एक्स्प्लोर

लोकसभा निवडणूक 2024

UTTAR PRADESH (80)
43
INDIA
36
NDA
01
OTH
MAHARASHTRA (48)
30
INDIA
17
NDA
01
OTH
WEST BENGAL (42)
29
TMC
12
BJP
01
INC
BIHAR (40)
30
NDA
09
INDIA
01
OTH
TAMIL NADU (39)
39
DMK+
00
AIADMK+
00
BJP+
00
NTK
KARNATAKA (28)
19
NDA
09
INC
00
OTH
MADHYA PMADHYA PRADESH (29)RADESH (29(
29
BJP
00
INDIA
00
OTH
RAJASTHAN (25)
14
BJP
11
INDIA
00
OTH
DELHI (07)
07
NDA
00
INDIA
00
OTH
HARYANA (10)
05
INDIA
05
BJP
00
OTH
GUJARAT (26)
25
BJP
01
INDIA
00
OTH
(Source: ECI / CVoter)

Rashtrapati Nilayam : दिल्लीशिवाय देशात आणखी दोन 'राष्ट्रपती भवन'! जिथे राष्ट्रपती करतात 5 दिवस मुक्काम, जाणून घ्या रंजक माहिती

Rashtrapati Nilayam : राष्ट्रपती भवनाचं अधिकृत कामकाज या काळात सिंकदराबादच्या 'राष्ट्रपती निलयम' मधून चालतं. राष्ट्रपती भवनाशी संबंधित एक रंजक माहिती फार कमी लोकांना माहिती असेल.

Rashtrapati Nilayam : राष्ट्रपती भवनाशी (Rashtrapati Bhavan) संबंधित एक रंजक माहिती फार कमी लोकांना माहिती असेल. दिल्लीशिवाय देशात आणखी दोन राष्ट्रपती भवने आहेत. दरम्यान, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (President Draupadi Murmu) तेलंगणातील सिकंदराबादमधील यापैकी 'राष्ट्रपती निलयम' (Rashtrapati Nilayam) मध्ये राहायला आल्या आहेत. दक्षिण भारतातील विविध कार्यक्रमांदरम्यान राष्ट्रपती सिकंदराबाद येथील राष्ट्रपती निलयम येथे 30 डिसेंबरपर्यंत वास्तव्य करतील.

 

राष्ट्रपती तेलंगणाच्या पाच दिवसांच्या दौऱ्यावर
कालपासून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू त्यांच्या तेलंगणाच्या पाच दिवसांच्या दौऱ्यावर आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हिवाळी मुक्कामासाठी सोमवारी हैदराबादला पोहोचल्या. त्यानंतर राष्ट्रपती मुर्मू हेलिकॉप्टरने श्रीशैलम मंदिराकडे रवाना झाल्या. त्यांच्यासोबत राज्यपाल आणि केंद्रीय पर्यटन मंत्री किशन रेड्डीही होते.


दिल्ली वगळता देशात आणखी दोन राष्ट्रपती भवने
दरम्यान, दिल्ली व्यतिरिक्त, देशातील दोन ठिकाणांपैकी आणखी एक राष्ट्रपती भवन आहे, ते तेलंगणा राज्यातील हैदराबादच्या सिकंदराबाद शहरातील बोलारम येथे आहे, त्याला 'राष्ट्रपती निलयम' असे म्हणतात. 'निलयम' हा तेलुगू भाषेतील शब्द आहे, ज्याचा अर्थ निवासस्थान असा आहे. राष्ट्रपती निलयम या शब्दाचा अर्थ - राष्ट्रपती भवन म्हणजेच राष्ट्रपतींचे निवासस्थान. राष्ट्रपती भवनाचं अधिकृत कामकाज या काळात सिंकदराबादच्या राष्ट्रपती निलयम मधून चालतं 

