एक्स्प्लोर

दोन सज्ञानांच्या विवाहात तिसऱ्याने नाक खुपसू नये : सुप्रीम कोर्ट

दर दोन सज्ञान व्यक्ती परस्पर संमतीने लग्न करत असतील, तर त्यांना जबरदस्ती वेगळं करणं चुकीचं आहे, असं कोर्टाने दरडावून सांगितलं.

नवी दिल्ली : जर दोन सज्ञान व्यक्ती परस्पर संमतीने विवाह करत असतील, तर तिसऱ्या व्यक्तीने आडकाठी करण्याचा प्रश्नच येत नाही, असं म्हणत सुप्रीम कोर्टाने खाप पंचायतीचे कान उपटले आहेत. कुटुंबीय असो किंवा समाज, त्यांना या विवाहाशी काही देणंघेणं नसल्याचं सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांनी स्पष्ट केलं. कोणीही वैयक्तिक, सामूहिक किंवा संघटनात्मक पद्धतीने अशा लग्नात खोडा घालू शकत नाही, असं सुप्रीम कोर्टाने सांगितलं. दर दोन सज्ञान व्यक्ती परस्पर संमतीने लग्न करत असतील, तर त्यांना जबरदस्ती वेगळं करणं चुकीचं आहे, असं कोर्टाने दरडावून सांगितलं. दोन सज्ञान व्यक्तींच्या लग्नात नाक खुपसणारे तुम्ही कोण? असा प्रश्न सुप्रीम कोर्टाने खाप पंचायतीच्या वकिलांना विचारला. 'कायदा त्याच्या पद्धतीने काम करेल. तुम्ही अशा जोडप्यांबाबत काळजी करु नका. कायदा आहे आणि कायदा त्याचं काम करेल. ज्या दोघांचं लग्न झालं आहे, त्यांच्या अधिकारांबाबत आम्हाला चिंता वाटते' असं कोर्ट म्हणालं. खाप पंचायत प्रकरणी सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरु आहे. कुठल्याही तरुण किंवा तरुणीला समन्स बजावून खाप पंचायत लग्न करण्यापासून थांबवू शकत नाही, असं सुप्रीम कोर्टाने गेल्या सुनावणीवेळी सांगितलं होतं. सज्ञान तरुण-तरुणीला लग्न करण्यापासून रोखणं बेकायदेशीर असल्याचं कोर्टाने स्पष्ट केलं. खाप पंचायतीवरील सुनावणी दरम्यान एका याचिकाकर्त्याने दिल्लीतील फोटोग्राफर अंकिता सक्सेनाच्या हत्येचं प्रकरण उचलून धरलं. अंकितची हत्या हे ऑनर किलिंग आहे, दोषींवर तात्काळ कारवाई व्हायला हवी, असं मत सुप्रीम कोर्टाने व्यक्त केलं. मात्र हे प्रकरण आमच्यासमोर न आल्यामुळे त्यावर काही बोलू शकत नाही, असं कोर्टाने स्पष्ट केलं.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Video: दक्षिण दिल्लीत 5 मजली इमारत कोसळून आतापर्यंत 6 जणांचा मृत्यू; ढिगाऱ्यात गाडलेल्या 12 वैद्यकीय विद्यार्थ्यांना बाहेर काढलं, दोघांची प्रकृती गंभीर
Video: दक्षिण दिल्लीत 5 मजली इमारत कोसळून आतापर्यंत 6 जणांचा मृत्यू; ढिगाऱ्यात गाडलेल्या 12 वैद्यकीय विद्यार्थ्यांना बाहेर काढलं, दोघांची प्रकृती गंभीर
जगात सर्वाधिक इंटरनेचा वापर करणार देश कोणता? भारताचा कितव्या स्थानी? जाणून घ्या सविस्तर माहिती
जगात सर्वाधिक इंटरनेचा वापर करणार देश कोणता? भारताचा कितव्या स्थानी? जाणून घ्या सविस्तर माहिती
N S Raja Subramani: देशाचे तिसरे नवे संरक्षण प्रमुख जनरल एन. एस. राजा सुब्रमणींनी पदभार स्वीकारला; दिल्लीतील साऊथ ब्लॉक लॉन्समध्ये गार्ड ऑफ ऑनर
देशाचे तिसरे नवे संरक्षण प्रमुख जनरल एन. एस. राजा सुब्रमणींनी पदभार स्वीकारला; दिल्लीतील साऊथ ब्लॉक लॉन्समध्ये गार्ड ऑफ ऑनर
Balen Shah : नेपाळनेही भारतीय जमिनीवर कब्जा केला; संसदेतील पहिल्याच भाषणात बालेंद्र शाह यांचं मोठं वक्तव्य, ब्रिटनच्या मध्यस्थीची मागणी
नेपाळनेही भारतीय जमिनीवर कब्जा केला; संसदेतील पहिल्याच भाषणात बालेंद्र शाह यांचं मोठं वक्तव्य, ब्रिटनच्या मध्यस्थीची मागणी

