एक्स्प्लोर

Taj Mahal News : ताज महालावर जप्ती येणार? प्रशासनाच्या नोटीसनं खळबळ, नेमकं प्रकरण काय?

Taj Mahal Tax News: आग्रा महानगरपालिकेनं ताज महालासाठी पाठवलेल्या थकबाकीच्या नोटीसमध्ये म्हटलंय की, 15 दिवसांत कर जमा न केल्यास ताज महाल जप्त केला जाईल.

Taj Mahal asked to Pay Property Tax : जगातील आश्चर्यांपैकी एक असलेला ताज महाल (Taj Mahal) पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. पण यावेळी कारण आहे ते कर थकबाकीचं. ताज महालाला कर थकबाकीची नोटीस मिळाली आहे. जागतिक वारसा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या वास्तूला पाणी (Water tax Taj Mahal) आणि मालमत्ता कराच्या (Property Tax of Taj Mahal) नोटिसा पाठवण्यात आल्या आहेत. एएसआयचे अधीक्षक पुरातत्वशास्त्रज्ञ (आग्रा सर्कल) राज कुमार पटेल यांनी ही माहिती दिली आहे. वृत्तसंस्था एएनआयच्या बातमीनुसार, पाण्याशी संबंधित कर (Water tax Taj Mahal News) सुमारे 1 कोटी रुपये आहे आणि मालमत्तेशी संबंधित कर (Property Tax of Taj Mahal) 1.40 लाख रुपये आहे. ही थकबाकी 2021-22 आणि 2022-23 या आर्थिक वर्षाची आहे.

15 दिवसांची नोटीस, अन्यथा ताज महाल जप्त होणार 

मीडिया रिपोर्टनुसार, आग्रा महानगरपालिकेनं (Agra Municipal Corporation)  ताज महालसाठी (Taj Mahal) पाठवलेल्या थकबाकीच्या नोटीसमध्ये म्हटलं आहे की, जर 15 दिवसांत थकीत कर जमा केला नाही तर ताज महाल जप्त केला जाईल. भारतीय पुरातत्व सर्वेक्षणाचे एएसआय राज कुमार पटेल (ASI) म्हणतात की, स्मारकांवर मालमत्ता कर (Property Tax) लागू होत नाही. ताज महालाचा कोणताही व्यावसायिक वापर नसल्यामुळे पाण्यावर कर भरण्यास आम्ही जबाबदार नाही. हिरवळ टिकवून ठेवण्याच्या उद्देशानं येथे पाण्याचा वापर केला जातो.

दरम्यान, ताज महालासाठी पहिल्यांदाच अशी नोटीस (Taj Mahal Tax Arrears) आली आहे. ASI अधिकाऱ्यांनी सांगितलं की, ताज महालाला 1920 मध्ये संरक्षित स्मारक घोषित करण्यात आलं होतं आणि ब्रिटिश राजवटीतही या स्मारकावर कोणताही कर किंवा पाणी कर लावला गेला नव्हता.

