एक्स्प्लोर

'अतिथी देवो भव'ला गालबोट, फतेहपूर सिक्रीत स्विस जोडप्याला मारहाण

फहेतपूर सिक्रीमध्ये या जोडप्याला स्थानिक तरुणांनी दगड आणि काठ्यांनी मारहाण केली.

आग्रा : भारत सरकारच्या 'अतिथी देवो भव' अभियानाला उत्तर प्रदेशातील फतेहपूर सिक्री शहरात गालबोट लागलं आहे. भारतात फिरण्यासाठी आलेल्या स्विस जोडप्यासोबत एक अशी घटना घडलीय, ज्याची त्यांनी कधी कल्पनाही केली नसेल. फहेतपूर सिक्रीमध्ये या जोडप्याला स्थानिक तरुणांनी दगड आणि काठ्यांनी मारहाण केली. स्वित्झर्लंडच्या लुजानेमध्ये राहणाऱ्या या जोडप्यावर हल्ला झाला. रक्ताने माखलेले हे परदेशी पर्यटक रस्त्यावर पडले होते आणि येणारे-जाणारे व्हिडीओ बनवण्यात व्यस्त होते. काय आहे प्रकरण? क्यून्टिन जेरमी क्लार्क गर्लफ्रेण्ड मेरी द्रोजसोबत मागील महिन्यात 30 सप्टेंबरला भारतात आला होता. रविवारी फतेहपूर सिक्री रेल्वे स्टेशनजवळ फिरत असताना, तरुणांच्या टोळक्याने त्यांचा पाठलाग सुरु केला. "सुरुवातीला त्याने काहीतरी कमेंट केली, जी आम्हाला समजली नाही. त्यानंतर आमच्यासोबत सेल्फी घेण्यासाठी त्यांनी आम्हाला जबरदस्तीने रोखलं," असं क्लार्कने सांगितलं. यानंतर टोळक्याने दोघांवर हल्ला केला. पाठलाग करणाऱ्या तरुणांनी क्लार्कचं डोकं फोडलं. हल्ल्यात त्याच्या गर्लफ्रेण्डलाही गंभीर दुखापत झाली आहे. "आम्ही रक्ताने माखलेले तसेच रस्त्यावर पडलो होतो आणि तिथून जाणारे-येणारे लोक उपचार करण्याऐवजी मोबाईलमध्ये व्हिडीओ बनवत होते," अशी प्रतिक्रिया क्लार्कने दिली. अतिथी देवो भव'ला गालबोट, फतेहपूर सिक्रीत स्विस जोडप्याला मारहाण दगड-काठ्यांनी मारहाण "आमच्या विरोधानंतरही तरुणांनी पाठलाग करणं थांबवलं नाही. संपूर्ण रस्त्यात ते आमचे फोटो घेत होते आणि मेरीच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत होते. जेवढं आम्हाला समजलं त्यानुसार, टोळक्याला आमचं नाव आणि आमच्या देशाबद्दल जाणून घ्यायचं होतं. त्यांना आम्हाला दुसऱ्या ठिकाणी न्यायचं होतं, पण आम्ही नकार दिला. यानंतर त्यांनी दगड आणि काठ्यांनी हल्ला केला. मला वाचवण्यासाठी मेरी आड आली तर त्यांनी तिलाही मारलं," असं क्लार्कने सांगितलं. क्लार्कच्या श्रवणशक्तीवर परिणाम : डॉक्टर क्यून्टिन जेरमी क्लार्क आणि मेरी द्रोजवर दिल्लीतील अपोलो रुग्णालयात उपचार सुरु आहे. क्लार्कला आता एका कानाने कमी ऐकायला येतं, असं त्याच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितलं. परराष्ट्र मंत्री संतापल्या, राज्य सरकारकडून उत्तर मागितलं दरम्यान, परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी परदेशी पर्यटकांना झालेल्या मारहाणीचा तीव्र निषेध केला आहे. तसंच राज्य सरकारकडून या प्रकरणी उत्तर मागितलं आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे अधिकारी रुग्णालयात जाऊन स्विस पर्यटकांची भेट घेणार आहेत. पोलिसांनी या प्रकरणी आग्रा पोलिस स्टेशनमध्ये चार अज्ञातांवर गुन्हा दाखल एका आरोपीला अटक केली आहे. https://twitter.com/SushmaSwaraj/status/923397853463986176 पाहा व्हिडीओ
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Cabinet Expansion: मंत्रिमंडळातून डच्चू मिळण्याच्या चर्चांमुळे शिवसेनेचे संजय राठोड अस्वस्थ, म्हणाले, 'नापास' शब्द जिव्हारी लागतो, कृपया...
मंत्रिमंडळातून डच्चू मिळण्याच्या चर्चांमुळे शिवसेनेचे संजय राठोड अस्वस्थ, म्हणाले, 'नापास' शब्द जिव्हारी लागतो, कृपया...
