एक्स्प्लोर

3 महिन्यांत पैसे दुप्पट! 'या' कंपनीने एका शेअरवर एक शेअर दिला बोनस, गुंतवणूकदार मालामाल

Share Market News : पद्मा कॉटन यार्न लिमिटेडने (Padma Cotton Yarn Limited) गुंतवणूकदारांसाठी (Investors) बोनस शेअर्सची ( Bonus Shares) घोषणा केली आहे. कंपनीने याबाबतची सविस्तर माहिती दिली आहे.

Share Market News : पद्मा कॉटन यार्न लिमिटेडने (Padma Cotton Yarn Limited) गुंतवणूकदारांसाठी (Investors) बोनस शेअर्सची ( Bonus Shares) घोषणा केली आहे. कंपनीने याबाबतची सविस्तर माहिती दिली आहे. कंपनी प्रति शेअरवर एक शेअर बोनस देण्याचा निर्णय घेतला आहे. पद्मा कॉटन यार्न पहिल्यांदाच अशा प्रकारचे बोनस शेअर्स देत आहे.

कंपनीने 2 डिसेंबर रोजी बोर्डाच्या बैठकीत बोनस शेअर्स देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कंपनी 10 रुपयांच्या दर्शनी मूल्यासह एका शेअरवर एक शेअर बोनस देत आहे. मात्र, बोनस जारी करण्याची तारीख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. मात्र ही संपूर्ण प्रक्रिया 2 महिन्यांत पूर्ण होईल. अशा स्थितीत रेकॉर्ड डेटही लवकरच जाहीर होऊ शकते.

सलग दुसऱ्या दिवशी शेअर्समध्ये तेजी

कंपनीच्या समभागांनी सलग दुसऱ्या कामकाजाच्या दिवशी शेअर्समध्ये तेजी आहे. बीएसईमध्ये आज अपर सर्किट लागू झाल्यानंतर कंपनीच्या शेअर्सची किंमत 254.70 रुपयांवर पोहोचली. याआधी सोमवारीही पद्मा कॉटन यार्नचे शेअर्स अपर सर्किटला आले होते.

आठवडाभरात कंपनीच्या शेअर्समध्ये 10.36 टक्क्यांनी वाढ

कंपनीचे समभाग धारण करणाऱ्या गुंतवणूकदारांच्या दृष्टीकोनातून पाहिल्यास मागील एक आठवडा चांगला गेला आहे. या कालावधीत कंपनीच्या शेअर्समध्ये 10.36 टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्याच वेळी, अवघ्या 3 महिन्यांत कंपनीच्या स्थितीतील गुंतवणूकदारांकडून मिळणारा पैसा 227 टक्क्यांनी वाढला आहे. म्हणजे दुपटीहून अधिक नफा मिळाला आहे. कंपनीच्या शेअर्सची किंमत 6 महिन्यांत 620 टक्क्यांनी वाढली आहे

गुंतवणूकदारांना आतापर्यंत किती नफा?

दोन वर्षांपूर्वी पद्मा कॉटन यार्नचे शेअर्स असलेल्या गुंतवणूकदारांना आतापर्यंत 1850 टक्के नफा झाला आहे. त्याच वेळी, हा स्टॉक 3 वर्षात 2689 टक्के परतावा देण्यात यशस्वी ठरला आहे. तर या काळात सेन्सेक्स 97.98 टक्क्यांनी वाढला आहे. बीएसईमध्ये कंपनीची 52 आठवड्यांची उच्च पातळी 254.70 रुपये आहे आणि 52 आठवड्यांची निम्न पातळी प्रति शेअर 32.02 रुपये आहे.

