एक्स्प्लोर

आर्थिक आरक्षण कायद्याला स्थगिती देण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार

घटनादुरुस्ती करुन खुल्या वर्गातील आर्थिक दुर्बलांना 10 टक्के आरक्षण देण्यात आलं. परंतु या आरक्षणावर स्थगिती देण्याची मागणी करणारी जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे.

नवी दिल्ली : खुल्या वर्गातील आर्थिक दुर्बलांना आरक्षण कायद्याला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला. यामुळे केंद्र सरकारला तूर्तास दिलासा मिळाला आहे. आम्ही या मुद्द्यावर आमच्या स्तरावर निरीक्षण करु, असं सुप्रीम कोर्टाने म्हटलं आहे. सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने या मुद्द्यावर सरकारला नोटीस पाठवली आहे. हा कायदा घटनेच्या मूलभूत तत्त्वांशी सुसंगत आहे की नाही, हे तपासण्यासाठी कोर्टाने केंद्र सरकारकडून उत्तर मागितलं आहे. आता चार आठवड्यांनंतर पुढील सुनावणी होईल. आर्थिक आरक्षण विधेयक : आरक्षण मिळवण्याचे निकष काय? सरकारला नोटीस घटनादुरुस्ती करुन खुल्या वर्गातील आर्थिक दुर्बलांना 10 टक्के आरक्षण देण्यात आलं. परंतु या आरक्षणावर स्थगिती देण्याची मागणी करणारी जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. आरक्षणाला तात्काळ स्थगिती देण्याची मागणी याचिकेत करण्यात आली होती. परंतु आजच्या सुनावणीत सुप्रीम कोर्टाने आरक्षणाला तातडीने स्थगिती देण्यास नकार दिला, मात्र सुनावणीसाठी याचिका दाखल करुन घेतली. कोर्टाने या मुद्द्यावर केंद्र सरकारला नोटीसही पाठवली आहे. सर्वोच्च न्यायालयात आणखी एक याचिका खुल्या वर्गातील आर्थिक गरिबांना दहा टक्के आरक्षण देण्यासाठी केंद्र सरकारने बनवलेल्या नव्या कायद्याविरोधात सुप्रीम कोर्टात आणखी एक याचिका दाखल करण्यात आली आहे. तहसीन पुनावाला यांनी ही याचिका दाखल केली आहे. "ही संविधानाच्या मूलभूत तत्वांसोबत छेडछाड आहे. सोबतच आरक्षणासाठी जास्तीत जास्त 50 टक्के मर्यादा निश्चित करण्यात आली असून त्याचं उल्लंघन झालं आहे," असा दावा याचिकेत करण्यात आला आहे. 50 टक्के आरक्षणाची मर्यादा सुप्रीम कोर्टाने इंदिरा साहनी खटल्यात दिलेल्या निकालानुसार, 50 टक्क्यांपेक्षा जास्त आरक्षण देता येणार नाही. सध्याचा कायद्याअंतर्गत दिलेलं आरक्षण 10 टक्के आहे. हे लागू झाल्यावर 50 टक्के आरक्षणाची मर्यादा आधीच पार झाली. सुप्रीम कोर्टाच्या घटनापीठाच्या निकालाच्या उलट हा कायदा मंजूर केल आहे. या प्रकरणात घटनादुरुस्तीचा कायदा रद्द करण्याची विनंती करण्यात आली आहे. सोबतच त्यावर तात्काळ स्थगिती देण्याची मागणी केली आहे. परंतु सर्वोच्च न्यायालयाने त्याला नकार दिला आहे. संबंधित बातम्या आर्थिक दुर्बल आरक्षण याच शैक्षणिक वर्षापासून लागू होणार : जावडेकर आर्थिक आरक्षणानंतर मोदी 'हे' सिक्सर मारायच्या तयारीत? खुल्या प्रवर्गात आर्थिक आरक्षण देणारं गुजरात पहिलंच राज्य आर्थिक दुर्बल आरक्षण विधेयकाला राष्ट्रपतींची मंजुरी आर्थिक दुर्बल आरक्षण विधेयक लोकसभेत मंजूर