कसे आहे हे 'राष्ट्रपती निलयम'?
'राष्ट्रपती निलयम' हे पूर्वी 'रेसिडेन्सी हाऊस' म्हणून ओळखले जात होते, परंतु आता ते राष्ट्रपती निलयम म्हणून ओळखले जाते. देशाचे राष्ट्रपती वर्षातून एकदा येथून काही दिवस काम करतात. साधारणपणे हिवाळ्यात काही दिवस राष्ट्रपती त्यांचे कार्यालयीन कामकाज येथून करतात. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूही हिवाळ्यात राष्ट्रपती निलयम येथे पोहोचल्या आहेत. राष्ट्रपती निलयममध्ये जवळपास 150 लोकांसाठी राहण्याची व्यवस्था देखील आहे. राष्ट्रपती निलयम हे 90 एकरात पसरलेले असून 11 खोल्या आहेत. त्याची खास गोष्ट म्हणजे त्याचे किचन आणि डायनिंग हॉल दोन वेगळ्या इमारतींमध्ये आहेत. नक्षत्र आणि हर्बल गार्डनसह दोन बागांसह ही इमारत पर्यावरणपूरक आहे. इमारतीत सोलर सिस्टीम आणि वॉटर हार्वेस्टिंग सिस्टीम बसवण्यात आली आहे. 2011 मध्ये ही इमारत सर्वसामान्यांसाठी खुली करण्यात आली.

राष्ट्रपती निलयमचा इतिहास काय आहे?
हे हैदराबादच्या निजाम नसीर-उद-दौला यांनी 1860 मध्ये बांधले होते. निजामाच्या सैन्याच्या छावणी परिसरात असलेली ही इमारत निजामाच्या सैन्यातील मुख्य लष्करी अधिकाऱ्याचे निवासस्थान असायची. नंतर, निजाम आणि इंग्रज यांच्यात झालेल्या करारानुसार सिकंदराबादमध्ये छावणी बांधण्याची परवानगी इंग्रजांना मिळाल्यावर, ब्रिटिशांनी सिकंदराबाद येथील ब्रिटिश रहिवाशांना त्यांच्या वापरासाठी एक देशी घर बनवले. 1948 मध्ये सरदार पटेल यांच्या नेतृत्वाखाली जेव्हा देश ब्रिटिश राजवटीपासून स्वतंत्र झाला. तेव्हा हैदराबाद भारतात विलीन झाले. त्यानंतर सिकंदराबाद छावणी भारतीय लष्कराच्या ताब्यात देण्यात आली. यासह, त्याखालील निवासी सदन राष्ट्रपती सचिवालयाकडे सुपूर्द करण्यात आले.

निलयममध्ये नक्षत्र वाटिकाही
2015 मध्ये तत्कालीन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी निलयम येथे नक्षत्र उद्यान सुरू केले. एक एकरमध्ये पसरलेल्या नक्षत्र गार्डनची रचना वैदिक ज्योतिषशास्त्राच्या श्रीचक्रानुसार विविध भौमितिक संयोजनांनी केली आहे. या बागेत 48 झाडे आहेत, जी 9 नवग्रह, 12 राशी आणि 27 नक्षत्रांचे प्रतीक आहेत. यासोबतच येथील वनौषधी उद्यानात 116 प्रकारची औषधी झाडे आणि वनस्पती आहेत. यामध्ये चंदन, काळमेघ अशा अनेक औषधी वृक्षांचा समावेश आहे.

शिमल्यात देखील आणखी एक राष्ट्रपती भवन, 'रिट्रीट भवन'
शिमल्यात 8,000 फूट उंचीवर 'रिट्रीट भवन' आहे. ही इमारत 1850 मध्ये शिमल्याच्या वैद्यकीय अधीक्षकांनी बांधली होती. ही इमारत 10,628 स्क्वेअर फूटमध्ये पसरलेली आहे. 1895 मध्ये व्हाईसरॉयने पुन्हा या इमारतीचा ताबा घेतला. स्वातंत्र्यानंतर त्याचे राष्ट्रपती भवनात रूपांतर झाले. त्यानंतर ही इमारत प्रेसिडेंशियल इस्टेटचा एक भाग मानली गेली.

 

इतर बातम्या

Zelensky Calls PM Modi : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा पंतप्रधान मोदींना फोन, 'शांतता फॉर्म्युला'वर भारताकडून समर्थनाची अपेक्षा व्यक्त

 