गेल्या काही दिवसापासून शेअर मार्टेमध्ये तेजी

दरम्यान, गेल्या काही दिवसापासून शेअर मार्टेमध्ये तेजी असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. याचा मोठा फायदा गुंतवणूकदारांना होत असल्याचे दिसत आहे. ज्या ज्या कंपन्यांना चांगला नफा झाला आहे, अशा कंपन्या गुंतवणूकदारांना चांगला नफा देत आहेत. त्यामुळं गुंतवणूकदार मालामाल होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. अशातच पद्मा कॉटन यार्न लिमिटेडने (Padma Cotton Yarn Limited)  या कंपनीला देखील मोठा फायदा झाला आहे. त्यामुळं कंपनीने गुंतवणुकदारांना एका शेअर्सवर एक शेअर बोनस देण्याचा निर्णय घेतला आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Devendra Fadnavis : फडणवीसांच्या शपथविधीला उद्धव ठाकरेंना निमंत्रण, 19 राज्याच्या मुख्यमंत्र्यांनाही आवताण, महायुतीकडून जय्यत तयारी!
फडणवीसांच्या शपथविधीला उद्धव ठाकरेंना निमंत्रण, 19 राज्याच्या मुख्यमंत्र्यांनाही आवताण, महायुतीकडून जय्यत तयारी!
5 डिसेंबरला आझाद मैदानावर शिवसेनेकडून कोण-कोण शपथ घेणार? संभाव्य यादी जाहीर
5 डिसेंबरला आझाद मैदानावर शिवसेनेकडून कोण-कोण शपथ घेणार? संभाव्य यादी जाहीर
Gold Silver Price : सोन्या चांदीला पुन्हा एकदा झळाळी! जाणून घ्या कोणत्या शहरात किती दर? 
सोन्या चांदीला पुन्हा एकदा झळाळी! जाणून घ्या कोणत्या शहरात किती दर? 
Adani Stocks : अदानी पोर्टसच्या शेअरमध्ये उसळी, एका दिवसात मार्केट कॅप 20 हजार कोटींनी वाढली,गुंतवणूकदार मालामाल
Adani Stocks : अदानी पोर्टसच्या शेअरमध्ये उसळी,गुंतवणूकदार मालामाल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 4 PM : 3 डिसेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सBJP Ministers List : भाजपची मंत्रिपदाची संभाव्य यादी समोर, ‘या’ नेत्यांना संधीEVM Expert Exclusive :  ईव्हिएमचा संशयकल्लोळ; तज्ज्ञांचा शेरा काय ?Eknath Shinde Jupiter Hospital : पांढऱ्या पेशी कमी जास्त होत असल्याने अजूनही उपचार सुरू

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Devendra Fadnavis : फडणवीसांच्या शपथविधीला उद्धव ठाकरेंना निमंत्रण, 19 राज्याच्या मुख्यमंत्र्यांनाही आवताण, महायुतीकडून जय्यत तयारी!
फडणवीसांच्या शपथविधीला उद्धव ठाकरेंना निमंत्रण, 19 राज्याच्या मुख्यमंत्र्यांनाही आवताण, महायुतीकडून जय्यत तयारी!
5 डिसेंबरला आझाद मैदानावर शिवसेनेकडून कोण-कोण शपथ घेणार? संभाव्य यादी जाहीर
5 डिसेंबरला आझाद मैदानावर शिवसेनेकडून कोण-कोण शपथ घेणार? संभाव्य यादी जाहीर
Gold Silver Price : सोन्या चांदीला पुन्हा एकदा झळाळी! जाणून घ्या कोणत्या शहरात किती दर? 
सोन्या चांदीला पुन्हा एकदा झळाळी! जाणून घ्या कोणत्या शहरात किती दर? 
Adani Stocks : अदानी पोर्टसच्या शेअरमध्ये उसळी, एका दिवसात मार्केट कॅप 20 हजार कोटींनी वाढली,गुंतवणूकदार मालामाल
Adani Stocks : अदानी पोर्टसच्या शेअरमध्ये उसळी,गुंतवणूकदार मालामाल
Uddhav Thackeray: एकनाथ शिंदेच्या पाठिशी दिल्लीतील भाजपची मोठी शक्ती; मुंबईतील नगरसेवकांच्या बैठकीत उद्धव ठाकरेंचं वक्तव्य
एकनाथ शिंदेच्या पाठिशी दिल्लीतील भाजपची मोठी शक्ती; मुंबईतील नगरसेवकांच्या बैठकीत उद्धव ठाकरेंचं वक्तव्य
Shambhuraj Desai:'मुख्यमंत्र्यांच्या आजारपणाचे वेगळे अर्थ काढाल तर..'शंभूराज देसाईंचा विरोधकांचा इशारा म्हणाले..
'मुख्यमंत्र्यांच्या आजारपणाचे वेगळे अर्थ काढाल तर..'शंभूराज देसाईंचा विरोधकांचा इशारा म्हणाले..
मोठी बातमी! विधीमंडळाचा गटनेता हाच महायुतीचा मुख्यमंत्री; भाजपच्या गटनेते निवडीचा मुहूर्तही ठरला
विधीमंडळाचा गटनेता हाच महायुतीचा मुख्यमंत्री; भाजपच्या गटनेते निवडीचा मुहूर्तही ठरला! 
मोठी बातमी : शपथविधीबाबत मंत्रालयात मोठ्या हालचाली, मुख्य सचिवांच्या दालनात उच्चस्तरीय बैठक, भाजपचे बडे नेते रवाना
मोठी बातमी : शपथविधीबाबत मंत्रालयात मोठ्या हालचाली, मुख्य सचिवांच्या दालनात उच्चस्तरीय बैठक, भाजपचे बडे नेते रवाना
Embed widget