व्हिडीओ

Dattatray Bharne on Karjamafi : पुढच्या 10 दिवसांत शेतकऱ्यांना कर्जमाफी;
Gopichand Padalkar On Jayant Patil : जयंत पाटलांची मोदींवर टीका, पडळकरांचं जशास तसं उत्तर!
Gold Import Modi Impact : सोन्याच्या वाढत्या दरांचा परिणाम, आयात-विक्रीत घट? | Special Report
Laxman Hake on Manoj Jarange : लक्ष्मण हाकेंनी दिला अल्टीमेटम; तर आम्ही ढेकळात आंदोलन करू!
Prajkta Tanpure Join BJP : भाजपमध्ये प्रवेश करताच तनपुरेंच्या कार्यालयातून शरद पवारांचे फोटो गायब

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Vaibhav Sooryavanshi: गिल अन् साई सुदर्शनला स्वस्तात घरचा रस्ता दाखवत हेझलवुड-भुवनेश्वरने बेबी बाॅसची 'ऑरेंज कॅप' पक्की करून टाकली!
गिल अन् साई सुदर्शनला स्वस्तात घरचा रस्ता दाखवत हेझलवुड-भुवनेश्वरने बेबी बाॅसची 'ऑरेंज कॅप' पक्की करून टाकली!
Virat Kohli Video: नशीबवान हेझलवुडने गिलचा गेम करताच कोहलीचं 'विराट' स्टाईलमध्ये जबरा सेलिब्रेशन अन् अनुष्का शर्माची सुद्धा स्माईल!
Video: नशीबवान हेझलवुडने गिलचा गेम करताच कोहलीचं 'विराट' स्टाईलमध्ये जबरा सेलिब्रेशन अन् अनुष्का शर्माची सुद्धा स्माईल!
मराठवाड्यासह विविध जिल्ह्यात पावसाची हजेरी; कुठे गारा, कुठे वादळवारा, उकाड्यापासून नागरिकांना सुटका
मराठवाड्यासह विविध जिल्ह्यात पावसाची हजेरी; कुठे गारा, कुठे वादळवारा, उकाड्यापासून नागरिकांना सुटका
Josh Hazlewood: फायनलमध्ये गुजराती कॅप्टन गिलचा गेम केलाच, पण नशीब असावं तर जोश हेझलवुडसारखं! आयपीएलच्या इतिहासात असा मान कोणालाच मिळाला नाही!
Josh Hazlewood Video: फायनलमध्ये गुजराती कॅप्टन गिलचा गेम केलाच, पण नशीब असावं तर जोश हेझलवुडसारखं! आयपीएलच्या इतिहासात असा मान कोणालाच मिळाला नाही!
Video: दक्षिण दिल्लीत 5 मजली इमारत कोसळून आतापर्यंत 6 जणांचा मृत्यू; ढिगाऱ्यात गाडलेल्या 12 वैद्यकीय विद्यार्थ्यांना बाहेर काढलं, दोघांची प्रकृती गंभीर
Video: दक्षिण दिल्लीत 5 मजली इमारत कोसळून आतापर्यंत 6 जणांचा मृत्यू; ढिगाऱ्यात गाडलेल्या 12 वैद्यकीय विद्यार्थ्यांना बाहेर काढलं, दोघांची प्रकृती गंभीर
साताऱ्यात 5 किलो गांजा तर नागपुरात 7 किलो ड्रग्ज जप्त; गुन्हे शाखेची मोठी कारवाई, ड्रग्सची बाजारात किंमत किती?
साताऱ्यात 5 किलो गांजा तर नागपुरात 7 किलो ड्रग्ज जप्त; गुन्हे शाखेची मोठी कारवाई, ड्रग्सची बाजारात किंमत किती?
Shubman Gill: 'कसोटी, एकदिवसीय आणि टी-20 या सर्व फॉरमॅटमध्ये मला..' आयपीएल फायनलपूर्वी शुभमन गिलचं मोठं वक्तव्य
Shubman Gill: 'कसोटी, एकदिवसीय आणि टी-20 या सर्व फॉरमॅटमध्ये मला..' आयपीएल फायनलपूर्वी शुभमन गिलचं मोठं वक्तव्य
व्हॉट्सअपवर लग्नाची पत्रिका अन् धोका, तुमचं बँक अकाऊंट होऊ शकतं रिकामं; सायबर पोलिसांकडून महत्त्वाचं आवाहन
व्हॉट्सअपवर लग्नाची पत्रिका अन् धोका, तुमचं बँक अकाऊंट होऊ शकतं रिकामं; सायबर पोलिसांकडून महत्त्वाचं आवाहन
Embed widget