एक्स्प्लोर
Advertisement
पाकिस्तानला मोठा डोस द्या, पूंछ हल्ल्यावरुन सेहवागची उद्विग्न प्रतिक्रिया
नवी दिल्ली : पाककडून भारतीय जवानांच्या मृतदेहाच्या विटंबनेच्या घटनेनं संपूर्ण देशात संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. या घटनेनंतर पाकला जशाच तसे उत्तर दिलं पाहिजे, अशी भावना व्यक्त होत आहे. यासंदर्भात टीम इंडियाचा धडाकेबाज फलंदाज वीरेंद्र सेहवागनेही आपली उद्विग्न प्रतिक्रिया ट्वीटरच्या माध्यमातून दिली आहे.
वीरेंद्र सेहवाग म्हणतो की, ''दोन भारतीय सैनिकांच्या मृतदेहाची विटंबना झाल्याचं ऐकून तीव्र दु:ख होतं आहे. जवानांचं हौतात्म्य वाया जाता कामा नये. जर (पाकिस्तानला) लहान डोसनं गुण येत नसेल, तर त्यांना मोठा डोस देण्याची गरज आहे.'' पाकिस्तानने काल पहाटे कृष्णा घाटी परिसरात छुप्या पद्धतीने हल्ला केला. या हल्ल्यात भारताचे दोन जवान शहीद झाले. शहीद झालेल्या दोन भारतीय जवानांचा पाकिस्तानी रेंजर्सनी शिरच्छेद केल्याचीही धक्कादायक माहिती समोर आल्यानंतर देशभरातून संपप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. पाकिस्तानच्या बॉर्डर अॅक्शन फोर्स म्हणजेच बॅटनं जवानांच्या मृतदेहाची विटंबना केली. नायब सुभेदार परमजीत सिंह आणि हेड कॉन्स्टेबल प्रेम सागर अशी शहीद झालेल्या भारतीय जवानांनी नावं आहेत. तर तीन गंभीर जखमी जवानांवर उपचार सुरु आहेत. दरम्यान, या घटनेचा निषेध करुन केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांनी या घटनेचा निषेध व्यक्त करुन योग्य ते उत्तर दिलं जाईल, असं म्हणलं आहे. पण मनोहर पर्रिकर यांच्या राजीनाम्यामुळे 50 दिवसांपासून रिक्त झाल्याने, देशाला पूर्णवेळ संरक्षण मंत्री कधी मिळणार, असा प्रश्न उपस्थीत केला जात आहे. संबंधित बातम्याHeartbroken by barbaric killing of2 Indian soldiers.Martyrdom of our soldiers should not go in vain.Need a bigger dose,if small doesn't work
— Virender Sehwag (@virendersehwag) May 2, 2017
पाकच्या दोन लष्करी छावण्या उद्ध्वस्त भारताचं सडतोड उत्तर
पाकिस्तानकडून भारतीय जवानांच्या मृतदेहाची विटंबना
शहीद परमजीत सिंह यांना अखेरचा निरोप, अंत्यसंस्कारासाठी कुुटुंबीय राजी
देशाला पूर्णवेळ संरक्षणमंत्री कधी मिळणार?
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement