एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

समझौता एक्स्प्रेस बॉम्बस्फोट प्रकरणी स्वामी असीमानंदसह चौघांची निर्दोष मुक्तता

समझौता एक्स्प्रेस बॉम्बस्फोट प्रकरणी मुख्य आरोपी असीमानंद याच्यासह लोकेश शर्मा, कमल चौहान आणि राजेंद्र चौधरी यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.

नवी दिल्ली : समझोता एक्स्प्रेस बॉम्बस्फोट प्रकरणी मुख्य आरोपी स्वामी असीमानंदसह चारही आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. पंचकुलातील एनआयए कोर्टाने निर्णय दिला आहे. मुख्य आरोपी असीमानंद याच्यासह लोकेश शर्मा, कमल चौहान आणि राजेंद्र चौधरी यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. 18 फेब्रुवारी 2007 रोजी हरियाणातील पानिपतमध्ये समझौता एक्स्प्रेसमध्ये बॉम्बस्फोट झाला होता. भारत आणि पाकिस्तानला जोडणारी ही ट्रेन अमृतसरमधील अतारी रेल्वे स्थानकाच्या दिशेने जात असताना स्फोट झाला. स्फोटात समझौता एक्स्प्रेसचे दोन डबे जळून खाक झाले. या स्फोटात 68 जणांना प्राण गमवावे लागले होते, त्यापैकी बहुतांश पाकिस्तानी नागरिक होते, तर चौघे भारतीय रेल्वेचे अधिकारी होते. नबा कुमार सरकार उर्फ स्वामी असीमानंद, लोकेश शर्मा, कमल चौहान आणि राजेंद्र चौधरी यामध्ये आरोपी होते. असीमानंदवर स्फोटासाठी साहित्य पुरवल्याचा आरोप होता. कोण आहे असीमानंद? असीमानंदने आपलं तारुण्य संघाच्या आदिवासी कल्याण आश्रममध्ये घालवलं. स्फोटाचा कट रचल्याचा आरोप ज्या कालावधीत होता, त्यावेळी तो आदिवासी कल्याण आश्रमाचे, धार्मिक विंग जागरण विभागाचा राष्ट्रीय प्रमुख होता. त्याच्यासाठी हे पद खास तयार करण्यात आलं. 2005 मध्ये एम एस गोलवलकर यांच्या जन्मशताब्दीनिमित्त असीमानंदच्या कार्याचा गौरव करण्यात आला. असीमानंदला विशेष गुरुजी सन्मान देण्यात आला. या सन्मानासोबत त्याला एक लाख रुपये देण्यात आले. या गौरव सोहळ्यात भाजपचे माजी अध्यक्ष मुरली मनोहर जोशी यांनी व्याख्यान दिलं. मात्र असीमानंदवर आरोप होऊनही दिलेला सन्मान, ना संघाने परत घेतला, ना भाजपने.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 25 November 2024 : आठवड्याचा पहिला दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
आठवड्याचा पहिला दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
फॉर्म नंबर 17C आणि EVM चा सिरीयल नंबर मॅच होत नाही, माझ्या बायको आणि आईने मला मतदान केलं नाही का? मनसे उमेदवाराचा ईव्हीएम घोटाळ्याचा आरोप
फॉर्म नंबर 17C आणि EVM चा सिरीयल नंबर मॅच होत नाही, माझ्या बायको आणि आईने मला मतदान केलं नाही का? मनसे उमेदवाराचा ईव्हीएम घोटाळ्याचा आरोप
Eknath Shinde: निकालानतंर मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; लवकरच लाडक्या बहि‍णींना 2100 रुपये दरमहा देणार
निकालानतंर मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; लवकरच लाडक्या बहि‍णींना 2100 रुपये दरमहा देणार
जनतेचा कौल मान्य, शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांची पालखी निष्ठेनं पुढे नेऊ, विधानसभेच्या निकालावर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया
जनतेचा कौल मान्य, शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांची पालखी निष्ठेनं पुढे नेऊ, विधानसभेच्या निकालावर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Eknath Shinde All MLA | शिवसेनेचे निवडून आलेले सर्व आमदार एकच फ्रेममध्ये!Eknath Shinde MLA Welcome | निवडून आलेल्या सर्व नवनिर्वाचित आमदारांचं शिंदेंकडून स्पेशल वेलकमDevendra Fadnavis CM? | संघाची फडणवीसांना पसंती असू शकते का? Special ReportMahayuti Ladki bahin Yojana | महायुतीसाठी लाडकी बहीण योजना ठरली गेमचेंजर! Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Horoscope Today 25 November 2024 : आठवड्याचा पहिला दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
आठवड्याचा पहिला दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
फॉर्म नंबर 17C आणि EVM चा सिरीयल नंबर मॅच होत नाही, माझ्या बायको आणि आईने मला मतदान केलं नाही का? मनसे उमेदवाराचा ईव्हीएम घोटाळ्याचा आरोप
फॉर्म नंबर 17C आणि EVM चा सिरीयल नंबर मॅच होत नाही, माझ्या बायको आणि आईने मला मतदान केलं नाही का? मनसे उमेदवाराचा ईव्हीएम घोटाळ्याचा आरोप
Eknath Shinde: निकालानतंर मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; लवकरच लाडक्या बहि‍णींना 2100 रुपये दरमहा देणार
निकालानतंर मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; लवकरच लाडक्या बहि‍णींना 2100 रुपये दरमहा देणार
जनतेचा कौल मान्य, शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांची पालखी निष्ठेनं पुढे नेऊ, विधानसभेच्या निकालावर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया
जनतेचा कौल मान्य, शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांची पालखी निष्ठेनं पुढे नेऊ, विधानसभेच्या निकालावर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया
एकाच घरात खासदारकी अन् आमदारकी, मुंबई, नांदेडसह राज्यातील 5 जोड्या; भाऊ-भाऊही विधानसभेत
एकाच घरात खासदारकी अन् आमदारकी, मुंबई, नांदेडसह राज्यातील 5 जोड्या; भाऊ-भाऊही विधानसभेत
सत्ता स्थापनेचा मुहूर्त लांबणीवर? घाई न करता व्यवस्थित निर्णय घेऊन सरकार स्थापन करणार, एक मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्री पॅटर्न कायम राहणार
सत्ता स्थापनेचा मुहूर्त लांबणीवर? घाई न करता व्यवस्थित निर्णय घेऊन सरकार स्थापन करणार, केंद्राशी चर्चेनंतर अंतिम निर्णय
Rashmi Shukla Meet Devendra Fadnavis :माजी पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला
Rashmi Shukla Meet Devendra Fadnavis :माजी पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला
Rashmi Shukla : महायुतीचं सरकार येताच रश्मी शुक्ला देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला, निवडणुकीपूर्वी केलं होतं पदमुक्त
महायुतीचं सरकार येताच रश्मी शुक्ला देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला, निवडणुकीपूर्वी केलं होतं पदमुक्त
Embed widget