महत्त्वाच्या बातम्या

Mecca Defence Pact: पाकिस्तान, सौदी अरेबिया अन् तुर्कीची संरक्षण करारावर स्वाक्षरी; एकावरचा हल्ला तिघांवर मानला जाणार! संयुक्त प्रशिक्षण, सुरक्षा सहकार्य वाढणार, भारताची किती डोकेदुखी वाढली?
पाकिस्तान, सौदी अरेबिया अन् तुर्कीची संरक्षण करारावर स्वाक्षरी; एकावरचा हल्ला तिघांवर मानला जाणार! संयुक्त प्रशिक्षण, सुरक्षा सहकार्य वाढणार, भारताची किती डोकेदुखी वाढली?
Maharashtra Live News Updates: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर
Maharashtra Live News Updates: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर
Russia Sanctions 100 Percent Tariff On India: भारतासह 5 देशांवर अमेरिका 100% टॅरिफ लावणार; रशियावर निर्बंध लादणारे विधेयक सिनेटकडून मंजूर
भारतासह 5 देशांवर अमेरिका 100% टॅरिफ लावणार; रशियावर निर्बंध लादणारे विधेयक सिनेटकडून मंजूर
Arunachal Pradesh Dispute : चीनला भारताचे चोख प्रत्युत्तर, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाणांची अधिकृत नावे भारतीय नकाशात समाविष्ट
चीनला भारताचे चोख प्रत्युत्तर, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाणांची अधिकृत नावे भारतीय नकाशात समाविष्ट

व्हिडीओ

Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही
Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mecca Defence Pact: पाकिस्तान, सौदी अरेबिया अन् तुर्कीची संरक्षण करारावर स्वाक्षरी; एकावरचा हल्ला तिघांवर मानला जाणार! संयुक्त प्रशिक्षण, सुरक्षा सहकार्य वाढणार, भारताची किती डोकेदुखी वाढली?
पाकिस्तान, सौदी अरेबिया अन् तुर्कीची संरक्षण करारावर स्वाक्षरी; एकावरचा हल्ला तिघांवर मानला जाणार! संयुक्त प्रशिक्षण, सुरक्षा सहकार्य वाढणार, भारताची किती डोकेदुखी वाढली?
Maratha Reservation: अपवादात्मक परिस्थितीत 50 टक्क्यांची मर्यादा ओलांडता येते; मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ राज्य सरकारचा मोठा युक्तिवाद, न्यायालयात नेमकं काय घडलं?
अपवादात्मक परिस्थितीत 50 टक्क्यांची मर्यादा ओलांडता येते; मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ राज्य सरकारचा मोठा युक्तिवाद, न्यायालयात नेमकं काय घडलं?
Mumbai High Court On FDA: तुम्ही डास मारण्यासाठी तलवारीचा वापर करताय; मुंबई उच्च न्यायालयाच्या FDAला कानपिचक्या, पुन्हा काय घडलं?
तुम्ही डास मारण्यासाठी तलवारीचा वापर करताय; मुंबई उच्च न्यायालयाच्या FDAला कानपिचक्या, पुन्हा काय घडलं?
Thailand Crime: नववीच्या विद्यार्थ्याचे भयंकर कृत्य, आधी घरात आजी-आजोबा, नंतर शाळेत अंदाधुंद गोळीबार; 8 जणांचा दुर्दैवी अंत, 15 जखमी
नववीच्या विद्यार्थ्याचे भयंकर कृत्य, आधी घरात आजी-आजोबा, नंतर शाळेत अंदाधुंद गोळीबार; 8 जणांचा दुर्दैवी अंत, 15 जखमी
Ramandeep Singh Married to Charlie Chauhan : भारतीय क्रिकेटरने गुपचूप केलं लग्न, 7 वर्षांनी मोठ्या अभिनेत्रीशी बांधली लग्नगाठ; अर्शदीप सिंगने शेअर केला फोटो, कोण आहे 'ती'?
भारतीय क्रिकेटरने गुपचूप केलं लग्न, 7 वर्षांनी मोठ्या अभिनेत्रीशी बांधली लग्नगाठ; अर्शदीप सिंगने शेअर केला फोटो, कोण आहे 'ती'?
Prashant Kishor On Sunil Tatkare Sunetra Pawar NCP Politics: प्रशांत किशोर यांनी प्रदेशाध्यक्ष बदलण्याचा सल्ला दिल्याच्या चर्चेनं राष्ट्रवादीत खळबळ; सुनेत्रा पवारांसोबतच्या बैठकीत काय काय घडलं?
प्रशांत किशोर यांनी प्रदेशाध्यक्ष बदलण्याचा सल्ला दिल्याच्या चर्चेनं राष्ट्रवादीत खळबळ; सुनेत्रा पवारांसोबतच्या बैठकीत काय काय घडलं?
Rishabh Pant News : 3 वर्षांपासून इकडेतिकडे भटकतोय... ऋषभ पंत भावूक, मध्यरात्री 1 वाजता मुख्यमंत्र्यांना मागितली मदत, नेमकं प्रकरण काय?
3 वर्षांपासून इकडेतिकडे भटकतोय... ऋषभ पंत भावूक, मध्यरात्री 1 वाजता मुख्यमंत्र्यांना मागितली मदत, नेमकं प्रकरण काय?
सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर तैनात पोलीस कॉन्स्टेबलचा मृत्यू; नेमकं घडलं काय?
सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर तैनात पोलीस कॉन्स्टेबलचा मृत्यू; नेमकं घडलं काय?
Embed widget