10 दिवसांपूर्वी मंत्री, आता 7455 मतांनी पराभव, राजस्थानमध्ये भाजपला मोठा धक्का
Karanpur Election Result LIVE : राज्यस्थानमध्ये सत्ताधारी भाजपला मोठा धक्का बसला आहे. श्रीगंगानगर जिल्ह्यातील करणपुर विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव जवळपास निश्चित मानला जातोय.
Karanpur Election Result LIVE : राज्यस्थानमध्ये सत्ताधारी भाजपला मोठा धक्का बसला आहे. श्रीगंगानगर जिल्ह्यातील करणपुर विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव जवळपास निश्चित मानला जातोय. करणपुर पोटनिवडणुकीची आज मतमोजणी सुरु आहे. यामध्ये भाजपचे सुरेंद्र पाल सिंह टीटी 12 व्या फेरीनंतर सात हजारांपेक्षा जास्त मतांनी पिछाडीवर आहेत. राजस्थान सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारात भाजपनं सुरेंद्र पाल सिंह टीटी यांना मंत्रिपद दिलं होतं. त्यानंतर ते निवडणुकीच्या मैदानात उतरले. पण आता त्यांच्यावर पराभवाचं सावट ओढावलं आहे. दरम्यान, राजस्थान निवडणुकीत प्रचारावेळी काँग्रेस उमेदवार अन् तत्कालीन आमदार गुरमीत सिंह कूनर यांचं निधन झालं होतं. त्यामुळे निवडणूक आयोगानं करणपुर विधानसभा निवडणूक स्थगित केली होती. त्यानंतर तिथे निवडणूक पार पडली. भाजपनं सुरेंद्र पाल सिंह टीटी यांना रिंगणात उतरवलं होतं, तर काँग्रेसकडून कूनर यांचा मुलगा रूपिंदर सिंह याला तिकिट दिलं होतं.
निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार, करणपुर विधानसभा पोटनिवडणुकीच्या मतमोजणीच्या 12 फेऱ्या पार पडल्या आहेत. 12 फेऱ्यानंतर काँग्रेस उमेदवार रुपिंदर सिंह कूनर यांची आघाडी कायम आहे. त्यांनी आतापर्यंत 64,001 मतं मिळालं आहेत. तर भाजप उमेदवार मंत्री सुरेंद्र पाल सिंह यांना 56,546 इतकी मतं मिळाली आहेत. ते 7455 मतांनी पिछाडीवर आहेत.
Remember the name, Govind Singh Dotasra 🔥
— Amock (@Politics_2022_) January 8, 2024
Defeated BJP minister by 12570 votes just after a week of govt formation.#Karanpur #श्रीकरणपुर pic.twitter.com/U3q0WheDAH
आमदार होण्याआधीच मंत्री -
करणपुर विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपनं सुरेंद्र पाल सिंह टीटी यांना रिंगणात उतरवलं. पण त्याआधीच त्यांना मंत्रिपद देण्यात आले होते. आमदार होण्याआधीच सुरेंद्र सिंह टीटी हे मंत्री झाले होते. त्यांनी मंत्रिपदाची शपथही घेतली. यावरुन काँग्रेसनं भाजपवर निशाणा साधला होता.
सुरेंद्र पाल सिंह टीटी यांना भाजपचे वरिष्ठ आणि अनुभवी नेता मानले जाते. 1994 मध्ये ते मंत्रिमंडळात होते. राजस्थान वेयरहाउसिंगचं अध्यक्षपदही त्यांनी सांभाळलेय. वसुंधराजे सरकारमध्ये (2003-2008) त्यांनी कृषिमंत्री म्हणून काम पाहिलेय. त्यानंतर 2013-2018 यादरम्यान ते पेट्रोलियम मंत्री होते. आता भजनलाल सरकारमध्ये त्यांना आमदार होण्याआधीच मंत्रिपद देण्यात आले होते. त्यांनी राज्यमंत्रि म्हणून शपथ घेतली होती.
श्रीकरणपुर में कांग्रेस प्रत्याशी श्री रुपिन्दर सिंह कुन्नर को जीत की हार्दिक बधाई एवं शुभकामनाएं। यह जीत स्व. गुरमीत सिंह कुन्नर के जनसेवा कार्यों को समर्पित है।
— Ashok Gehlot (@ashokgehlot51) January 8, 2024
श्रीकरणपुर की जनता ने भारतीय जनता पार्टी के अभिमान को हराया है। चुनाव के बीच प्रत्याशी को मंत्री बनाकर आचार संहिता…