एक्स्प्लोर

Farmers Protest | 18 फेब्रुवारीला देशव्यापी रेल रोको, संयुक्त किसान मोर्चाची घोषणा; कसा आहे पुढील प्लॅन?

Farmers Protest : दिल्लीच्या सीमांवर कृषी कायद्यांचा विरोध करणाऱ्या शेतकरी संघटना आपलं आंदोलन आणखी तीव्र करणार आहेत. संयुक्त किसान मोर्चाने 18 फेब्रुवारीला चार तासांच्या देशव्यापी रेल रोकोची घोषणा केली आहे.

नवी दिल्ली : तीन नव्या कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकरी संघटनांनी आंदोलन आणखी तीव्र करण्याची घोषणा केली आहे. दिल्लीच्या सीमांवर जवळपास 80 दिवसांपासून शेतकरी आंदोलनाचं नेतृत्त्व करणाऱ्या संयुक्त किसान मोर्चाने (एसकेएम) 18 फेब्रुवारी रोजी देशभरात रेलरोको अभियान राबवण्याची घोषणा केली.

संयुक्त किसान मोर्चाने म्हटलं की, ''18 फेब्रुवारी रोजी दुपारी 12 वाजल्यापासून चार वाजेपर्यंत संपूर्ण देशभरात रेलरोको अभियान राबवलं जाईल. तसंच 12 फेब्रुवारीपासून राजस्थानचे सर्व टोलनाके मोफत करणार असल्याचंही संयुक्त किसान मोर्चाने म्हटलं.

14 फेब्रुवारी रोजी पुलवामा हल्ल्याच्या स्मृतिदिनी जवान आणि शेतकऱ्यांसाठी कँडल मार्च आणि मशाल मार्च काढण्यात येईल. तर 16 फेब्रुवारीला सर छोटू राम यांच्या जयंतीनिमित्त किसान सॉलिडिरिटी शो केला जाईल, असंही संयुक्त किसान मोर्चाने सांगितलं

संयुक्त किसान मोर्चाने म्हटलं की, "शेतकऱ्यांच्या हिसासाठी हरियाणातील जनतेने भाजप आणि जेजेपीच्या नेत्यांवर दबाव टाकावा किंवा त्यांना खुर्ची रिकामी करण्यास सांगावं."

दिल्लीतल्या शेतकरी मोर्चाचा पुढील अजेंडा
  • - 14 फेब्रुवारी : संध्याकाळी साते ते आठच्या दरम्यान शहीद किसान आणि जवान यांच्या स्मरणार्थ मशाल/कँडल मार्च
  • - 16 फेब्रुवारी : देशभरात सर छोटूराम जयंती
  • - 18 फेब्रुवारी : दुपारी 12 ते 4 दरम्यान रेलरोको
  • - 19 फेब्रुवारी : छत्रपती शिवाजी महाराज जयंती देशभरात साजरी केली जाणार

दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आजच लोकसभेत शेतकऱ्यांचं आंदोलन पवित्र असल्याचं म्हटलं. सोबतच आंदोलनजीवींनी हे आंदोलन अपवित्र केल्याचं सांगितलं. पंतप्रधान मोदी म्हणाले की, "संसद आणि सरकार शेतकऱ्यांचा अतिशय आदर करतं आणि तिन्ही कृषी कायदे कोणासाठीही बंधनकारक नाही तर पर्यायी आहेत. अशात विरोधाचं कोणतंही कारण नाही."

शेतकरी संघटना दिल्लीच्या सिंघु, गाझीपूर आणि टिकरी सीमेवर सुमारे 80 दिवसांपासून ठाण मांडून बसले आहेत. केंद्र सरकारने नवे तीन कृषी कायदे मागे घ्यावेत, अशी मागणी या शेतकऱ्यांची आहे.

