एक्स्प्लोर
कोरेगाव-भीमा प्रकरणी सुधीर ढवळेंसह 5 जणांना अटक
पुण्याच्या विश्रामबाग पोलिसांकडून सुधीर ढवळेंवर कारवाई
मुंबई : एल्गार परिषदेचे आयोजक आणि दलित चळवळीतील कार्यकर्ते सुधीर ढवळे यांना गोवंडीतील त्यांच्या कार्यालयातून अटक करण्यात आली. पुण्यातील विश्रामबाग पोलिसांनी आज सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास कारवाई केली. काही महिन्यांपूर्वी पुणे पोलिसांनी त्यांचा घराची झाडाझडती घेतली होती आणि आज त्यांना अटक करण्यात आली.
एल्गार परिषदेत नक्षलवाद्यांनी उपस्थिती लावली होती. या नक्षलवाद्यांचा आयोजकांशी संबंध आहे, असा आरोप ठेवून ही अटकेची कारवाई करण्यात आली आहे.
ढवळे यांच्यासोबत आणखी चार जणांना विविध ठिकाणांहून अटक करण्यात आले आहे. नागपुरातून वकील सुरेंद्र गडलिंग, महेश राऊत, शोमा सेन यांना अटक करण्यात आली आहे. तर माओवाद्यांचा नेता रोना विल्सन याला दिल्लीतून अटक करण्यात आली आहे.
संभाजी भिडेंना अटक न करता भीमा कोरेगाव शौर्य प्रेरणा अभियानाच्या आयोजकांना अटक झाल्याचा निषेध नोंदवण्यासाठी सुधीर ढवळे यांच्या समर्थकांनी देवनार पोलीस स्थानकाबाहेर मोठी गर्दी केली आणि अटकेच्या कारवाईचा निषेध करत घोषणाबाजी केली.
पुण्यातील शनिवारवाडा इथे 31 डिसेंबर 2017 रोजी आयोजित करण्यात आलेल्या एल्गार परिषदेनंतर 1 जानेवारी 2018 रोजी भीमा-कोरेगाव इथे दंगल उसळली होती. एल्गार परिषदेमध्ये काही नक्षलवादी सहभागी झाले होते आणि हे नक्षलवादी सुधीर ढवळे यांच्या संपर्कात आहेत असा आरोप करण्यात येत होता. भीमा कोरेगाव दंगलीपूर्वी भडकाऊ भाषणे आणि पुस्तके वाटप केल्याचाही आरोप ढवळेंवर होता. काही दिवसांपूर्वीच पोलिसांनी छापेमारी केली होती.
कोण आहेत सुधीर ढवळे?
सुधीर ढवळे हे दलित चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते असून, शेड्युल कास्ट अँड शेड्युल ट्राईब (प्रिव्हेन्शन ऑफ अॅट्रॉसिटीज) अॅक्टच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी त्यांनी अनेकदा अभियान राबवले आहे. 6 डिसेंबर 2007 रोजी स्थापन झालेल्या रिपब्लिकन पँथरचे ढवळे हे संस्थापक सदस्य आहेत. विद्रोही चळवळीतील सक्रीय कार्यकर्ते आणि लेखक म्हणूनही ढवळेंची ओळख आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
भारत
राजकारण
राजकारण
Advertisement