Indian Man Married Pakistani Woman : पाकिस्तानातून भारतात पळून आलेल्या सीमा हैदरने (Seema Haider) सचिन मीणासोबत लग्न केलं. भारतातील अंजूने पाकिस्तानी नसरुल्लासोबत लग्नगाठ बांधली. यामुळे सध्या सीमेपलीकडील प्रेमकहाण्या चर्चेत आहेत. आता अशीच एक लव्हस्टोरी समोर आली आहे. एका भारतीय तरुणाने पाकिस्तानी महिलेसोबत लग्ने केलं आहे आणि ते ही ऑनलाईन. जोधपूरमधील वकिलाने पाकिस्तानी महिलेसोबत ऑनलाईन निकाह केला आहे.


जोधपूरमधील वकीलाचं पाकिस्तानी महिलेसोबत ऑनलाईन लग्न


जोधपूरमधील वकील अरबाज आणि पाकिस्तानी अमीना यांचा गेल्या आठवड्यात ऑनलाईन निकाह झाला आहे. हे लग्न पारंपारिक पद्धतीने झालं नसलं तरी यावेळी इतर सर्व प्रथा पाळण्यात आल्या. काझींनी या दोघांचं ऑनलाइन लग्न लावून दिल. हे लग्न जोधपूर आणि कराची या दोन्ही शहरांमध्ये मोठ्या एलईडी स्क्रीनवर दाखवले गेल्याची माहिती आहे. टाईम्स ऑफ इंडियाने यासंदर्भात वृत्त दिलं आहे.


अमीनाला व्हिसा मिळाला नाही


गेल्या आठवड्यात 2 ऑगस्ट रोजी झालेल्या या निकाहबाबत नवरदेव अरबाजचे वडील मोहम्मद अफजल म्हणाले की, ''आम्ही पाकिस्तानातील आमच्या नातेवाईकांमार्फत आधीच रोका केला होता आणि लग्नासाठी अमीनाच्या व्हिसाची वाट पाहत होतो. त्यानंतर व्हिसाच्या प्रक्रियेत विलंब झाला, म्हणून आम्ही दोघांचे ऑनलाइन लग्न करण्याचा निर्णय घेतला.''


व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे निकाह


मिळालेल्या माहितीनुसार, पाकिस्तानी अमीनाला राजस्थानमध्ये लग्न करायचे होते, पण तिला व्हिसा मिळू शकला नाही. लग्नाची तारीख आधीच ठरलेली होती. त्यामुळे वर-वधू दोघांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे लग्न करण्याचा निर्णय घेतला. पाकिस्तानची अमीना आणि राजस्थानचा अरबाज खान यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे निकाह केला.


अमीनाच्या व्हिसाची वाट पाहणार


अरबाजने यावर प्रतिक्रिया देताना सांगितलं की, "भारत आणि पाकिस्तानचे संबंध ताणले गेले असले तरी सीमेपलीकडील विवाहांचा संबंधांवर फारसा परिणाम झालेला नाही. यामागचं कारण म्हणजे दोन्ही देशांमध्ये लोकांचे नातेवाईक राहतात. आता आम्ही अमीनाच्या व्हिसाची वाट पाहू." दोघांनी विवाहित असल्यामुळे व्हिसा मिळणं सोपं होईल.


सीमेपलीकडील प्रेमकहाण्या


या वर्षाच्या सुरुवातीला जोधपूरच्या मुझम्मील खानने ऑनलाइन माध्यमातून पाकिस्तानच्या उरुज फातिमाशी लग्न केलं. पाकिस्तानच्या सिंध प्रांतातील रहिवासी सीमा हैदरने 13 मे रोजी राबुपुरा भागात राहणारा तिचा भारतीय प्रियकर सचिन मीना याच्यासोबत राहण्यासाठी नेपाळमार्गे बसमधून तिच्या चार मुलांसह बेकायदेशीरपणे देशात प्रवेश केला. यानंतर ती ग्रेटर नोएडा पोहोचली आणि तिने सचिनसोबत लग्न केलं.


महत्त्वाच्या इतर बातम्या :


India-Pakistan : इंस्टाग्रामवरून जडलं प्रेम! पाकिस्तानात पळून जाण्याच्या तयारीत असलेली आणखी एक 'अंजू' पोलिसांच्या ताब्यात