एक्स्प्लोर
सुमित्रा महाजन, ई श्रीधरन राष्ट्रपतीपदाच्या शर्यतीत?
नवी दिल्ली : देशाचा पुढचा राष्ट्रपती कोण? याबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यापाठोपाठ आता आणखी दोन नावं समोर आली आहेत.
मेट्रोमॅन एनडीएचे उमेदवार?
यातील पहिलं नाव म्हणजे मेट्रो मॅन अर्थात दिल्ली मेट्रोचे प्रमुख ई श्रीधरन. श्रीधरन यांना एनडीएकडून राष्ट्रपतीपदासाठी पसंती मिळण्याची शक्यता आहे. कारण पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ई श्रीधरन यांना व्हीआयपीचा दर्जादेखील दिला आहे.
कोची मेट्रोचं उद्या उद्घाटन आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या बाजूला बसण्याचा मानही श्रीधरन यांना दिला आहे.
सुमित्रा महाजन राष्ट्रपतीपदाच्या शर्यतीत?
तर राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी नव्या चर्चेत आलेलं दुसरं नाव म्हणजे लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन. सुमित्रा महाजन यांनी आठवडाभर दिल्ली सोडू नये, तसंच सगळे परदेश दौरे रद्द करण्याच्या सूचना पक्षातर्फे दिल्याचं सुत्रांनी म्हटलं आहे.
त्यामुळे सुमित्रा महाजन भाजपच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार असू शकतात, अशी शक्यता अनेक जण व्यक्त करत आहेत. मूळच्या महाराष्ट्रातील आणि मध्य प्रदेशातून खासदार असलेल्या सुमित्रा महाजन सध्या लोकसभेच्या अध्यक्षा आहेत.
उमेदवार भाजपचाच?
23 जून रोजी भाजपचा उमेदवार राष्ट्रपतीपदासाठी अर्ज दाखल करत नाही तोपर्यंत शर्यतीत कोण याबाबत अंदाज वर्तवला जाईलच. मात्र राष्ट्रपतीपदासाठी भाजपचाच उमेदवार असेल, असं भाजपच्या सुत्रांनी सांगितलं आहे.
येत्या 17 जुलै रोजी राष्ट्रपतीपदाची निवडणूक होणार आहे. त्यापार्श्वभूमीवर ई श्रीधरन, सुमित्रा महाजन की आणखी कोण एनडीएचा उमेदवार असणार, यावरुन आता चर्चांना उधाण आलं आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement