Seema Haider Election News: प्रेमासाठी पाकिस्तानात गेलेली अंजू (Anju) आणि पाकिस्तानातून भारतात आलेली सीमा (Seema Haider) यांची लव्ह स्टोरी सध्या चांगलीच चर्चेत आहे. पाकिस्तानी सीमा थेट सीमा पार करून भारतात आली आणि तिने सचिनसोबत लग्न केलं. यानंतर सर्वत्र या दोघांची चर्चा सरु आहे. पाकिस्तानी सीमा हैदरचं भारतात येणं आणि येथे लग्न करून राहणं सर्वच वादाच्या भोवऱ्यात आहे. सीमाला चित्रपटात काम करण्याच्या काही ऑफर मिळाल्या आहेत. यातच आता पाकिस्तानी सीमा हैदर राजकरणात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. कारण सीमाला रामदास आठवले यांचा पक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाने ऑफर दिली आहे.
पाकिस्तानातून आलेली सीमा हैदर सध्या ग्रेटर नोएडाच्या रबूपूरा या गावात राहते. सीमाला रिपब्लिक पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय प्रवक्त किशोर मासूम यांनी पक्षात येण्याची ऑफर दिली आहे. मात्र पक्ष येण्यापूर्वी त्यांनी एक अट घातली आहे. सीमा हैदरची सध्या चौकशी सुरू आहे. तिच्यावर एजंट असल्याचा आरोप आहे. जर चौकशीमध्ये सीमा निर्दोष सिद्ध झाली किंवा ती गुप्तहेर नसल्याचे पुरावे मिळाले आणि भारताचे नागरिकत्व मिळले तर तिला पक्षात घेतले जाईल
उत्तर प्रदेश महिला विंगचे अध्यक्षपद मिळण्याची शक्यता
सीमाला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया उत्तर प्रदेश महिला विंगचे अध्यक्ष करण्यात येईल, असे पार्टी प्रवक्ता किशोर मासूम म्हणाले. किशोर मासूम हे जेवर गावच्या दयानतपूर भागात राहणारे आहे. दयानतपुरा रबुपुराजवळ आहे. सध्या ते केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय प्रवक्ता आहे. सीमा हैदर एक चांगली वक्ता असून तिने राजकरणात प्रवेश केला पाहिजे, असे देखील मासूम म्हणाले.
फक्त राजकरणाची नाही तर सीमाला चित्रपटांची देखील ऑफर मिळाली आहे. मेरठचे फिल्म प्रोड्युसर अमित जानी यांनी सीमा आणि सचिनला चित्रपटातकाम करण्याची ऑफर दिली आहे. भारतात असलेल्या सीमावर उपासमारीची वेळ आल्याच्या बातम्या समोर आल्यानंतर अनेकांनी तिला मदतीचा हात पुढे केला आहे. सीमाने यापूर्वी पाकिस्तानातील गुलाम हैदरशी लग्न केलं होतं, त्यांना चार मुलं आहेत. सीमा या चारही मुलांना घेऊन सचिनसोबत राहण्यासाठी भारतात आली.
सीमा हैदरची देखील चौकशी सुरू
पाकिस्तानी महिला सीमा हैदरची भारताच्या नोएडा येथील सचिनबरोबर पब्जी खेळत असताना मैत्री झाली. प्रियकराला भेटण्यासाठी सीमा हैदरने चार मुलांसह नेपाळमधून अनधिकृतपणे भारतात प्रवेश केला. सीमाकडे संशयास्पद चार पासपोर्ट आणि मोबाईल आढळल्याने एटीएसने सीमाची तब्बल आठ तास चौकशी केली. सीमाने कोणत्याही प्रकारच्या चौकशीला सामोरं जाण्याची तयारी दर्शवली आहे. चार मुलांची आई असलेल्या सीमाला पब्जी खेळण्यास वेळ कसा मिळाला? अवगत तंत्रज्ञान तिला कसं माहित? याबद्दल सध्या प्रश्न उपस्थित होत आहेत.