SBI Recruitment Order : एसबीआयने गरोदर महिलांबाबतचा वादग्रस्त नियम घेतला मागे
State Bank of India : भारतीय स्टेट बँकने (SBI) तीन महिन्यापेक्षा जास्त प्रेग्नेंट महिलांना अनफिट सांगत भरती प्रक्रियेतील नियमांत बदल केला होता.
State Bank of India : भारतीय स्टेट बँकने (SBI) तीन महिन्यापेक्षा जास्त प्रेग्नेंट महिलांना अनफिट सांगत भरती प्रक्रियेतील नियमांत बदल केला होता. एसबीआयच्या या निर्णायावरुन देशभरात संताप व्यक्त केला. देशभरातून टीकास्त्र सोडलं जात होतं. दिल्ली महिला आयोगाकडून (Delhi Commission for Women) यासंदर्भात एसबीआय व्यवस्थापनाला नोटीस जारी करत उत्तर मागितले होते. वाढत्या दबावानंतर एसबीआयने आपला वादग्रस्त निर्णय मागे घेतला आहे. एसबीआयने ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे.
एसबीआयने आपल्या ट्विटमध्ये म्हटलेय की, लोकांच्या भावनाचा विचार पाहाता प्रेग्नेंट महिलांसंदर्भातील बदलेला नियम माघारी घेतला आहे. यापुढे होणारी भरती जुन्या नियमांच्या आधारावरच होणार आहे.
Press release relating to news items about required fitness standards for recruitment in Bank. Revised instructions about recruitment of Pregnant Women candidates stands withdrawn.@DFS_India pic.twitter.com/QXqn3XSzKF
— State Bank of India (@TheOfficialSBI) January 29, 2022
ऑल इंडिया बॅंक एम्प्लॉईज युनियनने केला होता विरोध -
ऑल इंडिया बॅंक एम्प्लॉईज युनियनकडून एसबीआय व्यवस्थापनाला पत्र पाठवत आपला निर्णय मागे घेण्यास सांगितलं होतं. जर हा निर्णय मागे नाही घेतला तर कायदेशीर लढाई लढू. एसबीआयचा हा निर्णय कायद्याला धरुन नाही, असंही ऑल इंडिया बॅंक एम्प्लॉईज युनियनकडून सांगण्यात आलं.
एसबीआयने नियमात काय केला होता बदल?
एसबीआय व्यवस्थापनेनं प्रेग्नेंट महिलांना कामावर रुजू करुन घेण्याबाबतीत नियमांत बदल केला होता. 3 महिन्यांच्यावर जर प्रेग्नेंन्ट असेल तर महिलांना कामावर रुजू करुन घेतले जाणार नाही, त्यांना 'टेम्पररी अनफीट' मानले जाईल. तसेच डिलिव्हरीच्या 4 महिन्यांनंतर महिलांनी सेवेत रुजू झाले पाहिजे.
जुना नियम काय आहे?
सहा महिने प्रेग्नेंसी असताना महिलांना SBI मध्ये कामावर रुजू करुन घेतले जायचे. पण यासाठी महिलेला गायनेकोलॉजिस्टकडून प्रमाणपत्र घ्यावं लागत होतं.
इतर महत्त्वाच्या बातम्या :
- Coronavirus Cases Today : देशातील कोरोना रुग्णांमध्ये घट, गेल्या 24 तासात 2 लाख 35 हजार 532 रुग्ण, 871 जणांचा मृत्यू
- Bloomberg Index : वॉरन बफेटने मार्क झुकरबर्गला टाकलं मागे, एलन मस्क कितव्या स्थानी? जाणून घ्या...
- Beating Retreat Ceremony : आज 'बीटिंग द रिट्रीट', सोहळ्यात पहिल्यांदाच होणार 1000 ड्रोनचा खास शो; काय आहे परंपरा?