एक्स्प्लोर
छातीदुखीच्या त्रासानंतर सुषमा स्वराज 'एम्स'मध्ये
नवी दिल्ली : परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांची प्रकृती खालावल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. स्वराज यांना दिल्लीच्या एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मात्र सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे.
सुषमा यांना सोमवार सकाळपासून छातीत दुखत होतं. तब्येत अधिक बिघडल्यामुळे संध्याकाळी 5 वाजता त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. रात्री 10 वाजता त्यांना कार्डिओ न्युरो सेंटरमध्ये हलवण्यात आलं. आरोग्यमंत्री जे पी नड्डा यांनी रुग्णालयात जाऊन स्वराज यांची विचारपूस केली.
सध्या सुषमा स्वराज यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे, तसेच चिंतेचं कारण नसल्याचंही त्यांनी सांगितलं आहे.
स्वराज यांच्या काही चाचण्या पूर्ण झाल्या असून मंगळवारी अहवालानंतर अधिक माहिती मिळेल, असं एम्सचे प्रवक्ते अमित गुप्ता यांनी सांगितलं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement