एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
पोलीस पत्नीची हत्या मुलाकडूनच, जोधपूरमधून सिद्धांतला अटक
जोधपूर: मुंबईतील पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर गणोरे यांच्यी पत्नी दिपालीच्या हत्येनंतर बेपत्ता झालेला त्यांचा मुलगा सिद्धांत अखेर सापडला आहे. जोधपूर पोलिसांनी सिद्धांतला ताब्यात घेतलं आहे.
दिपाली गणोरेंची काल राहत्या घरी निर्घृण हत्या झाली होती. मात्र, हत्येनंतर सिद्धांत बेपत्ता झाला होता. मुलगा सिद्धांतनंच ही केल्याचं उघड झालं आहे. जोधपूर पोलिसांनी सिद्धांतला ताब्यात घेतल्यानंतर त्यानं हत्येची कबुली दिली आहे.
हत्येनंतर सिद्धांत मुंबईहून ट्रेननं जोधपूरला गेला. त्याला जोधपूर पोलिसांनी स्टेशनवरच ताब्यात घेतलं. त्यानंतर आपणच आईची हत्या केल्याची त्यानं कबुली दिली आहे. ‘आई-वडिलांची घरात रोज होणाऱ्या भांडणाला आपण कंटाळून गेलो होतो. त्यामुळेच आईची हत्या केल्याचं त्यानं जोधपूर पोलिसांना सांगितलं.’
दरम्यान, या हत्येनंतर सिद्धांतच्या चेहऱ्यावर अपराधीपणाचा साधा लवलेशही नव्हता. सिद्धांतला ताब्यात घेतल्यानंतर जोधपूर पोलिसांनी मुंबई पोलिसांना याबाबत कळवलं असून मुंबई पोलिसांची एक टीम जोधपूरला रवाना झाली आहे.
काय आहे नेमकं प्रकरण?
मुंबईतील वाकोला परिसरात पोलिस निरीक्षकाच्या पत्नीच्या हत्येप्रकरणी मुलावर संशय व्यक्त करण्यात येत आहे. पैशावरुन झालेल्या वादानंतर मुलगा सिद्धांतनेच जन्मदात्रीचा जीव घेतल्याची शंका पोलिसांनी व्यक्त केली आहे.
हत्येची घटना उघडकीस आल्यापासून सिद्धांत बेपत्ता होता आणि घरातील दोन लाखांची रक्कमही गायब होती. दीपाली गणोरे यांच्या मृतदेहाशेजारी रक्तानं “टायर्ड ऑफ हर, कॅच मी अँड हँग मी” (तिला कंटाळलो आहे. मला पकडा आणि फासावर लटकवा) असंही लिहून पुढे स्माईली काढण्यात आला होता.
खार पोलिस स्टेशनचे निरीक्षक ज्ञानेश्वर गणोरे यांच्या पत्नी दीपाली गणोरे यांची मंगळवारी रात्री आठ ते नऊ वाजण्याच्या सुमारास हत्या झाली होती. रात्री 11 वाजताच्या सुमारास ज्ञानेश्वर गणोरे सांताक्रुझच्या प्रभात कॉलनीतील घरी आल्यावर कोणीच दरवाजा उघडला नाही. त्यांनी 12-12.30 पर्यंत वाट पाहिली आणि मग शोधाशोध सुरु केली.
शेजाऱ्याच्या मदतीनं दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला. शोधाशोध करताना ज्ञानेश्वर गणोरेंना चावी घराच्या कचऱ्याच्या पेटीत सापडली. त्या चावीनं दरवाजा उघडल्यावर ही घटना समोर आली.
ज्ञानेश्वर गणोरे यांचा मुलगा सिद्धांत हत्या प्रकरणातील प्रमुख संशयित आहेत. सिद्धांत आणि त्याची आई दीपाली यांच्यात पैशामुळे वाद झाला असावा, त्यातूनच हे हत्याकांड घडल्याचा प्राथमिक अंदाज आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.
सिद्धांतनं आपल्या आईला घरात दोन लाख रुपये ठेवताना पाहिलं होतं. त्यामुळे त्याने आईकडे पैशांची मागणी केली. मात्र पैसे देण्यास आईने नकार दिल्यामुळे चिडलेल्या सिद्धांतने सख्ख्या आईचाच जीव घेतला असावा, असा संशय आहे.
कूपर हॉस्पिटलमध्ये दीपाली यांच्या मृतदेहाचं पोस्टमार्टम करण्यात आलं. त्यानंतर पार्थिव नाशिकला नेण्यात आलं.
संबंधित बातम्या:
'तिला कंटाळलो..' पोलिसाच्या पत्नीच्या हत्येप्रकरणी मुलावर संशय
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
राजकारण
ठाणे
महाराष्ट्र
Advertisement