Suman Kalyanpur : सुमन कल्याणपूर यांना पद्मभूषण जाहीर; जाणून घ्या त्यांचा प्रवास...
Suman Kalyanpur : गायिका सुमन कल्याणपूर यांना पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे.
Suman Kalyanpur : प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. यात गायिका सुमन कल्याणपूर (Suman Kalyanpur) यांना पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. सुमन यांनी अनेक हिंदी-मराठी चित्रपटगीतांसह भावगीतेही गायली आहेत.
सुमन कल्याणपूर यांनी गुजराती, बंगाली, पंजाबी, ओडिसी या भाषांमध्येही गाणी गायली आहेत. अत्यंत गोड गळा आणि शब्दातील भावार्थ अचूकपणे समजून गाणाऱ्या सुमन कल्याणपूर यांचा जन्म बांगलादेशातील भावनिपूर येथे 28 जानेवारी 1937 रोजी झाला. सुमन यांच्या मराठी भावगीत गायनाची सुरुवात ग. दि. माडगुळकरांच्या गीतापासून झाली.
For 2023, the President has approved conferment of 106 Padma Awards incl 3 duo cases. The list comprises 6 Padma Vibhushan, 9 Padma Bhushan & 91 Padma Shri. 19 awardees are women & the list also includes 2 persons from category of Foreigners/NRI/PIO/OCI and 7 Posthumous awardees pic.twitter.com/Gl4t6NGSzs
— ANI (@ANI) January 25, 2023
सुमन कल्याणपूर यांना नुकतच पुलस्मृती पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. त्यांची अनेक गाणी लोकप्रिय झाली असली तरी त्या कायम प्रसिद्धीपासून अलिप्ट राहिल्या आहेत. मराठी संगीतक्षेत्रातील त्यांचे योगदान मोलाचे आहेत. सुमन कल्याणपूर यांच्यासारख्या नव्या दमाच्या गायिकेला चित्रपटसृष्टीकडून खूपच अपेक्षा होत्या. मात्र त्या पूर्ण झाल्या नाहीत.
सुमन कल्याणपूर यांचा सिनेसृष्टीतील प्रवास कसा झाला?
सुमन कल्याणपूर यांचे सिनेसृष्टीतले आगमन गझलसम्राट तलत मेहमूद यांच्यामुळेच झाले. एका कार्यक्रमात गाणं गात असताना तलत मेहमुद यांनी सुमनताईंचा आवाज ऐकला. त्यांनंतर त्यांच्या एका सिनेमासाठी त्यांनी सुमनताईंना विचारणा केली. सुमन कल्याणपूर यांनीदेखील होकार दिला.
सुमन कल्याणपूर यांची लोकप्रिय मराठी गाणी
- जिथे सागरा धरणी मिळते
- घाल घाल पिंगा वाऱ्या माझ्या परसात
- माहेरी जा सुवासाची कर बरसात
- निंबोणीच्या झाडामागे चंद्र झोपला गं बाई
- कशी गवळण राधा बावरली
- नाविका रे वारा वाहे रे
- केतकीच्या बनी तेथे नाजला ग मोर
- उठा उठा चिऊताई
- या लाडक्या मुलांना यो
सुमन कल्याणपूर यांची लोकप्रिय मराठी भावगीते :
- अक्रुरा नको नेऊ माधवा
- आकाश पांघरुनी
- उठा उठा चिऊताई
- केतकीच्या बनी तिथे
- केशवा माधवा
- जुळल्या सुरेल तारा
- जेथे जातो तेथे
- नकळत सारे घडले
- नाविका रे
- वाट इथे स्वप्नातिल
- शब्द शब्द जपुनि ठेव
संबंधित बातम्या