एक्स्प्लोर

चित्रपटगृहांमध्ये आता राष्ट्रगीत अनिवार्य नाही!

सुप्रीम कोर्टने 30 नोव्हेंबर 2016 रोजी आदेश दिला होता की, देशातील सर्व थिएटरमध्ये सिनेमा सुरु होण्यापूर्वी राष्ट्रगीत लावणं अनिवार्य आहे.

नवी दिल्ली : चित्रपटगृहांमध्ये सिनेमा सुरु होण्याआधी राष्ट्रगीत लावणं आता अनिवार्य नाही. कारण सर्वोच्च न्यायालयाने 30 नोव्हेंबर 2016 रोजी दिलेला आपलाच निर्णय बदलला आहे. सिनेमाआधी राष्ट्रगीत अनिवार्य करु नये अशी विनंती केंद्राने सर्वोच्च न्यायालयाला केली आहे. या मुद्द्यावर आंतरमंत्रालयीन समिती स्थापन केली असून ती सहा महिन्यात आपल्या सूचना देईल, असं केंद्र सरकारने सुप्रीम कोर्टात दाखल केलेल्या  प्रतिज्ञापत्रात म्हटलं होतं. यावर निर्णय देताना, थिएटरमध्ये चित्रपट सुरु होण्यापूर्वी राष्ट्रगीत बंधनकारक नसल्याचं सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केलं. पूर्वीसारखीच परिस्थिती कायम ठेवावी - केंद्र सरकारने राष्ट्रगीत अनिवार्य करण्यासंदर्भात सुप्रीम कोर्टात प्रतीज्ञापत्र दाखल केलं होतं. या प्रकरणात कोर्टाने आपल्या 30 नोव्हेंबर 2016 च्या आदेशापूर्वीची परिस्थिती कायम ठेवावी, अशी विनंती सरकारने केली होती. - 23 ऑक्टोबर 2017 रोजी सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला सांगितलं होतं की, "चित्रपटगृह आणि इतर ठिकाणी राष्ट्रगीत अनिवार्य करायचं की नाही हे सरकारने ठरवावं. यासंदर्भात जारी झालेलं कोणतंही परिपत्रक कोर्टाच्या या अंतरिम आदेशामुळे प्रभावित होऊ नये." काय आहे सुप्रीम कोर्टाचा आदेश? - सुप्रीम कोर्टने 30 नोव्हेंबर 2016 रोजी आदेश दिला होता की, देशातील सर्व थिएटरमध्ये सिनेमा सुरु होण्यापूर्वी राष्ट्रगीत लावणं अनिवार्य आहे. - यावेळी स्क्रीनवर तिरंगा दिसायला हवा. तसंच राष्ट्रगीताच्या सन्मानार्थ चित्रपटगृहांमध्ये उपस्थित सगळ्यांना उभं राहणं बंधनकारक आहे. - राष्ट्रगीत सुरु असताना सिनेमाहॉलचे गेट बंद केले जावेत, जेणेकरुन यावेळी अडथळे येणार नाही. - राष्ट्रगीत अशा कोणत्याही ठिकाणी छापू किंवा चिटकवू नये, ज्यामुळे त्याचा अपमान होई, असंही कोर्टाने स्पष्ट केलं होतं. राष्ट्रगीमधून व्यायसायिक लाभ घेऊ नये. - राष्ट्रगीत अर्ध-अपूर्ण लावलं आणि ऐकवलं जाऊ नये. ते पूर्णच लावलं पाहिजे, असंही सुप्रीम कोर्टाने आदेशाने म्हटलं आहे. केंद्र सरकारने भूमिका बदलण्याचं कारण काय? राष्ट्रगीत अनिवार्य करण्याच्या सरकारच्या निर्णयानंतर अनेक घटना समोर आल्या होत्या, ज्यात काही कारणाने राष्ट्रगीताला उभं न राहिल्याने जमावाने एखाद्याला मारहाण केली होती. शारीरिकदृष्ट्या अपंग व्यक्ती राष्ट्रगीताच्यावेळी उभं न राहिल्याने जमावाने त्याला मारल्याचाही प्रकारही घडला होता. तसंच कुटुंबाला चित्रपटगृहातून बाहेर काढलं होतं. अशा घटना होऊ नये, यासाठी मार्गदर्शक सूचना तयार केल्या जाणार असून, यासाठी मुदत द्यावी, अशी विनंती गृहमंत्रालयाने सुप्रीम कोर्टात केली आहे. म्हणूनच थिएटरमध्ये राष्ट्रगीत अनिवार्य करण्यासंदर्भात केंद्र सरकारने आपली भूमिका काहीशी बदलली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

