National Herald Case : सोनिया गांधी यांची तब्बल सहा तास चौकशी, उद्या पुन्हा चौकशीला बोलावण्याची शक्यता
National Herald Case : देशभरात काँग्रेसतर्फे आंदोलन करण्यात आलं. नवी दिल्लीत राहुल गांधी यांनी पक्षाच्या खासदारांसह विजय चौकाजवळ चौकशीविरोधात धरणे दिले.
National Herald Case : सोनिया गांधींची आज दुसऱ्यांदा दुसऱ्यांदा अंमलबजावणी संचालनालयासमोर (ईडी) हजर झाल्या. नॅशनल हेराल्ड प्रकरणात सोनिया गांधी (Sonia Gandhi) ईडीसमोर (ED) हजर होण्याची ही दुसरी वेळ आहे. सोनिया गांधी यांची आजची चौकशी संपली आहे. सहा तासांनंतर सोनिया ईडी कार्यालयातून बाहेर पडल्या.
सोनिया गांधी, मुलगा राहुल गांधी (Rahul Gandhi) आणि मुलगी प्रियंका गांधी (Priyanka Gandhi) सकाळी 11 वाजता दिल्लीतील अब्दुल कलाम रोडवरील ईडी कार्यालयात पोहचल्या. त्यानंतर अर्ध्या तासासाठी दुपारच्या जेवणाकरता घरी गेल्या आणि पुन्हा साडे तीन वाजता पुन्हा आल्या. ईडीच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, . प्रियंका गांधी यांना ईडीच्या मुख्यालयात थांबण्यास परवानगी दिली. कारण सोनिया गांधी यांना वेळेवर औषधे देता येतील. प्रियंका गांधी यांना सोनिया गांधी यांच्या खोलीपासून दूर ठेवण्यात आले होते.
सोनिया गांधी यांची पहिल्यांदा 21 जुलैला दोन तास ईडीने चौकशी केली. त्यावेळी त्यांना 28 प्रश्न विचारण्यात आले होते. नॅशनल हेराल्डप्रकरणी ईडी चौकशी करत आहे. याच प्रकरणी राहुल गांधी यांची ईडीने 50 तास चौकशी केली.
राहुल गांधींसह कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात
देशभरात काँग्रेसतर्फे आंदोलन करण्यात आलं. नवी दिल्लीत राहुल गांधी यांनी पक्षाच्या खासदारांसह विजय चौकाजवळ चौकशीविरोधात धरणे दिले. तेव्हा दिल्ली पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. मल्लिकार्जुन खरगे, केसी वेणुगोपाल, शक्तीसिंह गोहिल यांच्यासह अनेक खासदारांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले. हे सर्व खासदार संसदेपासून राष्ट्रपती भवनापर्यंत निषेध मोर्चा काढत होते. ताब्यात घेतल्यानंतर राहुल गांधी म्हणाले की, सरकार ना चर्चा करत आहे, ना बोलू देत आहे. काँग्रेस नेत्यांना आंदोलन करण्यापासून रोखल्याबद्दल सचिन पायलट यांनी केंद्र सरकारवर टीका केलीय.
संबंधित बातम्या :
Rahul Gandhi Detained : दिल्लीत राहुल गांधींना पोलिसांनी ताब्यात घेतलं, सोनिया गांधींच्या ED चौकशीविरोधात काँग्रेसचं तीव्र आंदोलन
8 ते 10 तास चौकशी, तीन टप्प्यांत प्रश्न; सोनिया गांधींच्या चौकशीसाठी ईडीचा खास प्लान