एक्स्प्लोर

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे भेटीगाठींसाठी दिल्ली दौऱ्यावर, सर्वोच्च न्यायालयात सेना राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणी सुनावणी, राजधानीत मोठ्या घडामोडी

Maharashtra Political Crisis : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दिल्लीच्या दौऱ्यावर आहेत. त्याच दरम्यान सर्वोच्च न्यायालयात आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी होणार आहे. 

नवी दिल्ली : महाराष्ट्राचे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या निर्णयाला आव्हान देत उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्यासमोर दोन्ही पक्षांच्या याचिकांवर स्वतंत्रपणे सुनावणी घेण्यात येणार आहे. याच दरम्यान विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या भेटीगाठींसाठी उद्धव ठाकरे देखील दिल्लीत आहेत.   

सेना राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणात सुनावणी

महाराष्ट्रातील सत्ता संघर्षात महत्त्वाचं ठरलेल्या आमदार अपात्रता प्रकरणाचा निर्णय सर्वोच्च न्यायालयानं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर सोपवला होता. आमदार अपात्रता प्रकरणासाठी सर्वोच्च न्यायालयानं काही निकष देखील घालून दिले होते. राहुल नार्वेकर यांनी त्यांचा निकाल देताना शिवसेनेच्या दोन्ही गटाच्या आमदारांना पात्र ठरवलं होतं. तर, जुलै 2023 मध्ये शिवसेनेप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली. यावेळी देखील राहुल नार्वेकर  यांच्याकडे आमदार अपात्रता प्रकरणी याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. राहुल नार्वेकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटाच्या आमदारांना पात्र ठरवलं होतं. या निर्णयाविरुद्ध ठाकरे गट आणि शरद पवार यांच्या नेतृत्त्वातील पक्षानं सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. 

सर्वोच्च न्यायालयानं यापूर्वी झालेल्या सुनावणीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रकरणात अजित पवार यांच्या गटाला नोटीस जारी केली होती. त्यामुळं  सुनावणीत अजित पवार यांच्या नेतृत्त्वातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी नोटिशीला उत्तर दिलं आहे का ते पाहावं लागणार आहे. 

राज्यातील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस संदर्भातील निवडणूक आयोगानं दिलेल्या निर्णयाविरोधातील याचिका देखील सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहेत. त्यावर देखील सुनावणी कधी होणार याकडे सर्वंचं लक्ष लागलं आहे. 

उद्धव ठाकरे दिल्ली दौऱ्यावर 

उद्या उद्धव ठाकरे दुपारी दिल्ली येथे पोहोचतील. ठाकरे तीन दिवसांच्या दिल्ली दौऱ्यात इंडिया आघाडीतील महत्त्वाच्या नेत्यांच्या भेटी घेणार आहेत. यामध्ये सोनिया गांधी,  मलिकार्जुन खरगे, आप आणि टीएमसीच्या नेत्यांच्या भेटी उद्धव ठाकरे घेणार आहेत.  महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांची देखील भेट उद्धव ठाकरे घेतील. तीन दिवसांमध्ये  मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानी सुद्धा उद्धव ठाकरे भेटीसाठी जाणार असल्याची माहिती आहे.  

लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर  पहिल्यांदाच उद्धव ठाकरे  दिल्ली दौरा करून इंडिया आघाडीतील महत्त्वाचे नेत्यांच्या भेटी घेणार आहेत. उद्धव ठाकरे यांच्यासोबत आदित्य ठाकरे आणि रश्मी ठाकरे सुद्धा दिल्ली दौऱ्यात असतील. 

संबंधित बातम्या :

Manoj Jarange : बांगलादेशच्या सत्ताधाऱ्यांपेक्षा राज्यातल्या सत्ताधाऱ्यांना जास्त मस्ती, बांगलादेशपासून धडा घेतला पाहिजे: मनोज जरांगे