आपल्या मागणीसंदर्भात शेतकऱ्यांनी 26 जानेवारी रोजी ट्रॅक्टर रॅली काढली होती. या दरम्यान दिल्लीच्या अनेक भागांमध्ये हिंसाचाराच्या घटना घडल्या होत्या. त्यानंतर शेतकरी संघटनांनी 6 फेब्रुवारी रोजी तीन तासांच्या चक्काजामची घोषणा केली होती.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nashik Fog : नाशिक शहरावर पसरली धुक्याची दाट दुलई, वाहन चालकांची कसरत, पाहा PHOTOS
नाशिक शहरावर पसरली धुक्याची दाट दुलई, वाहन चालकांची कसरत, पाहा PHOTOS
Sharad Pawar Convoy Accident : 3 ते 4 गाड्या एकमेकांना आदळ्या, शरद पवारांच्या ताफ्याचा अपघात
Sharad Pawar Convoy Accident : 3 ते 4 गाड्या एकमेकांना आदळ्या, शरद पवारांच्या ताफ्याचा अपघात
Mumbai: उपद्रवी तळीरामांवर मुंबई पोलिसांची मोठी कारवाई, 54 चारचाक्या जप्त, 62 हजारांचा दंड
उपद्रवी तळीरामांवर मुंबई पोलिसांची मोठी कारवाई, 54 चारचाक्या जप्त, 62 हजारांचा दंड
Rohit Sharma Injury : मेलबर्न कसोटीतून रोहित शर्मा बाहेर? नेटमध्ये सराव करताना दुखापत; टीम इंडियाला मोठा धक्का
मेलबर्न कसोटीतून रोहित शर्मा बाहेर? नेटमध्ये सराव करताना गंभीर दुखापत; टीम इंडियाला मोठा धक्का
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Top 80 at 8AM Superfast 22 December 2024 सकाळी ८ च्या ८० महत्वाच्या बातम्याSharad Pawar Convoy Accident : 3 ते 4 गाड्या एकमेकांना आदळ्या, शरद पवारांच्या ताफ्याचा अपघातABP Majha Marathi News Headlines 08 AM TOP Headlines 08 AM 22 December 2024Majha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा: : 22 डिसेंबर 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nashik Fog : नाशिक शहरावर पसरली धुक्याची दाट दुलई, वाहन चालकांची कसरत, पाहा PHOTOS
नाशिक शहरावर पसरली धुक्याची दाट दुलई, वाहन चालकांची कसरत, पाहा PHOTOS
Sharad Pawar Convoy Accident : 3 ते 4 गाड्या एकमेकांना आदळ्या, शरद पवारांच्या ताफ्याचा अपघात
Sharad Pawar Convoy Accident : 3 ते 4 गाड्या एकमेकांना आदळ्या, शरद पवारांच्या ताफ्याचा अपघात
Mumbai: उपद्रवी तळीरामांवर मुंबई पोलिसांची मोठी कारवाई, 54 चारचाक्या जप्त, 62 हजारांचा दंड
उपद्रवी तळीरामांवर मुंबई पोलिसांची मोठी कारवाई, 54 चारचाक्या जप्त, 62 हजारांचा दंड
Rohit Sharma Injury : मेलबर्न कसोटीतून रोहित शर्मा बाहेर? नेटमध्ये सराव करताना दुखापत; टीम इंडियाला मोठा धक्का
मेलबर्न कसोटीतून रोहित शर्मा बाहेर? नेटमध्ये सराव करताना गंभीर दुखापत; टीम इंडियाला मोठा धक्का
Horoscope Today 22 December 2024 : आज रविवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
आज रविवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
Maharashtra Cabinet Portfolio : महायुती सरकारमध्ये फक्त आणि फक्त साताऱ्याचा बुलंद आवाज! चारही मंत्र्यांना 'वजनदार' खाती, भाजपच्या संकटमोचकांचे खाते थेट जयकुमार गोरेंच्या ताब्यात
महायुती सरकारमध्ये फक्त आणि फक्त साताऱ्याचा बुलंद आवाज! चारही मंत्र्यांना 'वजनदार' खाती, भाजपच्या संकटमोचकांचे खाते थेट जयकुमार गोरेंच्या ताब्यात
Video: दिलीप वळसे पाटलांचा कार्यकर्त्यालाच टोमणा; 1500 मतांनी जिंकलोय अन् पक्षाध्यक्षांकडे मंत्रिपद मागायचं का?
Video: दिलीप वळसे पाटलांचा कार्यकर्त्यालाच टोमणा; 1500 मतांनी जिंकलोय अन् पक्षाध्यक्षांकडे मंत्रिपद मागायचं का?
Maharashtra Cabinet Portfolio : अजितदादांचा शब्द खरा ठरला! गिरीश महाजनांना खातेवाटपात धक्का, विखे पाटलांच्या महसूल खात्याची जबाबदारी बावनकुळेंच्या खांद्यावर
अजितदादांचा शब्द खरा ठरला! गिरीश महाजनांना खातेवाटपात धक्का, विखे पाटलांच्या महसूल खात्याची जबाबदारी बावनकुळेंच्या खांद्यावर
Embed widget