Jaishankar : पाकिस्तानवर शब्दांचा मारा करणारे 'एस. जयशंकर', कधी बिलावल भुट्टो, तर कधी 26/11; 'या' वक्तव्यांची जगात चर्चा
S. Jaishankar on Pakistan : भारताचे परराष्ट्र मंत्री (Minister of External Affairs of India) एस. जयशंकर (S. Jaishankar) यांनी अनेकदा पाकिस्तानला प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष टोले लगावले आहेत.
Jaishankar on Pakistan : एस. जयशंकर... हे नाव जितकं प्रसिद्ध त्याहूनही जास्त प्रसिद्ध होतायत त्यांनी पाकिस्तानला (Pakistan) केलेली प्रत्युत्तरं. अनेकदा सोशल मीडीयावर तुम्ही यांची रोखठोक विधानं ऐकली असतील. भारताचे परराष्ट्र मंत्री (Minister of External Affairs of India) एस. जयशंकर (S. Jaishankar) यांनी अनेकदा पाकिस्तानला प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष टोले लगावलेत. याचे व्हिडीओ अनेक वेळा सोशल मीडियावर देखील तुफान व्हायरल होताना आपण पाहिले असतील.
काही दिवसांपूर्वीच पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री बिलावल भुट्टोंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर आक्षेपार्ह टीका केली होती. परराष्ट्र मंत्री एस जयशंकर 14 आणि 15 डिसेंबरला संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या भारताच्या अध्यक्षतेखाली दोन दिवसीय यूएस दौऱ्यावर होते. पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो यांना त्यांनी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत सडेतोड उत्तर दिलं.
#WATCH | “Hosting Osama Bin Laden…” EAM Dr S Jaishankar’s sharp response to Pakistan FM Bhutto after ‘Kashmir remark’ in United Nations pic.twitter.com/jiyVVW2jrn
— ANI (@ANI) December 14, 2022
भारतीय समुदायासोबत बोलताना एस जयशंकर यांनी पाकिस्तानचे नाव न घेता सूचक इशारा दिला आहे. ते म्हणाले, 'आम्हाला चांगले शेजारी देश हवेत याचा अर्थ दहशतवादाच्या दबावाला बळी पडून वाटाघाटी कराव्यात असा होत नाही.' रशियाने युक्रेनवर हल्ला केल्यानंतर परराष्ट्र मंत्री म्हणून जयशंकर यांनी घेतलेल्या भूमिकेची जोरदार चर्चा झाली होती. एवढंच काय तर एकदा लोकसभेतही युक्रेनवरील चर्चेला चोख उत्तर दिलं होतं. युक्रेन आणि रशियामधील युद्धाचा भारतासह संपूर्ण जागतिक अर्थव्यवस्थेवर परिणाम होणार असल्याचे ते म्हणाले.
त्यांच्या भाषणाचा व्हिडीओ हा पाहा :
- परराष्ट्र व्यवहार मंत्री एस.जयशंकर यांनी आज लोकसभेत युक्रेनवरील चर्चेला दिलं उत्तर.
— DD Sahyadri News | सह्याद्री बातम्या (@ddsahyadrinews) April 6, 2022
- #युक्रेन मधल्या युद्धाचा भारतासह संपूर्ण जागतिक अर्थव्यवस्थेवर परिणाम - @DrSJaishankar @DDNewslive @DDNewsHindi @MEAIndia#BudgetSession2022 #LokSabha #Ukraine pic.twitter.com/Q8hbY8r9ws
त्यानंतरसुद्धा एस जयशंकर यांनी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या दहशतवादविरोधी समितीच्या बैठकीत मुंबईतील दहशतवादी हल्ल्यावरून पाकिस्तानवर जोरदार निशाणा साधला होता.
"Bcz u'r a diplomat, u'r untruthful, I could use much harsher words", EAM Jaishankar when an Austrian anchor questions on usage of term 'terror epicenter' for Pakistan.
— Sidhant Sibal (@sidhant) January 3, 2023
Vdo ctsy: Austria's ORF pic.twitter.com/UP1cPFD0wD
एस जयशंकर हे ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असताना एका माध्यमाच्या मुलाखतीत त्यांना पत्रकाराने प्रश्न विचारला त्यावरही त्यांनी चोख प्रत्युत्तर दिले. पत्रकाराने थेट पाकिस्तानचा उल्लेख करत आपण यापूर्वीही पाकिस्तान हा दहशतवादाचा केंद्रबिंदू आहे असा उल्लेख केला, केंद्रबिंदू हा शब्दप्रयोग योग्य ठरेल का? असा प्रश्न विचारला त्यावर जयशंकर यांनी रोखठोक उत्तर दिलं. त्यांनी म्हटलं की, मी त्यासाठी 'दहशतवादाची केंद्रबिंदू याहूनही कठोर शब्द वापरू शकतो'
पाकिस्तानने फेटाळले 26/11 दहशतवादी हल्ल्याचे आरोप
26/11 दहशतवादी हल्ल्यावरून भारताने पाकिस्तानला खडेबोल सुनावले. जयशंकर यांनी पाकिस्तानला धारेवर धरत म्हटलं की, पाकिस्तानकडून मुंबई दहशतवादी हल्ल्याच्या मुख्य सूत्रधारांवर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही.