एक्स्प्लोर

शरद पवार-प्रशांत किशोर यांच्यात कुठली खलबतं? काँग्रेस वगळता तिसरी आघाडी उभी करण्याचा प्रयत्न?  

 2024 च्या निवडणुकीला अजून तीन वर्षे आहेत पण राष्ट्रीय राजकारणात विरोधी पक्षनेत्यांची एक जूट बांधण्यासाठी जोरदार हालचाली सुरू आहेत आणि या सगळ्याच्या केंद्रस्थानी आहेत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार. शरद पवार आणि प्रशांत किशोर अवघ्या दहा दिवसांच्या आत दोघे दुसऱ्यांदा भेटले.

नवी दिल्ली :  2024 च्या निवडणुकीला अजून तीन वर्षे आहेत पण राष्ट्रीय राजकारणात विरोधी पक्षनेत्यांची एक जूट बांधण्यासाठी जोरदार हालचाली सुरू आहेत आणि या सगळ्याच्या केंद्रस्थानी आहेत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार. शरद पवार आणि प्रशांत किशोर अवघ्या दहा दिवसांच्या आत दोघे दुसऱ्यांदा भेटले. 11 जूनला मुंबईत आणि आज दिल्लीत. पाठोपाठ उद्या राष्ट्रीय राजकारणातले 15 विरोधी पक्ष नेते पवारांच्या घरी एकवटत आहेत.. यशवंत सिन्हा यांनी स्थापन केलेल्या राष्ट्रीय मंचाच्या बॅनरखाली हे सगळे विरोधी पक्ष एक येत आहेत.

उद्या सकाळी राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांची एक बैठक होणार आहे आणि संध्याकाळी चार वाजता विरोधी पक्षनेते पवारांच्या घरी एकत्र येतील.  2024 च्या निवडणुकीला अजून तीन वर्ष बाकी आहेत..पण पश्चिम बंगाल मध्ये ममतांनी ज्या पद्धतीने भाजपला टक्कर दिली त्यानंतर भाजपला सक्षम पर्याय देण्यासाठी काँग्रेस वगळता इतरांनी एकत्र येण्याची गरज आहे का याबाबत या हालचाली सुरू आहेत.. उद्याच्या बैठकीसाठी काँग्रेसचा कुणी प्रतिनिधी उपस्थित असेल हे अद्याप तरी स्पष्ट झालेलं नाही.

मार्च महिन्यात संसदेचं अधिवेशन संपल्यानंतर पवार तीन महिन्यांच्या कालावधीनंतर दिल्लीत आले. मधल्या काळात त्यांच्यावर झालेल्या शस्त्रक्रियेमुळे त्यांचे सार्वजनिक जीवनातले कार्यक्रम मंदावले होते.. पण आज दिल्लीत आल्यानंतर ते पुन्हा चर्चेच्या केंद्रस्थानी आहेत. एकीकडे काँग्रेसला अजून पूर्णवेळ अध्यक्ष नाही. सोनिया गांधींची प्रकृती ठीक नसल्याने यूपीएच्या भवितव्याबद्दल शंका व्यक्त होतात... त्यात पवारांची ही खेळी काँग्रेसला वगळून देशात तिसरी आघाडी निर्माण करणार का हे पाहावे लागेल.

यांची असणार उपस्थिती 

शरद पवारांच्या निवासस्थानी विरोधी पक्षांतील महत्वाच्या नेत्यांसह माजी निवडणूक आयुक्त, विचारवंत देखील असणार आहेत, अशी माहिती आहे. 

