एक्स्प्लोर
शशीकला नटराजन तामिळनाडूच्या नव्या मुख्यमंत्री
चेन्नई : तामिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदी AIADMK च्या सरचिटणीस शशीकला नटराजन विराजमान होणार आहेत. विद्यमान मुख्यमंत्री पनीरसेल्वम यांनी आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. त्यानंतर शशीकला यांची विधिमंडळ्याच्या नेतेपदी एकमताने निवड करण्यात आली.
https://twitter.com/AIADMKOfficial/status/828174837147328513
शशीकला नटराजन यांची AIADMK पक्षाच्या सरचिटणीसपदी 29 डिसेंबरला निवड करण्यात आली होती. जयललिता यांच्या निधनानंतर तामिळनाडूमध्ये मोठ्या प्रमाणात राजकीय उलथापालथ होईल, असा जाणकारांनी अंदाज वर्तविला होता. जयललिता यांच्या निधनानंतर पनीरसेल्वम यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. मात्र, अवघ्या काही महिन्यातच त्यांना मुख्यमंत्री पदावरुन पायउतार व्हावं लागलं.
जयललितांच्या सावलीसारखी वावरणारी शशीकला कोण?
शशीकला नटराजन….जयललितांच्या आयुष्यातली एक रहस्यमय व्यक्ती…या दोघींचं नातं काय होतं हे कुणीच ठाम सांगू शकत नाही…कुणी परममैत्रिण सांगतं, कुणी मानलेल्या बहिणीसारखं सांगतं…तर कुणी…लिव्ह इन कम्पॅनियनही… पण एक आहे की जयललितांच्या प्रत्येक व्यवहाराची, निर्णयाची तिला माहिती असायची…
शशीकला आणि जयललितांची ओळख कशी?
1970 च्या सुमारास शशीकला आणि जयललितांची पहिली भेट झाली. शशीकला नटराजन हिचा पती पीआरओ म्हणून काम करत होता. आणि तो ज्या आयएएस अधिकाऱ्याच्या हाताखाली काम करत होता, तो जयललितांच्या जवळ होता. एका व्हिडिओ शुटिंगच्या निमित्ताने झालेल्या या पहिल्याच भेटीत शशीकलानं जयललितांना जिंकलं. त्यानंतर लवकरच ती जयललितांच्या आयुष्यात एक महत्वाची व्यक्ती बनली.
एमजी रामचंद्रन यांचं निधन झाल्यानंतर तर शशीकलाचा जयललितांवरचा प्रभाव आणखी वाढला. जयललिता तिला आपल्यासोबत बंगल्यावर राहायला घेऊन गेल्या. त्यावेळी शशीकलानं आपल्या मन्नारगुडी गावातल्या 30-35 लोकांची टीम बंगल्यावर तैनात केली. स्वयंपाकी, वॉचमन, मदतनीस, ड्रायव्हर असे सगळे तिच्या गोटातले….एक प्रकारे हे जयललितांच्या भोवती एक जाळं विणल्यासारखंच होतं.
जयललिता पहिल्यांदा मुख्यमंत्री बनल्या 1991 साली….पण पुढच्याच निवडणुकीत त्यांना सत्ता गमवावी लागली. या पहिल्या इनिंगमध्ये त्यांच्या भ्रष्टाचाराची चर्चा अधिक झाली. असं म्हणतात की याला सगळ्यात जास्त कारणीभूत होती शशीकला. शशीकलाच्या कुटुंबातले लोक प्रत्येक सरकारी कामात दलाली खात असल्याचे आरोप झाले. सुब्रमण्यम स्वामी हे तर शशीकलाच्या या गोत्याचा उल्लेख मन्नारगुडी माफिया असाच करायचे.
शिवाय 1995 साली शशीकलानं आपला भाचा सुधाकरन जयललिलांना दत्तकपुत्र म्हणून दिला. सुधाकरनचं लग्न इतक्या थाटात पार पडलं की संपत्तीच्या ओंगळवाण्या प्रदर्शनानं जयललितांची इमेज निगेटीव्ह बनत चालली.
बेनामी संपत्तीच्या केसेसमध्येही जयललिता-शशीकला या दोघींवर एकत्र आरोप झाले. शशीकलाची संगत चांगली नाही असा सल्ला अनेकांनी दिल्यावर जयललितांनी डिसेंबर 2011 मध्ये तिला दूरही केलं. तिच्या नातेवाईकांनाही बंगल्यातून हाकललं. पण हा राग 100 दिवसही टिकला नाही. जयललितांना पुन्हा शशीकलाचा कळवळा आला, आणि त्यांनी तिला माघारी बोलावलं. आता शेवटच्या श्वासापर्यंत शशीकला त्यांच्यासोबतच राहिली.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement