श्रीकृष्ण मंदिर मथुरेत नाहीतर लाहोरमध्ये होणार का?; उत्तर प्रदेश सरकारच्या मंत्र्याचे वक्तव्य
Laxmi Narayan Chaudhary Statement: उत्तर प्रदेशचे कॅबिनेट मंत्री लक्ष्मीनारायण चौधरी मथुरेतील श्रीकृष्ण मंदिराबाबत वक्तव्य केले आहे.
Laxmi Narayan Chaudhary Statement On Shri Krishna Temple: भगवान श्रीकृष्ण यांचे मंदिर मथुरेत नव्हे तर काय पाकिस्तानच्या लाहोरमध्ये होणार का, असा उलट प्रश्न उत्तर प्रदेशचे कॅबिनेट मंत्री चौधरी लक्ष्मी नारायण यांनी केला. उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य आणि अन्य एका मंत्र्याने काही दिवसांपूर्वी मथुरेत श्रीकृष्ण मंदिर उभारण्याच्या अनुषंगाने वक्तव्य केले होते. त्याबाबत पत्रकरांनी नारायण यांना प्रश्न केले होते.
उत्तर प्रदेशमधील आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यात धार्मिक ध्रुवीकरणाला वेग आला असल्याची चर्चा जोर पकडत आहे. अयोध्येनंतर काशी, मथुरा हे पुढील लक्ष्य असल्याचे भाजप नेत्यांनी म्हटले होते. मथुरेतील शाही ईदगाहच्या स्थानावर भगवान श्रीकृष्ण यांचे जन्मस्थान होते असे मानले जाते. या ठिकाणी भगवान श्रीकृष्ण यांचे भव्य मंदिर उभारणार असल्याचे वक्तव्य हिंदुत्ववादी संघटना, भाजप नेत्यांकडून करण्यात आले आहे.
काय म्हणाले चौधरी लक्ष्मी नारायण?
सध्या ज्या ठिकाणी शाही ईदगाह आहे, तिथे पूर्वी कंसाचा तुरुंग होता आणि त्याच तुरुंगात माता देवकी आणि वासुदेवांचे आठवे अपत्य भगवान श्रीकृष्ण जन्माला आले, तिथे त्यांचे मंदिर बांधले जावे, असे नारायण यांनी म्हटले. ''भगवान श्रीकृष्णाचे मंदिर मथुरेत नाही तर ते लाहोरमध्ये बांधले जाईल का?'' ते म्हणाले की, भगवान श्रीकृष्णाचा जन्म मथुरेत झाला तेव्हा त्यांचे मंदिरही येथेच बांधले जावे, असेही त्यांनी म्हटले.
वादग्रस्त वक्तव्याची सुरुवात कधी झाली?
नोव्हेंबर महिन्यात अखिल भारतीय हिंदू महासभेच्या अध्यक्षा राज्यश्री चौधुरी यांनी सहा डिसेंबर रोजी श्रीकृष्ण जन्मभूमी परिसरातील शाही ईदगाहमध्ये भगवान श्रीकृष्ण यांना जलाभिषेक करणार असल्याची घोषणा केली होती. या घोषणेनंतर तणाव वाढला. त्यानंतर जिल्हा प्रशासनाने परिसरात विविध कारणांसाठी २४ नोव्हेंबर ते २१ जानेवारी या कालावधीत अशा प्रकारच्या कार्यक्रमाच्या आयोजनावर बंदी घातली होती.
इतर महत्त्वाच्या बातम्या:
महागाईचा भडका उडणार? आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूड ऑईलच्या किंमतीत वाढ
सर्वाधिक विषमता असणाऱ्या देशांमध्ये भारताचा समावेश; एक टक्के लोकांकडे 22 टक्के संपत्ती
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha