Seema Haider Pakistani Woman in Noida : पाकिस्तानातून (Pakistan) भारतात पळून आलेल्या सीमा हैदरच्या (Seema Haider) अडचणी वाढू शकतात. सीमा हैदर प्रेमासाठी भारतात (India Pakistan Love Story) आल्याचा दावा करत असली, तरी तिच्यावर संशयाची सुई कायम आहे. याचा दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहेत. सीमा हैदर आणि तिचा पती सचिन मीणा या प्रकरणात सध्या तपास सुरु आहे. नोएडा पोलीस आणि उत्तर प्रदेशत एटीएस या प्रकरणाचा तपास करत आहेत. आता या प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. ज्यामुळे सीमा हैदरच्या अडचणीत आणखी वाढ होऊ शकते. लवकरचा सीमा हैदर प्रकरणात महत्त्वाच्या अहवाल हाती येणार आहे. 


नोएडा पोलीस आरोपपत्र दाखल करण्याच्या तयारीत


नोएडा पोलिसांचा सीमा हैदरविरुद्धचा तपास जवळपास पूर्ण झाल्याची माहिती समोर येत आहे. सीमा हैदरच्या पाकिस्तानातून भारतात बेकायदेशीर प्रवेश केल्याप्रकरणी नोएडा पोलीस लवकरच न्यायालयात आरोपपत्र दाखल करू शकतात. पाकिस्तानातून नेपाळमार्गे भारतात पोहोचलेली सीमा हैदर उत्तर प्रदेशातील ग्रेटर नोएडामध्ये पोहोचली होती. सीमा हैदर ग्रेटर नोएडामधील राबुपुरा येथे वास्तव्यास असताना एक मोठी माहिती समोर येत आहे. सीमा हैदर बेकायदेशीरपणे भारतात पोहोचल्याप्रकरणी नोएडा पोलीस तपास पूर्ण करून न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्याच्या तयारीत आहे.


पाकिस्तानी सीमा हैदर तुरुंगात जाणार?


पाकिस्तानातून ग्रेटर नोएडातील रबुपुरा येथे पोहोचलेल्या सीमा हैदरबाबत नोएडा पोलिसांनी अनेक बाजूंनी तपास केला आहे. सीमा हैदरचा पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआयशी संबंध असल्याचा संशय होता. मात्र, ती पाकिस्तानी आयएसआयचा गुप्तहेर असल्याचे तपासात अद्याप समोर आलेले नाही. या तपासात पोलिसांनी केंद्रीय यंत्रणांची मदत घेतली आहे. तिचे कॉल डिटेल्स आणि सोशल मीडिया डिटेल्सचाही तपास करण्यात आला आहे. सर्व पैलूंच्या तपासानंतर नोएडा पोलिस सादर होणाऱ्या चार्जशीटवर सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत.


सचिन मीनावरही कारवाईची शक्यता


सीमा हैदरचं भवितव्यही या आरोपपत्रावर अवलंबून आहे. पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआयशी सीमाचा काही संबंध असल्याचा संशय आल्यास तिला पुन्हा एकदा तुरुंगात जावे लागू शकते. सीमा हैदरसोबतच तिला मदत करणाऱ्या आणि तिला आश्रय देणाऱ्या सचिन मीनाच्याही अडचणी वाढू शकतात. त्याच्यावरही कारवाई होण्याची शक्यता आहे. याशिवाय सीमाला पाकिस्तानात पाठवले जाऊ शकते. पाकिस्तानात गेल्यास सीमाला तेथील कायद्याप्रमाणे मृत्यूदंडाची शिक्षाही होऊ शकते.


बॉलिवूड आणि राजकारणातूनही सीमाला ऑफर


सीमा हैदर प्रकरण गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असून तिला राजकीय पक्षांमध्ये सहभागी होण्याच्या ऑफर येत आहेत. सीमाला बॉलिवूड चित्रपटांचीही ऑफर आल्या आहेत. काही निर्मात्याकडून तिला अभिनेत्री बनण्यासाठी ऑफर आली आहे. सीमाला एका चित्रपटात रॉ एजंटची भूमिका दिल्याचीही चर्चा आहे. 


PUBG खेळताना जडलं प्रेम, सीमा थेट सीमेपार भारतात पोहोचली


पाकिस्तानी सीमा हैदर मे महिन्यात नेपाळमार्गे बेकायदेशीरपणे भारतात दाखल झाली होती. त्यांची नेपाळमध्ये पहिली भेट झाली. त्यानंतर सीमा हैदर आणि तिचा भारतीय प्रियकर सचिन मीनासोबत ग्रेटर नोएडामध्ये राहत आहे. सीमाजवळ अनेक फोन आणि इतर गोष्टी सापडल्याने तिच्यावरचा संशय बळावला, त्यानंतर यूपी एटीएसने सीमा हैदरला ताब्यात घेतलं. सीमा हैदर 30 वर्षांची आणि सचिन मीना 22 वर्षांचा आहे. या दोघांना ग्रेटर नोएडा पोलिसांनी 4 जुलै रोजी अटक केली होती, पण न्यायालयाने 7 जुलै रोजी दोघांना जामीन मंजूर केला. त्यानंतर आता त्यांची एटीएस चौकशी सुरु आहे. पबजी गेम खेळताना सीमा आणि सचिन यांनी ओळख झाली. त्यानंतर सचिनच्या प्रेमासाठी सीमा हैदर बेकायदेशीरपणे भारतात आली. यामुळे भारताच्या सुरक्षेचा धोका असल्याचीही चिंता व्यक्त केली जात आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या :


Cross Border Marriage : सीमा आणि अंजूनंतर सीमेपलीकडची आणखी एक प्रेमकहाणी, जोधपूरमधील वकीलाचं पाकिस्तानी महिलेसोबत ऑनलाईन लग्न