Manoj Jarange : आरक्षण कशासाठी लागतं हे माहिती नाही, आंदोलकांनी कोणालाही किंमत देऊ नये; मनोज जरांगेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Video : 750 प्रवासी ताटकळले, वंदे भारतला मालगाडीचे इंजिन लागले; व्हिडिओ व्हायरल, रेल्वेचं स्पष्टीकरण
Video : 750 प्रवासी ताटकळले, वंदे भारतला मालगाडीचे इंजिन लागले; व्हिडिओ व्हायरल, रेल्वेचं स्पष्टीकरण
Sambhajiraje chhatrapati: ... तर समोरासमोर बोलू; संभाजीराजेंचं धनंजय मुंडेंना चॅलेंज; कसले कार्यक्रम घेता, म्हणत डिवचलं
... तर समोरासमोर बोलू; संभाजीराजेंचं धनंजय मुंडेंना चॅलेंज; कसले कार्यक्रम घेता, म्हणत डिवचलं
लालबागच्या राजाचरणी भक्तांकडून भरभरुन दान, सोनं-चांदीसह दोन दिवसांत किती ?
लालबागच्या राजाचरणी भक्तांकडून भरभरुन दान, सोनं-चांदीसह दोन दिवसांत किती ?
चला गणपती बघायला... मुंबईत गणेशभक्तांसाठी मोठा निर्णय; मेट्रोच्या फेऱ्या वाढवल्या; जाणून घ्या टाईमटेबल
चला गणपती बघायला... मुंबईत गणेशभक्तांसाठी मोठा निर्णय; मेट्रोच्या फेऱ्या वाढवल्या; जाणून घ्या टाईमटेबल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Prakash Ambedkar : प्रकाश आंबेडकरांनी दिले राज्यात तिसऱ्या आघाडीचे संकेतAmit Shah Special Report : भाजपचे चाणक्य शाहांचा मुंबई दौरा, महायुतींच्या नेत्यांच्या घेतल्या बैठकाTOP 25 News : सुपरफास्ट बातम्यांचा वेगवान आढावा : 09 Sep 2024 : ABP MajhaJarange Vs Rajendra Raut Special Report:जरांगे विरुद्ध राजेंद्र राऊत वाद, राजकारणाला नवं वळण देणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Video : 750 प्रवासी ताटकळले, वंदे भारतला मालगाडीचे इंजिन लागले; व्हिडिओ व्हायरल, रेल्वेचं स्पष्टीकरण
Video : 750 प्रवासी ताटकळले, वंदे भारतला मालगाडीचे इंजिन लागले; व्हिडिओ व्हायरल, रेल्वेचं स्पष्टीकरण
Sambhajiraje chhatrapati: ... तर समोरासमोर बोलू; संभाजीराजेंचं धनंजय मुंडेंना चॅलेंज; कसले कार्यक्रम घेता, म्हणत डिवचलं
... तर समोरासमोर बोलू; संभाजीराजेंचं धनंजय मुंडेंना चॅलेंज; कसले कार्यक्रम घेता, म्हणत डिवचलं
लालबागच्या राजाचरणी भक्तांकडून भरभरुन दान, सोनं-चांदीसह दोन दिवसांत किती ?
लालबागच्या राजाचरणी भक्तांकडून भरभरुन दान, सोनं-चांदीसह दोन दिवसांत किती ?
चला गणपती बघायला... मुंबईत गणेशभक्तांसाठी मोठा निर्णय; मेट्रोच्या फेऱ्या वाढवल्या; जाणून घ्या टाईमटेबल
चला गणपती बघायला... मुंबईत गणेशभक्तांसाठी मोठा निर्णय; मेट्रोच्या फेऱ्या वाढवल्या; जाणून घ्या टाईमटेबल
नेरळ तिहेरी हत्याकांडात भाऊ, वहिनी आणि मित्राला अटक;  दृश्यम चित्रपट, क्राईम पेट्रोल मालिका पाहून रचला कट
नेरळ तिहेरी हत्याकांडात भाऊ, वहिनी आणि मित्राला अटक;  दृश्यम चित्रपट, क्राईम पेट्रोल मालिका पाहून रचला कट
स्कॉर्पिओला टक्कर, हुंडईची अल्काझार SUV लाँच; 9 रंगात, शानदार रुबाबात
स्कॉर्पिओला टक्कर, हुंडईची अल्काझार SUV लाँच; 9 रंगात, शानदार रुबाबात
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 सप्टेंबर 2024 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 सप्टेंबर 2024 | सोमवार
धक्कादायक... नाशिकच्या खासगी रुग्णालयात आढळली गर्भपाताची औषधं, अवैध पद्धतीने सुरु होता वैद्यकीय व्यवसाय
धक्कादायक... नाशिकच्या खासगी रुग्णालयात आढळली गर्भपाताची औषधं, अवैध पद्धतीने सुरु होता वैद्यकीय व्यवसाय
Embed widget