एक्स्प्लोर
इन्स्पेक्टरला जीवे मारण्याची सपा नेत्याकडून जाहीरपणे धमकी
गेल्या महिन्याच्या सुरुवातीला ग्रेटर नोएडामध्ये पोलिसांनी सुमित गुर्जरचा एन्काऊंटर केला. पोलिसांच्या दाव्यानुसार, सुमित गुर्जरवर 50 हजारांचं बक्षीस होतं. मात्र, सुमितच्या नातेवाईंकाचा आरोप आहे की, हा बनावट एन्काऊंटर आहे.

मेरठ (उत्तर प्रदेश) : समाजवादी पक्षाचे नेते अतुल प्रधान यांचा एक कथित वादग्रस्त व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये सुमित गुर्जरचा एन्काऊंटर करणाऱ्या इन्स्पेक्टरला धमकी दिली आहे. कथित व्हिडीओ मेरठमधील मवाना परिसरातील मकदूपूरच्या सभेतील असून, सपा नेते अतुल प्रधान या सभेला संबोधित करताना दिसत आहेत. सपा नेते अतुल प्रधान यांच्या या कथित भाषणाच्या व्हिडीओची चौकशी मेरठच्या एसएसपीकडून होईल, अशी माहिती मेरठ विभागाचे एडीजी प्रशांत कुमार यांनी दिली. गेल्या महिन्याच्या सुरुवातीला ग्रेटर नोएडामध्ये पोलिसांनी सुमित गुर्जरचा एन्काऊंटर करण्यात आला. पोलिसांच्या दाव्यानुसार, सुमित गुर्जरवर 50 हजारांचं बक्षीस होतं. मात्र, सुमितच्या नातेवाईंकाचा आरोप आहे की, हा एन्काऊंटर बनावट आहे. दरम्यान, भाषणाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सपा नेते अतुल प्रधान यांनी प्रसारमाध्यमांशी बोलणं टाळलं. तर दुसरीकडे, मेरठमधील कमिश्नरी पार्कमध्ये सुमित गुर्जर एन्काऊंटर प्रकरणी धरणं आयोजित करण्यात आले होते. यावेळी सुमितच्या नातेवाईकांनी मुंडनही केले. मेरठमध्ये कलम 144 लागू असूनही धरणं सुरु केल्याने अतुल प्रधान आणि त्यांच्या समर्थकांविरोधात पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
आणखी वाचा























