SBI Internet Banking: एसबीआय इंटरनेट बँकिंग रविवारी मध्यरात्री दोन वाजेपर्यंत बंद, टेक्नॉलॉजी अपग्रेडेशन होणार
SBI Internet Banking: शनिवार, 19 फेब्रुवारी रात्री 11.30 पासून ते रविवारी, 20 फेब्रुवारी मध्यरात्रीपर्यंत एसबीआयचे इंटरनेट बँकिंग बंद राहणार आहे.
मुंबई: एसबीआय ग्राहकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. शनिवार, 19 फेब्रुवारी रात्री 11.30 पासून ते रविवारी, 20 फेब्रुवारी मध्यरात्रीपर्यंत एसबीआयचे इंटरनेट बँकिंग बंद राहणार आहे. तशी माहिती एसबीआयने आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली आहे.
We request our esteemed customers to bear with us as we strive to provide a better Banking experience. pic.twitter.com/djj8j1MHJj
— State Bank of India (@TheOfficialSBI) February 19, 2022
एसबीआयची इंटरनेट बँकिंग सुविधा म्हणजे योनो, योनो लाईट, योनो बिझनेस, युपीआय, इंटरनेट बँकिंग या सारख्या सेवा अडीच तासांसाठी बंद राहणार आहेत. याचा परिणाम बँकेच्या ग्राहक सुविधेवर होणार असून या काळात ग्राहक कोणतेही व्यवहार करु शकणार नाहीत.
'एफडी'वर मिळणार अधिक व्याजदर
गुंतवणूकदारांना स्टेट बँक ऑफ इंडियाच्या मुदत ठेवीवर (FD) अधिक लाभ मिळणार आहे. स्टेट बँकेने आपल्या ठराविक एफडीवरील व्याजदर वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. एसबीआयच्या वेबसाइटवर उपलब्ध असलेल्या माहितीनुसार, 2 ते 3 वर्षांपेक्षा कमी मुदत ठेवींवरील व्याज दर 5.20 टक्क्यांनी वाढवण्यात आला आहे. तसेच 3 ते 5 वर्षांपेक्षा कमी मुदत ठेवींवरील व्याज दर 5.45 टक्क्यांनी वाढवण्यात आला आहे. तर 5 वर्षे आणि 10 वर्षांपर्यंतच्या मुदत ठेवींवरील व्याजदरात बँकेने 5.50 टक्क्यांची वाढ केली आहे. हे नवीन व्याजदर 2 कोटी रुपयांपेक्षा कमी किमतीच्या मुदत ठेवींसाठी लागू करण्यात आले आहेत.
संबंधित बातम्या:
- गुंतवणूक करायची आहे? SBI MF ची मल्टी-कॅप योजना ठरु शकते फायद्याची, जाणून घ्या सर्वकाही
- SBI Internet Banking: एसबीआय इंटरनेट बँकिंग रविवारी मध्यरात्री दोन वाजेपर्यंत बंद, टेक्नॉलॉजी अपग्रेडेशन होणार
- Online Fraud : फक्त एक कोड अन् बँक खातं पूर्ण रिकामं; SBI चा इशारा, वाचा पूर्ण अहवाल
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha