एक्स्प्लोर
निर्भया बलात्कार प्रकरणी चारही दोषींची फाशी कायम
नवी दिल्ली : दिल्लीतील निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणी चारही दोषींची फाशीची शिक्षा कायम ठेवण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाने राजधानी दिल्लीत 2012 मध्ये झालेल्या निर्भया बलात्कार प्रकरणावर आज अंतिम निकाल दिला.
आरोपी पवन, मुकेश, विनय आणि अक्षय या चार दोषींना दिल्ली सत्र न्यायालय आणि दिल्ली उच्च न्यायालयाने फाशीची शिक्षा ठोठावली होती. त्याविरोधात त्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. त्यावर आज सर्वोच्च न्यायालयानेही शिक्कामोर्तब केलं.
निकाल सुनावताच कोर्टात टाळ्यांचा कडकडाट झाला.
20 मिनिटांत निकाल
सर्वोच्च न्यायालयात आज दुपारी दोन वाजता सुनावणीला सुरुवात झाली. तीन न्यायाधीशांच्या खंडपीठाने 20 मिनिटांत निकाल देत चारही दोषींची फाशीची शिक्षा कायम ठेवली.
निर्भयाच्या कुटुंबाने दोषींना फाशीची शिक्षा कायम ठेवण्याची मागणी केली होती. "आमचा न्यायव्यवस्थेकडून फार अपेक्षा आहेत. दोषींना फाशीच होईल. जर संविधानात शिक्षेची तरतूद आहे, तर निर्भया प्रकरणापेक्षा वाईट प्रकरण असूच शकत नाही. त्यांना फाशीशिवाय दुसरी शिक्षा असूच शकत नाही, असं निर्भयाची आई म्हणाली होती.
16 डिसेंबर 2012 रोजी दिल्लीत झालेल्या या अमानुष बलात्काराने अवघा देश हादरला होता. या घटनेच्या निषेधार्थ देशभरात आंदोलनं झाली होती. दिल्लीत मोठं जनआंदोलनही करण्यात आलं होतं.
या प्रकरणात एकूण 6 आरोपी होती. त्यापैकी एक आरोपी राम सिंहने आत्महत्या केली होती. तर आरोपी अल्पवयीन होता. बालसुधारगृहात 3 वर्षाच्या शिक्षेनंतर त्याची सुटका झाली आहे.
निर्भया प्रकरणात आतापर्यंत काय झालं?
16 डिसेंबर, 2012 : दिल्लीच्या मुनिरकामद्ये सहा जणांनी एका बसमध्ये पॅरामेडिक विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार केला. घटनेनंतर तरुणीला आणि तिच्या मित्राला चालत्या बसमधून फेकून दिलं.
18 डिसेंबर, 2012 : राम सिंह, मुकेश, विनय शर्मा आणि पवन गुप्ता यांना या प्रकरणात अटक करण्यात आली. 21 डिसेंबरला या प्रकरणात एका अल्पवयीन आरोपीला दिल्लीमधून आणि सहावा आरोपी अक्षय ठाकूरला बिहारमधून अटक केली होती.
29 डिसेंबर, 2012 : निर्भयाने सिंगापूरच्या एका रुग्णालयात प्राण सोडले.
3 जानेवारी, 2013 : पोलिसांनी पाच आरोपींविरोधात हत्या, गँगरेप, हत्येचा प्रयत्न, अपहरण, चोरी इत्यादी आरोपांतर्गत चार्जशीट दाखल केली.
17 जानेवारी, 2013 : फास्ट ट्रॅक कोर्टाने पाच आरोपींवर आरोप निश्चित केले.
11 मार्च 2013 : आरोपी राम सिंहने तिहार जेलमध्ये आत्महत्या केली.
31 ऑक्टोबर, 2013 : बालगुन्हेगारी न्यायालयाने अल्पवयीन आरोपीला गँगरेप आणि हत्येप्रकरणी दोषी ठरवत तीन वर्षांसाठी त्याची रवानगी बालसुधारगृहात केली.
10 सप्टेंबर, 2013 : फस्ट ट्रॅक कोर्टाने इतर चार आरोपींनी 13 गुन्ह्यांमध्ये दोषी ठरवलं.
13 सप्टेंबर, 2013 : दोषी मुकेश, विनय, पवन आणि अक्षयला फाशीची शिक्षा ठोठावली.
13 मार्च, 2014 : दिल्ली हायकोर्टने चारही दोषींची फाशीची शिक्षा कायम ठेवली.
2014-2016 : दोषींनी फाशीच्या शिक्षेला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे.
5 मे, 2017 : सर्वोच्च न्यायालयाकडून चारही दोषींची फाशीची शिक्षा कायम
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
महाराष्ट्र
विश्व
व्यापार-उद्योग
Advertisement