सहा दशकं जंगलात, पुरस्काराचं श्रेय गुरुजन, पत्नी आणि निसर्गाला, पद्मश्री पुरस्कारानंतर मारुती चित्तमपल्ली भावूक
सहा दशकं जंगलात, पुरस्काराचं श्रेय गुरुजन, पत्नी आणि निसर्गाला, पद्मश्री पुरस्कारानंतर मारुती चित्तमपल्ली भावूक
अमित शाहंनी पवारसाहेबांवर प्रश्न उपस्थित करण्याचं धाडस करु नये, त्यांनी देश फिरावा, जयंत पाटलांचा हल्लाबोल
अमित शाहंनी पवारसाहेबांवर प्रश्न उपस्थित करण्याचं धाडस करु नये, त्यांनी देश फिरावा, जयंत पाटलांचा हल्लाबोल
Nana Patole : महाराष्ट्र निवडणुकीत 60 लाख अतिरिक्त मते कोठून आली? हे बांगलादेशी मतदार होते का, त्यांना मोदी सरकारने आणले का?? नाना पटोलेंचा गंभीर आरोप
महाराष्ट्र निवडणुकीत 60 लाख अतिरिक्त मते कोठून आली? हे बांगलादेशी मतदार होते का, त्यांना मोदी सरकारने आणले का?? नाना पटोलेंचा गंभीर आरोप
Sanjay Raut : विधानसभा हरलो म्हणजे पक्ष संपत नाही, राजकारणात सर्वांचे दिवस बदलतात; राऊतांचा अमित शाह, एकनाथ शिंदेंना थेट इशारा
विधानसभा हरलो म्हणजे पक्ष संपत नाही, राजकारणात सर्वांचे दिवस बदलतात; राऊतांचा अमित शाह, एकनाथ शिंदेंना थेट इशारा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Padma Shri Award News :  अशोक सराफ, अरिजीत सिंगला पद्मश्री पुरस्कार; केंद्र सरकारकडून सन्मानAshok Saraf Padma Shri Award : पद्मश्री पुरस्काराने सन्मान,अशोक सराफ यांची पहिली प्रतिक्रियाSpecial Report Mamta Kulkarni Sanyas:ग्लॅमर ते संन्यास, वादाचा प्रवास;ममतावरुन किन्नरांमध्ये 'आखाडा'Special Report Tahawwur Rana : मुंबईचा दुश्मन भारताच्या ताब्यात येणार, तहव्वूरचे प्रत्यार्पण होणार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
सहा दशकं जंगलात, पुरस्काराचं श्रेय गुरुजन, पत्नी आणि निसर्गाला, पद्मश्री पुरस्कारानंतर मारुती चित्तमपल्ली भावूक
सहा दशकं जंगलात, पुरस्काराचं श्रेय गुरुजन, पत्नी आणि निसर्गाला, पद्मश्री पुरस्कारानंतर मारुती चित्तमपल्ली भावूक
अमित शाहंनी पवारसाहेबांवर प्रश्न उपस्थित करण्याचं धाडस करु नये, त्यांनी देश फिरावा, जयंत पाटलांचा हल्लाबोल
अमित शाहंनी पवारसाहेबांवर प्रश्न उपस्थित करण्याचं धाडस करु नये, त्यांनी देश फिरावा, जयंत पाटलांचा हल्लाबोल
Nana Patole : महाराष्ट्र निवडणुकीत 60 लाख अतिरिक्त मते कोठून आली? हे बांगलादेशी मतदार होते का, त्यांना मोदी सरकारने आणले का?? नाना पटोलेंचा गंभीर आरोप
महाराष्ट्र निवडणुकीत 60 लाख अतिरिक्त मते कोठून आली? हे बांगलादेशी मतदार होते का, त्यांना मोदी सरकारने आणले का?? नाना पटोलेंचा गंभीर आरोप
Sanjay Raut : विधानसभा हरलो म्हणजे पक्ष संपत नाही, राजकारणात सर्वांचे दिवस बदलतात; राऊतांचा अमित शाह, एकनाथ शिंदेंना थेट इशारा
विधानसभा हरलो म्हणजे पक्ष संपत नाही, राजकारणात सर्वांचे दिवस बदलतात; राऊतांचा अमित शाह, एकनाथ शिंदेंना थेट इशारा
Jitendra Awhad : अत्याचार केलेल्यांना सोडवण्यासाठी अक्षय शिंदेला संपवलं, आरोपी चुपचाप सुटून जाणार; जितेंद्र आव्हाडांचा खळबळजनक दावा
अत्याचार केलेल्यांना सोडवण्यासाठी अक्षय शिंदेला संपवलं, आरोपी चुपचाप सुटून जाणार; जितेंद्र आव्हाडांचा खळबळजनक दावा
Amravati News: अमरावतीत काही संघटनांकडून शस्त्र वाटप, काँग्रेसचा आरोप; तर यशोमती ताई गांधारी सारख्या; खासदार अनिल बोंडेंचं प्रत्युत्तर 
अमरावतीत काही संघटनांकडून शस्त्र वाटप, काँग्रेसचा आरोप; तर यशोमती ताई गांधारी सारख्या; खासदार अनिल बोंडेंचं प्रत्युत्तर 
Rahul Gandhi : राहुल गांधी यांची गुंतवणूक कोणत्या म्युच्यूअल फंडात? किती परतावा मिळाला?
काँग्रेस नेते राहुल गांधी यांची गुंतवणूक कोणत्या म्युच्यूअल फंडात? किती परतावा मिळाला?
Bharat Gogawale : चांगली सेवा सुविधा हवी असेल तर भाडेवाढ करणे गरजेचे; मंत्री भरत गोगावलेंचं मोठं वक्तव्य
चांगली सेवा सुविधा हवी असेल तर भाडेवाढ करणे गरजेचे; मंत्री भरत गोगावलेंचं मोठं वक्तव्य
Embed widget