1) यशवंत सिंन्हा
2) पवन वर्मा
3) संजय सिंग
4) डी.राजा
5) फारुख अब्दुला
6) जस्टीस ए. पी.शाह
7) जावेद अख्तर
8) के सी तुलसी
9) करन थापर
10) आशुतोष
11)माजीद मेमन
12) वंदना चव्हाण
13) एस वाय कुरेशी (Former CEC)
14) के सी सिंग
15) संजय झा
16) सुधींद्र कुलकर्णी
17) अरुण कुमार, Economist
18) कोलिन गोंन्सालविस
19) घनश्याम तिवारी
20) प्रीतिश नंदी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Hemant Godse : एक हजार एक टक्के मलाच उमेदवारी! मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर हेमंत गोडसेंचं मोठं वक्तव्य, नाशिकची उमेदवारी फिक्स?
एक हजार एक टक्के मलाच उमेदवारी! मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर हेमंत गोडसेंचं मोठं वक्तव्य, नाशिकची उमेदवारी फिक्स?
OBC Bahujan Party on Shahu Maharaj : शाहू महाराजांना आणखी एका पक्षाकडून जाहीर पाठिंबा; कोल्हापुरात येऊन भेट सुद्धा घेणार
शाहू महाराजांना आणखी एका पक्षाकडून जाहीर पाठिंबा; कोल्हापुरात येऊन भेट सुद्धा घेणार
Harshvardhan Patil : इंदापूरबाबत योग्य ती भूमिका घेऊ, आता बारामतीत अजित पवारांना मदत करा; फडणवीसांसोबतच्या बैठकीनंतर हर्षवर्धन पाटलांचे सूर बदलले
विजय शिवतारेंनंतर आता हर्षवर्धन पाटलांचे सूर बदलले; बारामतीत अजित पवारांना मदत करणार, पण...
Satej Patil on Dhananjay Mahadik : मुन्ना महाडिकांसोबत नेमका वाद काय? बंटी पाटलांचं पहिल्यांदाच उत्तर
Video : मुन्ना महाडिकांसोबत नेमका वाद काय? बंटी पाटलांचं पहिल्यांदाच उत्तर!
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Sharad Pawar - Sanjay Raut : काँग्रेसची नाराजी; 'मैत्रीपूर्ण'साठी राजी ?Harshwardhan Patil : प्रत्येक पक्षाने युती धर्म पाळलाच पाहिजे - हर्षवर्धन पाटीलMahayuti : ठाण्यात हेमंत गोडसेंची श्रीकांत शिंदेंसोबत चर्चा , महायुतीत नाशिकच्या जागेचा तिढा कायमABP Majha Headlines :  06 PM : 29 March 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hemant Godse : एक हजार एक टक्के मलाच उमेदवारी! मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर हेमंत गोडसेंचं मोठं वक्तव्य, नाशिकची उमेदवारी फिक्स?
एक हजार एक टक्के मलाच उमेदवारी! मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर हेमंत गोडसेंचं मोठं वक्तव्य, नाशिकची उमेदवारी फिक्स?
OBC Bahujan Party on Shahu Maharaj : शाहू महाराजांना आणखी एका पक्षाकडून जाहीर पाठिंबा; कोल्हापुरात येऊन भेट सुद्धा घेणार
शाहू महाराजांना आणखी एका पक्षाकडून जाहीर पाठिंबा; कोल्हापुरात येऊन भेट सुद्धा घेणार
Harshvardhan Patil : इंदापूरबाबत योग्य ती भूमिका घेऊ, आता बारामतीत अजित पवारांना मदत करा; फडणवीसांसोबतच्या बैठकीनंतर हर्षवर्धन पाटलांचे सूर बदलले
विजय शिवतारेंनंतर आता हर्षवर्धन पाटलांचे सूर बदलले; बारामतीत अजित पवारांना मदत करणार, पण...
Satej Patil on Dhananjay Mahadik : मुन्ना महाडिकांसोबत नेमका वाद काय? बंटी पाटलांचं पहिल्यांदाच उत्तर
Video : मुन्ना महाडिकांसोबत नेमका वाद काय? बंटी पाटलांचं पहिल्यांदाच उत्तर!
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 29 मार्च 2024 | शुक्रवार
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 29 मार्च 2024 | शुक्रवार
'साक्षी भाभीनंतर मी एकच असा व्यक्ती...'; भर कार्यक्रमात एमएस धोनीसमोर जाडेजा हे काय बोलून गेला!
'साक्षी भाभीनंतर मी एकच असा व्यक्ती...'; भर कार्यक्रमात एमएस धोनीसमोर जाडेजा हे काय बोलून गेला!
Sharad Ponkshe : कोणत्या मतदारसंघातून लोकसभा लढवायला आवडेल? शरद पोंक्षेंचं रोखठोक वक्तव्य!
कोणत्या मतदारसंघातून लोकसभा लढवायला आवडेल? शरद पोंक्षेंचं रोखठोक वक्तव्य!
नितेश राणेंची रक्त तपासणी केली पाहिजे, बच्चू कडूंचा हल्लाबोल
नितेश राणेंची रक्त तपासणी केली पाहिजे, बच्चू कडूंचा हल्लाबोल
Embed widget