Delhi Hate Crime: आंतरजातीय विवाहातून जिम ट्रेनरला झाडली गोळी, पत्नीच्या भावाला अटक
Delhi Hate Crime: याप्रकरणी पोलिसांनी मुलीच्या आरोपी भावाला बेड्या ठोकल्या आहेत. तसेच त्याच्याकडून दोन देशी पिस्तूलही जप्त केली आहे.
Delhi Hate Crime: दिल्लीच्या मॉडल टाऊन परिसरातील धक्कादायक घटना उघडकीस आली. आंतरजातीय विवाहातून जिम ट्रेनरला गोळी झाडण्यात आली. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात एकच खळबळ माजली आहे. देवी सिंह उर्फ देवा असे या हल्ल्यात जखमी झालेल्या तरूणाचे नाव आहे. देवाला उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे देवी सिंहने जुलै महिन्यात दुसऱ्या धर्माच्या मुलीसोबत प्रेमविवाह केला. याच रागातून मुलीच्या भावाने त्याच्या मित्रासह मिळून देवी सिंहवर प्राणघातक हल्ला केला. याप्रकरणी पोलिसांनी मुलीच्या आरोपी भावाला बेड्या ठोकल्या आहेत. तसेच त्याच्याकडून दोन देशी पिस्तूलही जप्त केली आहे.
Bus Accident:मोठी दुर्घटना, बस दरीत कोसळून एकाच गावातील 15 जणांचा मृत्यू
जखमीच्या नातेवाईकांनी सांगितले की आम्हाला शनिवारी रात्री उशिरा फोन आला की देवी सिंह यांना गोळी लागली. तसेच त्याला बाबू जगजीवन राम रुग्णालयात नेण्यात आले. त्यानंतर आम्ही बाबू जगजीवन राम रुग्णालयात पोहोचलो. दरम्यान, नातेवाईकांना देवाची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला मोठ्या रुग्णालयात दाखल करण्याचा डॉक्टरांनी सल्ला दिला. त्यानंतर त्याला शालिमार बाग येथील फोर्टिस रुग्णालयात आणले. देवी सिंह यांच्या डोक्याला गोळी लागली आहे.
देवी सिंहने हिना नावाच्या मुलीसोबत जुलै 2021 मध्ये आंतरजातीय प्रेमविवाह केला. आम्ही हिंदू आहोत आणि हिना मुस्लिम आहे. लग्नानंतर देवी सिंह आणि हिना वेगळे राहत होते. देवी सिंह आदर्श नगरमध्ये जिम चालवतो. हिनाचा धाकटा भाऊ शाहनवाज आणि त्याचा एक मित्र काल देवी सिंहला भेटला आणि या दोघांनी त्याच्यावर गोळीबार केला, अशी माहिती नातेवाईकांनी दिली.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीने देवी सिंहचा नंबर मिळवून त्याला भेटायला बोलावले. त्यानंतर शनिवारी देवी सिंह हिनासोबत तिचा भाऊ शाहनवाज भेटायला गेला. त्यावेळी शाहनवाजसह त्याचा एक मित्रही होता. त्यानंतर शाहनवाज देवी सिंहला मॉडेल टाऊनला घेऊन निघून गेला, अशी माहिती हिनाने दिली आहे.
पोलिसांनी शाहनवाज आणि त्याच्या एका मित्राला अटक केली आहे. त्यांच्या ताब्यातून दोन देशी बनावटीचे पिस्तूल जप्त करण्यात आले आहेत. आरोपीला त्याच्या बहिणीने आंतरजातीय विवाह केल्याचा राग होता. यातूनच त्याने देवी सिंहवर प्राणघातक हल्ला केल्याचे हिनाने सांगितले आहे.