एक्स्प्लोर
जीपवर बांधलेल्या 'त्या' काश्मिरी तरुणाला 10 लाखांची भरपाई
![जीपवर बांधलेल्या 'त्या' काश्मिरी तरुणाला 10 लाखांची भरपाई Shrc Directs Pdp Bjp Goverment To Pay Rs 10 Lakh As Compensation To Human Shield Victim In Kashmir Latest Update जीपवर बांधलेल्या 'त्या' काश्मिरी तरुणाला 10 लाखांची भरपाई](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/07/10172853/Farooq-Ahmad-Dar-Stone-pelting-Kashmir.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
नवी दिल्ली : जम्मू काश्मीरमध्ये दगडफेक करणाऱ्यांपासून बचावासाठी जीपच्या बोनेटवर बांधलेल्या काश्मिरी तरुणाला भरपाई मिळणार आहे. राज्य मानवी हक्क आयोगाने फारुक अहमद दर या तरुणाला दहा लाख रुपयांची भरपाई देण्याचे आदेश जम्मू आणि काश्मीर सरकारला दिले आहेत.
9 एप्रिल रोजी दगडफेक करणाऱ्यांपासून बचाव करण्यासाठी जीपच्या बोनेटवर काश्मिरी तरुणाला बांधल्याचं मेजर लितुल गोगोई यांनी सांगितलं होतं. गोगोई यांचा भारतीय सैन्यातर्फे सत्कार करण्यात आला होता. मात्र मेजर गोगोई यांच्यावर टीकेची झोड उठली होती.
फारुक अहमद दर हा जम्मू काश्मीरमधील कशिदा कारागीर आहे. 'एका अधिकाऱ्याने तुमच्या मुलाला जीपसमोर बांधलं असतं, तर त्याचाही तुम्ही सत्कार केला असतात का, हे मला पहायचं आहे' असं गोगोई यांचा सत्कार केल्यानंतर फारुकने सैन्याला उद्देशून म्हटलं होतं.
'त्या' दिवशी मी दगडफेक करणं तर दूरच, साधा दगड उचलला होता, हे सिद्ध करुन दाखवा, असं आव्हान फारुक दरने केलं होतं. श्रीनगरमधील पोटनिवडणुकांतील मतदारांपैकी आपण एक असल्याचा पुनरुच्चार त्याने केला.
काय आहे प्रकरण?
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
महाराष्ट्र
क्रीडा
आरोग्य
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)