एक्स्प्लोर

Shri Ram Note : आता 500 च्या नोटेवर प्रभू श्रीरामाचा फोटो? RBI कडून नवीन नोट जारी? सत्य काय

500 Note Viral Fact Check : सध्या सोशल मीडियावर प्रभू श्रीरामाचा फोटो असलेला 500 रुपयांचा फोटो व्हायरल होत आहे. आरबीआयने (RBI) 500 रुपयांची नवी नोट जारी केल्याचा दावा केला जात आहे.

Shri Ram 500 Currency Note : सध्या सोशल मीडियावर (Social Media) प्रभू श्रीरामाचा (Shri Ram) फोटो (Photo) असलेली 500 रुपयांची नोट (Currency Note) खूप चर्चेत आहे. आरबीआय (RBI) 500 रुपयांची नवीन नोट जारी केल्याची सोशल मीडीयावर चर्चा आहे. अयोध्येत राम मंदिरात 22 जानेवारीला रामललाची प्राणप्रतिष्ठा कार्यक्रम पार पडणार आहे. त्याआधी सध्या सोशल मीडियावर प्रभू श्रीरामाचा फोटो असलेला 500 रुपयांचा फोटो व्हायरल होत आहे. भारतीय रिझर्व्ह बँक (Reserve Bank of India) ने 500 रुपयांची नवी नोट जारी केल्याचा दावा केला जात आहे. मेटाच्या मालकीचं सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामवर काही पोस्टमध्ये असा दावा करण्यात आला आहे. यामागचं सत्य काय आहे, हे जाणून घ्या. 

आता 500 च्या नोटेवर प्रभू श्रीरामाचा फोटो?

रामललाचा प्राणप्रतिष्ठा विधींना सुरुवात झाली असून 22 जानेवारीला हा सोहळा संपन्न होईल. गुन्हेगार या संधीचा पुरेपूर फायदा घेताना दिसत आहेत. राम मंदिराच्या नावाखाली दररोज फसवणूक होत असल्याची अनेक प्रकरणे समोर आली आहेत. आता प्रभू श्रीराम आणि राम मंदिराची फोटो असलेली 500 रुपयांची नोट सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनली आहे. पण आरबीआयने खरोखरच राम मंदिराचा फोटो असलेली 500 रुपयांची नवीन नोट जारी केली आहेत का? जर तुम्हालाही अशी नोट मिळाली असेल तर यामागचं सत्य जाणून घ्या.

RBI कडून 500 रुपयाची नवीन नोट जारी?

राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर 500 रुपयांच्या नव्या नोटेचा फोटो व्हायरल होत आहे, ज्यामध्ये महात्मा गांधींऐवजी भगवान श्रीरामाचा फोटो आहे. रामललाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यापूर्वी सरकारने नवीन 500 रुपयांच्या नोटांवरून महात्मा गांधींचा फोटो काढून त्याजागी भगवान श्रीरामाचे फोटो लावल्याचा दावा केला जात आहे. 

व्हायरल नोट खरी की खोटी?

फॅक्ट चेक करणाऱ्या वेबसाइटने या प्रकरणी सत्य तपासण्याचा प्रयत्न केला असता महत्त्वाची बाब समोर आली आहे. प्रभू श्री रामाच्या फोटोसह व्हायरल होत असलेल्या 500 रुपयांच्या नोटांचा फोटो एडिट केलेला आणि बनावट असल्याचे फॅक्ट चेक आढळून आलं. नोटांवरील महात्मा गांधींचा फोटो बदलण्याबाबत कोणताही निर्णय झालेला नाही.

व्हायरल नोटेमागचं सत्य काय?

आरबीआयच्या वेबसाईटवर माहितीनुसार, बँकेच्या नोटांमधील बदलांबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. आरबीआयच्या वेबसाइटवर उपलब्ध माहितीनुसार, सध्याच्या 2000 रुपयांची नवीन मालिकेतील 500, 200, 100, 50, 20 आणि 10 रुपयांच्या नोटांवर महात्मा गांधींचाच फोटो असेल.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

