एक्स्प्लोर
Advertisement
मोदी सरकार, अपयशी सरकार, काँग्रेसचा केंद्र सरकारवर हल्लाबोल
नवी दिल्ली : 16 मे रोजी मोदी सरकार सत्तेत येऊन 3 वर्ष पूर्ण होत आहेत. याच दिवशी देशाच्या जनतेने भाजपला एकहाती सत्ता दिली होती. त्याच मुहूर्तावर काँग्रेसने भाजपच्या कारभाराची चिरफाड केली आहे.
मोदींनी दाखवलेली सगळी स्वप्नं म्हणजे निव्वळ धूळफेक असल्याचं काँग्रेसनं म्हटलं आहे. रोहित वेमुला, उना, दादरी प्रकरणामुळे देशाची अखंडता धोक्यात आल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे.
मोदींनी शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्याचं आश्वासन दिलं होतं. पण तीन वर्षांत शेतकऱ्याच्या मालाला हमीभावसुद्धा नीट मिळाला नाही. कांदा, तूरडाळ, सोयाबीन, कापूस, मिरची, द्राक्षं, डाळिंब सगळ्याच पिकांची माती झाली आहे. याला मोदी सरकारची धोरणं जबाबदार असल्याचा घणाघात सचिन पायलट यांनी केला आहे.
यूपीएच्या काळात पाकिस्तानला 'जशास तसं उत्तर' देण्याची भाषा मोदी करत होते, पण पठाणकोट, उरी हल्ल्यानंतर दरदिवशी सैनिक धारातीर्थी पडत आहेत, त्यावर मोदी सरकार काय करतंय? असा सवाल काँग्रेसने केला आहे.
मोदींनी विकासाचं स्वप्न दाखवलं, पण प्रत्यक्षात घरवापसी, गोहत्या आणि इतर मुद्द्यांचं राजकारण करुन लोकांचा भ्रमनिरास केल्याचंही सचिन पायलट यांनी म्हटलं आहे.
आधार कार्ड, जीएसटी, कृषी विमा योजना काँग्रेसने आणल्या. त्यावेळी मोदींनी त्याचा विरोध केला. पण सत्तेत आल्यावर त्याच योजनांचा गाजावाजा करुन आपला डंका पिटल्याचं काँग्रेसचं म्हणणं आहे. आता भाजपही त्याला जशास तसं उत्तर देईल, पण या कलगीतुऱ्यातून लोकांना काय मिळणार? हे कोडं आहे.
संबंधित बातम्या
मोदी सरकारची 3 वर्षे, पंतप्रधान 2 कोटी पत्र लिहिणार
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement