एक्स्प्लोर
न्या. लोयांच्या मृत्यूची सीबीआय चौकशी होणार नाही: सुप्रीम कोर्ट
ज्या केसमुळे अवघ्या देशाचं वातावरण ढवळून निघालं, त्या न्यायमूर्ती बी.एच.लोयांच्या मृत्यूप्रकरणाच्या खटल्याकडे देशाचे लक्ष लागलं होतं.

नवी दिल्ली: न्यायमूर्ती ब्रिजमोहन हरिकिशन लोया यांच्या मृत्यूप्रकरणाची सीबीआय चौकशी होणार नाही, असा स्पष्ट निर्णय सुप्रीम कोर्टाने आज दिला. न्यायमूर्ती लोया यांच्या मृत्यूची निष्पक्ष चौकशी करण्याची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली. सरन्यायाधीश दीपक मिश्रा, न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड, न्यायमूर्ती अजय खानविलकर यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला. विशेष सीबीआय न्यायाधीश लोया हे सोहराबुद्दीन बनावट एन्काऊंटरच्या खटल्याची सुनावणी करत होते. या खटल्यात भाजप अध्यक्ष अमित शाहा आरोपी होते. 1 डिसेंबर 2014 रोजी लोया आपल्या सहकाऱ्याच्या मुलीच्या लग्नासाठी नागपूरला गेले. तिथं त्यांचा मृत्यू झाला. पण कॅराव्हान मॅगेझिननं 4 महिन्यांपूर्वी लोयांचा मृत्यू संशयास्पद असल्याची बातमी दिली होती. त्यानंतर देशभर खळबळ उडाली. PIL चा गैरवापर : सुप्रीम कोर्ट न्या. लोया यांच्या मृत्यूची सीबीआय चौकशी होणार नाही, हे सांगतानाच, सुप्रीम कोर्टाने जनहित याचिकेचा गैरवापर होत असल्याचं नमूद केलं. न्यायमूर्ती लोयांसोबत जे न्यायाधीश प्रवास करत होते, त्यांच्यावर संशय व्यक्त करु शकत नाही. ज्या पद्धतीने जनहित याचिकांचा राजकीय वापर होत आहे, ते पाहता हा न्यायपालिकांच्या बदनामीचा प्रयत्न आहे, असं न्यायमूर्ती चंद्रचूड यांनी नमूद केलं. ‘महाराष्ट्र सरकारचं म्हणणं योग्य’ याप्रकरणी महाराष्ट्र सरकारने आपली बाजू मांडताना, न्यायमूर्ती लोया यांचा मृत्यू हा नैसर्गिक होता, असं म्हटलं होतं. ते सुप्रीम कोर्टाने ग्राह्य धरलं. शिवाय न्यायाधीश लोया यांच्यासोबत चार न्यायाधीशही प्रवास करत होते, त्यामुळे त्यांच्यावर अविश्वास ठेवणं योग्य नाही, असं सुप्रीम कोर्टाने आपल्या निकालात म्हटलं आहे. कोर्टाने खडसावलं मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींवर जे आरोप लावण्यात आले, ते अयोग्य असून, कोर्टाच्या अवमानास पात्र आहेत. पण आम्ही तशी कारवाई करत नाही. इतकंच नाही तर मीडिया रिपोर्टवरुन हा खटला ताणण्याचा प्रयत्न होत आहे, असंही कोर्टाने खडसावलं. माजी न्यायमूर्ती बी जी कोळसे पाटील यांची प्रतिक्रिया न्यायमूर्ती लोयांचा मृत्यू नैसर्गिक कसा? सोबत प्रवास करणारे न्यायाधीश हे खासगी आयुष्यात न्यायाधीश नसतात. त्यामुळे ते खरंच बोलतील यावर विश्वास कसा ठेवायचा? ते हरिश्चंद्र आहेत का? असे प्रश्न उपस्थित करत, सुप्रीम कोर्टाच्या निकालाने समाधान नाही, असं उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती बी जी कोळसे पाटील म्हणाले. सुप्रीम कोर्ट ईश्वरासारखं असेल, तर त्यांनी लोयाप्रकरणाची स्वतंत्रपणे चौकशी करण्याची गरज होती. आता लोकांनी दबाव आणून, सर्व सुप्रीम कोर्टाच्या न्यायमूर्तींनी एकत्र येऊन, याबाबतचा निर्णय घ्यायला हवा, असं न्यायमूर्ती कोळसे पाटील म्हणाले. संशय दूर होणार नाही: केतकर सुप्रीम कोर्टाच्या निकालाने लोकांच्या मनातील संशय दूर होणार नाहीत, अशी प्रतिक्रिया काँग्रेस खासदार कुमार केतकर यांनी व्यक्त केली. हे न्यायालय काय निर्णय देणार ते अपेक्षित होतं. सुप्रीम कोर्टाने पत्रकार परिषद घेतलेल्या चार न्यायाधीशांच्या प्रश्नांना उत्तरं द्यावी, असंही खासदार कुमार केतकर म्हणाले. न्यायमूर्ती लोया मृत्यूप्रकरण काय आहे? गुजरातमधील सोहराबुद्दीन शेख चकमक प्रकरणात सुनावणी करणारे विशेष सीबीआय जज बी. एच. लोया यांच्या संशयास्पद मृत्यू झाला होता. सोहराबुद्दीन शेख चकमक प्रकरणात भाजप अध्यक्ष अमित शाहा आरोपी होते. नागपुरात 1 डिसेंबर 2014 रोजी जज ब्रिजमोहन हरिकिशन लोया यांचा मृत्यू झाला होता. सहकाऱ्याच्या मुलीच्या लग्नाला जाताना हृदयविकाराच्या धक्क्याने त्यांचं निधन झालं होतं. मात्र लोया यांच्या बहिणीने त्यांच्या मृत्यू प्रकरणी प्रश्न उपस्थित केले होते. सोहराबुद्दीन केसशी लोया यांचा असलेला संबंध आणि त्यांचा अचानक मृत्यू यावरुन संशय उपस्थित केले गेले. सोहराबुद्दीन शेख चकमक प्रकरण गुजरातमध्ये सोहराबुद्दीन शेख, त्यांची पत्नी कौसर बी आणि त्यांचे सहकारी तुलसीदास प्रजापती यांचा नोव्हेंबर 2005 मध्ये कथित बनावट चकमकीत मृत्यू झाला होता. पोलिस कर्मचाऱ्यांसह 23 आरोपींवर या प्रकरणी केस दाखल आहे. हे प्रकरण आधी सीबीआयकडे सोपवण्यात आलं होतं, त्यानंतर ते मुंबईला ट्रान्सफर करण्यात आलं. संबंधित बातम्या न्यायमूर्तींच्या नाराजीचं कारण असलेलं जज लोया मृत्यू प्रकरण काय आहे? वडिलांच्या मृत्यूबाबत आमचा कुणावरही संशय नाही : अनुज लोया जस्टिस लोया यांचा मृत्यू हृदयविकारानेच : नागपूर पोलीस सोहराबुद्दीन प्रकरणातील जजच्या मृत्यू प्रकरणी सुप्रीम कोर्टात सुनावणी या एका केसमुळे न्यायमूर्तींच्या असंतोषाचा कडेलोट झाला सरन्यायाधीशांवर प्रश्न उपस्थित करणारे चार न्यायमूर्ती कोण आहेत?
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
विश्व
धाराशिव
राजकारण