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

PM Modi Oath Taking Ceremony Live : राज्यात 5 खासदारांना मंत्रिपदासाठी फोन; शिंदे गट आणि रामदास आठवलेंना सुद्धा संधी, अजित पवार गट अजूनही गॅसवर
राज्यात 5 खासदारांना मंत्रिपदासाठी फोन; शिंदे गट आणि रामदास आठवलेंना सुद्धा संधी, अजित पवार गट अजूनही गॅसवर
पंचायत समिती सदस्य, आमदार, खासदार ते आता केंद्रीय मंत्री, प्रतापराव जाधवांचा प्रवास
पंचायत समिती सदस्य, आमदार, खासदार ते आता केंद्रीय मंत्री, प्रतापराव जाधवांचा प्रवास
PM Modi Swearing In Ceremony Live :  उत्तर महाराष्ट्रातून रक्षा खडसेंना संधी, केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार
मोठी बातमी : उत्तर महाराष्ट्रातून रक्षा खडसेंना संधी, केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार
Top 10 OTT Release This Week : 'मैदान', 'बडे मियां छोटे मियां' ते 'गुल्लक 4'; 'या' आठवड्यात ओटीटीवर धमाका करणार हे 10 चित्रपट अन् सीरिज
'मैदान', 'बडे मियां छोटे मियां' ते 'गुल्लक 4'; 'या' आठवड्यात ओटीटीवर धमाका करणार हे 10 चित्रपट अन् सीरिज
Advertisement
metaverse

व्हिडीओ

PM Modi Ministers : चिराग पासवान ते नितीन गडकरी ! मंत्रिपदासाठी कुणाकुणाला फोन?Prataprao Jadhav Oath PM Modi : 4 टर्म खासदार आता मंत्री, प्रतापराव जाधव घेणार शपथRaksha Khadse Will Take Oath : रक्षा खडसे मंत्री होणार! PMO कार्यालयातून आला फोन ABP MajhaABP Majha Headlines : 10 AM : 09 June 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
PM Modi Oath Taking Ceremony Live : राज्यात 5 खासदारांना मंत्रिपदासाठी फोन; शिंदे गट आणि रामदास आठवलेंना सुद्धा संधी, अजित पवार गट अजूनही गॅसवर
राज्यात 5 खासदारांना मंत्रिपदासाठी फोन; शिंदे गट आणि रामदास आठवलेंना सुद्धा संधी, अजित पवार गट अजूनही गॅसवर
पंचायत समिती सदस्य, आमदार, खासदार ते आता केंद्रीय मंत्री, प्रतापराव जाधवांचा प्रवास
पंचायत समिती सदस्य, आमदार, खासदार ते आता केंद्रीय मंत्री, प्रतापराव जाधवांचा प्रवास
PM Modi Swearing In Ceremony Live :  उत्तर महाराष्ट्रातून रक्षा खडसेंना संधी, केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार
मोठी बातमी : उत्तर महाराष्ट्रातून रक्षा खडसेंना संधी, केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार
Top 10 OTT Release This Week : 'मैदान', 'बडे मियां छोटे मियां' ते 'गुल्लक 4'; 'या' आठवड्यात ओटीटीवर धमाका करणार हे 10 चित्रपट अन् सीरिज
'मैदान', 'बडे मियां छोटे मियां' ते 'गुल्लक 4'; 'या' आठवड्यात ओटीटीवर धमाका करणार हे 10 चित्रपट अन् सीरिज
PM Modi Swearing In Ceremony Live : मंत्रिपदासाठी खासदारांना सकाळपासून दिल्लीतून फोनाफोनी; राज्यात पाच खासदारांची रिंग वाजली!
मंत्रिपदासाठी खासदारांना सकाळपासून दिल्लीतून फोनाफोनी; राज्यात पाच खासदारांची रिंग वाजली!
मोदींना कुबड्या घेऊन राष्ट्रपती भवनात जावे लागेल; सामनातून संजय राऊतांचा घणाघात 
मोदींना कुबड्या घेऊन राष्ट्रपती भवनात जावे लागेल; सामनातून संजय राऊतांचा घणाघात 
लोणावळ्याला फिरायला जाताय? तर थांबा! पुणे लोणावळादरम्यान मेगा ब्लॉक,डेक्कन एक्स्प्रेस या गाड्या रद्द
लोणावळ्याला फिरायला जाताय? तर थांबा! पुणे लोणावळादरम्यान मेगा ब्लॉक,डेक्कन एक्स्प्रेस या गाड्या रद्द
Kolhapur Weather Update : कोल्हापूर जिल्ह्यात पावसाची सर्वदूर पावसाची हजेरी; हवामान विभागाकडून तीन दिवस ऑरेंज अलर्ट
कोल्हापूर जिल्ह्यात पावसाची सर्वदूर पावसाची हजेरी; हवामान विभागाकडून तीन दिवस ऑरेंज अलर्ट
Embed widget