आहेत. यातील सात खोल्यांमध्ये राजवाडा होता. काही लोकांचं मत आहे की, तेथे मुर्त्या आहेत, त्यामुळे त्या खोल्या उघडण्यात याव्यात अशी मागणी करण्यात येत आहे. परंतु, डॉ. ओक यांच्या मते जर तेथे मुर्त्या असता तर शहाजन याने त्या मुर्त्या त्यावेळी कोठे ठेवल्या? याची आता माहिती कशी मिळेल. या खोल्या फक्त तेथे राजवाडा होता हिच ओळख सांगतात.
ताजमहलाच्या जागी आधी काय होतं याची अद्याप कोणालाचं माहिती उपलब्ध झालेली नव्हती. परंतु, आता त्याचा पुरावा सापडल्याचे डॉ. ओक सांगतात. 1967 मध्ये पु. ना. ओक यांनी असं दाखलवलं आहे की, शहाजान याने राजा जयसिंग याचा महाल घेतला आणि त्यामध्ये राणी मुमताज हिची कबर बांधण्यात आली. त्यानंतर 2014 ला आनंद दाभक यांनी अमेरिकेत ट्रान्सलेट करून घेतलं. त्यामध्येही हेच सिद्ध झालं की ताजमहाआधी तेथे राजा जयसिंगाचा महाल होता. "शहजान याने त्याचा सरकारी इतिहासकार अब्दुल हमीद लाहौरी याच्याकडून आपलं आत्मचरित्र लिहून घेतलं आहे. शहाजान याच्या आत्मचरित्रात असा उल्लेख आहे की, ताजमहलाआधी तेथे वेगळ्या प्रकारचं प्रार्थना स्थळ होतं. त्याआधी तेथे राजा मासिंगाचा पॅलेस होता. तो आता राजा जयसिंगाच्या ताब्यात आहे. तेथे राणीची कबर बांधण्यासाठी ही जागा निवडण्यात आली अशी माहिती शहाजान याने आपल्या आत्मचरित्रात लिहून ठेवली आहे, अशी माहिती डॉ. ओक यांनी दिली.
शहाजान याच्या माहितीवर डॉ. ओक यांनी प्रश्न उपस्थि केला आहे. शहजान याने राणीच्या मृत्यूनंतर सहा महिन्यानंतर कबरीसाठी हे ठिकाण निवडले आणि तेथे ताजमहल बांधला. परंतु, केवळ सहा महिन्यात एवढ्या मोठ्या इमारतीचे बांधकाम कसे होईल, असा प्रश्न ओक यांनी उपस्थित केला आहे. कारण राणी मुमताजचं बुऱ्हानपूरमध्ये निधन झालं. त्यानंतर सहा महिन्यांनी तिला मानसिंग महालात (ताजमहलाच्या ठिकाणी आधी हा मानसिंग महाल तेथे होता) ठेवलं.
महत्वाच्या बातम्या