Valmik Karad : पवनऊर्जा कंपनीला 2 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, वाल्मिक कराड, विष्णू चाटे, सुदर्शन घुलेवर गुन्हा दाखल
वाल्मिक कराड, विष्णू चाटे अन् सुदर्शन घुलेवर गुन्हा नोंद, खंडणी प्रकरणी पवनऊर्जा कंपनीच्या अधिकाऱ्याची तक्रार
Anganwadi Yatra Sindhudurg : आंगणेवाडीच्या भराडी देवीने कौल दिला, जत्रेची तारीख ठरली; फेब्रुवारीच्या तिसऱ्या आठवड्यात जत्रेला सुरुवात
आंगणेवाडीतील भराडी देवीच्या जत्रेची तारीख ठरली; फेब्रुवारीच्या तिसऱ्या आठवड्यात जत्रेला सुरुवात
Kurla Bus Accident: बेस्टचालक संजय मोरेचा पोलीस चौकशीत मोठा गौप्यस्फोट, सातत्याने एकच गोष्ट सांगत राहिला....
बेस्टचालक संजय मोरेचा पोलीस चौकशीत मोठा गौप्यस्फोट, सातत्याने एकच गोष्ट सांगत राहिला...
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sanjay Rathod on Fake Report Card : मी नापास होऊच शकत नाही; जनतेसाठीच काम केलंPlaces of worship hearing in SC : हिंदू संघटनांकडूनच प्रार्थनास्थळ कायद्याला आव्हानMajha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा: 8 AM : 12 डिसेंबर 2024 : ABP MajhaTOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज : 12  डिसेंबर 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Cabinet Expansion: मंत्रिमंडळातून डच्चू मिळण्याच्या चर्चांमुळे शिवसेनेचे संजय राठोड अस्वस्थ, म्हणाले, 'नापास' शब्द जिव्हारी लागतो, कृपया...
मंत्रिमंडळातून डच्चू मिळण्याच्या चर्चांमुळे शिवसेनेचे संजय राठोड अस्वस्थ, म्हणाले, 'नापास' शब्द जिव्हारी लागतो, कृपया...
Valmik Karad : पवनऊर्जा कंपनीला 2 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, वाल्मिक कराड, विष्णू चाटे, सुदर्शन घुलेवर गुन्हा दाखल
वाल्मिक कराड, विष्णू चाटे अन् सुदर्शन घुलेवर गुन्हा नोंद, खंडणी प्रकरणी पवनऊर्जा कंपनीच्या अधिकाऱ्याची तक्रार
Anganwadi Yatra Sindhudurg : आंगणेवाडीच्या भराडी देवीने कौल दिला, जत्रेची तारीख ठरली; फेब्रुवारीच्या तिसऱ्या आठवड्यात जत्रेला सुरुवात
आंगणेवाडीतील भराडी देवीच्या जत्रेची तारीख ठरली; फेब्रुवारीच्या तिसऱ्या आठवड्यात जत्रेला सुरुवात
Kurla Bus Accident: बेस्टचालक संजय मोरेचा पोलीस चौकशीत मोठा गौप्यस्फोट, सातत्याने एकच गोष्ट सांगत राहिला....
बेस्टचालक संजय मोरेचा पोलीस चौकशीत मोठा गौप्यस्फोट, सातत्याने एकच गोष्ट सांगत राहिला...
40 गुन्हे, जमावबंदीनंतर परभणीतील परिस्थिती नियंत्रणात, हिंसाचारानंतर आज सर्वत्र चोख पोलीस बंदोबस्त
40 गुन्हे, जमावबंदीनंतर परभणीतील परिस्थिती नियंत्रणात, हिंसाचारानंतर आज सर्वत्र चोख पोलीस बंदोबस्त
Mhada News : गुड न्यूज, म्हाडा मुंबईत पुढील 5 वर्षात अडीच लाख घरं बांधणार, घरांच्या किंमतीबाबत मोठी अपडेट 
मुंबईत घर घेण्याचं स्वप्न पूर्ण होणार, म्हाडाचं पाच वर्षात अडीच लाख घरं बांधण्याचं नियोजन 
लाडक्या बहिणींना गुडन्यूज; आदिती तटकरेंनी स्पष्टच सांगितलं, निकषांबाबत पत्रकच जारी
लाडक्या बहिणींना गुडन्यूज; आदिती तटकरेंनी स्पष्टच सांगितलं, निकषांबाबत पत्रकच जारी
रवींद्र वायकरांची खासदारकी राहणार का? मुंबई हायकोर्टाने निर्णय राखून ठेवला; युक्तिवाद पूर्ण
रवींद्र वायकरांची खासदारकी राहणार का? मुंबई हायकोर्टाने निर्णय राखून ठेवला; युक्तिवाद पूर्ण
Embed widget