संगमरवरी ताज महालाचा इतिहास 

जगातील सात आश्चर्यापैकी ताज महाल एक समजला जातो. पांढऱ्या शुभ्र संगमरवरानं बांधलेली यमुनेच्या किनाऱ्यावर वसलेली ही वास्तू पाहताच क्षणी मनात घर करते. देश-विदेशातून अनेक पर्यटक ताज महालाचं सौंदर्य पाहण्यासाठी येत असतात. ताज महालाला प्रेमाचं प्रतिक मानलं जातं. मुघल बादशाह शाहजहान यांचं आपली पत्नी मुमताजवर प्रेम होतं. तिच्या निधनानंतर तिची आठवण म्हणून शाहजहान यांनी ताज महाल बांधला. ही संगमरवरी इमारत उभारण्यास तब्बल 21 वर्षांचा अवधी लागला होता. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Air Hostess : एअर होस्टेसची नोकरी किती वर्ष असते? किती वय झालं की निवृत्त व्हावं लागतं? पगार किती मिळतो?
एअर होस्टेसची नोकरी किती वर्ष असते? किती वय झालं की निवृत्त व्हावं लागतं? पगार किती मिळतो?
कौटुंबिक वादातून आईची दोन चिमुकल्यासह विहिरीत उडी, तिघांचा मृत्यू; माहेरच्या लोकांनी हंबरडा फोडला
कौटुंबिक वादातून आईची दोन चिमुकल्यासह विहिरीत उडी, तिघांचा मृत्यू; माहेरच्या लोकांनी हंबरडा फोडला
मुंबई महापालिकेत भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली निलंबित 96 अधिकाऱ्यांची पुनर्बहाली; RTI मधून उघड
मुंबई महापालिकेत भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली निलंबित 96 अधिकाऱ्यांची पुनर्बहाली; RTI मधून उघड
Numerology : अतिशय फटकळ असतात 'या' जन्मतारखेचे लोक; जे मनात, तेच तोंडावर... समोरच्या व्यक्तीच्या भावनांचाही करत नाहीत विचार
अतिशय फटकळ असतात 'या' जन्मतारखेचे लोक; जे मनात, तेच तोंडावर... समोरच्या व्यक्तीच्या भावनांचाही करत नाहीत विचार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 09 PM: 29 Sept 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सVare Nivadnukiche Superfast News 08 PM: लोकसभा निवडणुकीच्या बातम्या: वारे निवडणुकीचे : 29 Sept 2024Uddhav Thackeray Full Speech Nagpur : फडणवीसांच्या होमग्राऊंडवर शिंदे, शाहांवर हल्ला, ठाकरे  UNCUTMahayuti Meeting : महायुतीच्या जागावाटपासंदर्भात वर्षा निवासस्थानी साडेचार तास बैठक

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Air Hostess : एअर होस्टेसची नोकरी किती वर्ष असते? किती वय झालं की निवृत्त व्हावं लागतं? पगार किती मिळतो?
एअर होस्टेसची नोकरी किती वर्ष असते? किती वय झालं की निवृत्त व्हावं लागतं? पगार किती मिळतो?
कौटुंबिक वादातून आईची दोन चिमुकल्यासह विहिरीत उडी, तिघांचा मृत्यू; माहेरच्या लोकांनी हंबरडा फोडला
कौटुंबिक वादातून आईची दोन चिमुकल्यासह विहिरीत उडी, तिघांचा मृत्यू; माहेरच्या लोकांनी हंबरडा फोडला
मुंबई महापालिकेत भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली निलंबित 96 अधिकाऱ्यांची पुनर्बहाली; RTI मधून उघड
मुंबई महापालिकेत भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली निलंबित 96 अधिकाऱ्यांची पुनर्बहाली; RTI मधून उघड
Numerology : अतिशय फटकळ असतात 'या' जन्मतारखेचे लोक; जे मनात, तेच तोंडावर... समोरच्या व्यक्तीच्या भावनांचाही करत नाहीत विचार
अतिशय फटकळ असतात 'या' जन्मतारखेचे लोक; जे मनात, तेच तोंडावर... समोरच्या व्यक्तीच्या भावनांचाही करत नाहीत विचार
Video:  बाप रे बाप, रोहिणी खडसेंच्या हाती माईकऐवजी साप; व्हिडिओ व्हायरल
Video: बाप रे बाप, रोहिणी खडसेंच्या हाती माईकऐवजी साप; व्हिडिओ व्हायरल
आनंद दिघेंना कुणी मारलं, का मारलं हे आजही गूढ; आता संजय निरुपमांचा सवाल
आनंद दिघेंना कुणी मारलं, का मारलं हे आजही गूढ; आता संजय निरुपमांचा सवाल
Pitru Paksha 2024 : पितृ पक्ष संपताच वाढणार 'या' 3 राशींच्या अडचणी; नोकरीत विरोधक देणार त्रास, आर्थिक संकटही बळावणार
पितृ पक्ष संपताच वाढणार 'या' 3 राशींच्या अडचणी; नोकरीत विरोधक देणार त्रास, आर्थिक संकटही बळावणार
धुरळा... सणासुदीसाठी Paytm च्या ट्रॅव्‍हल कार्निवलची घोषणा; बस व रेल्‍वे तिकिटांवर 25 टक्‍के सूट
धुरळा... सणासुदीसाठी Paytm च्या ट्रॅव्‍हल कार्निवलची घोषणा; बस व रेल्‍वे तिकिटांवर 25 टक्‍के सूट
Embed widget