''कोणत्या वस्तीवर कोणतं कुत्र भुंकतं अन् कोणतं गप्प बसतं हे सुद्धा सांगू शकतो''; शहाजी बापूंविरुद्ध ठोकला शड्डू
''कोणत्या वस्तीवर कोणतं कुत्र भुंकतं अन् कोणतं गप्प बसतं हे सुद्धा सांगू शकतो''; शहाजी बापूंविरुद्ध ठोकला शड्डू
Nashik Assembly Election : नाशिक जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 15 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
नाशिक जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 15 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
पुण्यात आरपीआय आठवले गटाला खिंडार! राजीनामा दिलेल्या माजी उपमहापौरांची महायुतीविरोधी भूमिका, मतदान न करण्याची दिली शपथ
पुण्यात आरपीआय आठवले गटाला खिंडार! राजीनामा दिलेल्या माजी उपमहापौरांची महायुतीविरोधी भूमिका, मतदान न करण्याची दिली शपथ
विधानसभेतही 'सांगली पॅटर्न',  अपक्ष उमेदवार जयश्री पाटलांना निवडून देण्याचं विशाल पाटलांचं आवाहन
विधानसभेतही 'सांगली पॅटर्न',  अपक्ष उमेदवार जयश्री पाटलांना निवडून देण्याचं विशाल पाटलांचं आवाहन
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Bhau Kadam : अभिनेते भाऊ कदम राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे स्टार प्रचारकABP Majha Headlines :  3 PM : 05 November 2024 : एबीपी माझा हेडलाईन्स : ABP MajhaABP Majha Marathi News Headlines 2PM TOP Headlines 2 PM 05 November 2024Uddhav Thackeray Radhanagri Speech : शिवरायांचं मंदिर ते मुलांना मोफत शिक्षण; ठाकरेंची मोठी आश्वासनं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
''कोणत्या वस्तीवर कोणतं कुत्र भुंकतं अन् कोणतं गप्प बसतं हे सुद्धा सांगू शकतो''; शहाजी बापूंविरुद्ध ठोकला शड्डू
''कोणत्या वस्तीवर कोणतं कुत्र भुंकतं अन् कोणतं गप्प बसतं हे सुद्धा सांगू शकतो''; शहाजी बापूंविरुद्ध ठोकला शड्डू
Nashik Assembly Election : नाशिक जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 15 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
नाशिक जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 15 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
पुण्यात आरपीआय आठवले गटाला खिंडार! राजीनामा दिलेल्या माजी उपमहापौरांची महायुतीविरोधी भूमिका, मतदान न करण्याची दिली शपथ
पुण्यात आरपीआय आठवले गटाला खिंडार! राजीनामा दिलेल्या माजी उपमहापौरांची महायुतीविरोधी भूमिका, मतदान न करण्याची दिली शपथ
विधानसभेतही 'सांगली पॅटर्न',  अपक्ष उमेदवार जयश्री पाटलांना निवडून देण्याचं विशाल पाटलांचं आवाहन
विधानसभेतही 'सांगली पॅटर्न',  अपक्ष उमेदवार जयश्री पाटलांना निवडून देण्याचं विशाल पाटलांचं आवाहन
Solapur Assembly Election : सोलापूर जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 11 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
Solapur Assembly Election : सोलापूर जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 11 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
राष्ट्रवादीचा स्टार प्रचारक होताच भाऊ कदमनं व्यक्त केली इच्छा; अजित पवार मुख्यमंत्री व्हायला हवेत, शरद पवार-अजितदादांनी एकत्र यावं
अजित पवार मुख्यमंत्री व्हायला हवेत, शरद पवार-अजितदादांनी एकत्र यावं; राष्ट्रवादीचा स्टार प्रचारक होताच भाऊ कदमनं व्यक्त केली इच्छा
Satej Patil Radhanagari Speech :   भर मंचावर सतेज पाटलांना समोर बोलावलं, राधानगरीत मोठी जबाबदारी
भर मंचावर सतेज पाटलांना समोर बोलावलं, राधानगरीत मोठी जबाबदारी
Uddhav Thackeray: कोल्हापूरच्या सभेत उद्धव ठाकरेंची पाच मोठी गेमचेंजर आश्वासनं; मुलांना मोफत शिक्षण, मुंबईत घरं ते स्थिर भाव
कोल्हापूरच्या सभेत उद्धव ठाकरेंची पाच मोठी गेमचेंजर आश्वासनं; मुलांना मोफत शिक्षण, मुंबईत घरं ते स्थिर भाव
Embed widget