Russia Ukraine War : रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे युक्रेमधील भारतीय नागरिकांना मायदेशी परत आणण्यासाठी सरकारकडून प्रयत्न सूरू आहेत. ऑपरेशन गंगाअंर्तगत आतापर्यंत सहा विमाने युक्रेनमध्ये अडकलेल्या नागरिकांना घेऊन मायदेशी आली आहे. हंगेरीहून आज सहावे विमान 240 नागरिकांसह दिल्लीत दाखल झाले. 
 
हंगेरीची राजधानी बुडापेस्ट येथून 240 भारतीयांना घेऊन येणारे विमान आज सायंकाळी दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरले. केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी या सर्व भारतीयांचे विमानतळावर स्वागत केले. युक्रेनमधील  युद्धजन्य परिस्थितून हे नागरिक प्रथिम हंगेरीत पोहोचले आणि तेथून भारतात परतले. हे विद्यार्थी भारतात दाखल झाल्यानंतर त्यांनी समाधान व्यक्त केले आहे. शिवाय अजून अनेक नागरीक युक्रेनमध्ये अडकले असल्याचे सांगितले.  






गेल्या पाच दिवसांपासून रशिया आणि युक्रेनमधील संघर्ष शिगेला पोहोचला आहे. त्यामुळे युक्रेनमध्ये अकडलेल्या भारतीय नागरिकांना परत मायदेशी आणण्यासाठी ऑपरेशन गंगा राबवण्यात येत आहे. युक्रेनमधील भारतीय नागरिकांना घेऊन  आतापर्यंत सहा विमाने भारतात दाखल झाली आहेत. दरम्यान, गरज पडल्यास भारतीयांना युक्रेनमधून सुखरूप बाहेर काढण्यासाठी भारतीय हवाई दलाचीही मदत घेतली जाईल अशी माहिती परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी  दिली आहे. 


अरिंदम बागची यांनी सांगितले की, युक्रेनच्या सीमेला लागून असलेल्या 4 देशांमध्ये आम्ही विशेष दूत तैनात करण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया रुमानियाला जातील. किरेन रिजिजू स्लोव्हाक गणराज्यला जातील, हरदीप सिंग पुरी हंगेरीला जातील तर व्हीके सिंह पोलंडला जातील, अशी माहिती बागची यांनी दिली आहे. 


"मोल्दोव्हामार्गे एक नवीन मार्ग सुरू झाला आहे. आमची टीम रोमानियामार्गे भारतीयांना बाहेर काढण्यासाठी मदत करेल. आतापर्यंत सुमारे 1 हजार 400 भारतीय नागरिकांना घेऊन सहा विमाने भारतात आली आहेत. आम्ही सर्व भारतीय नागरिकांना आणि विद्यार्थ्यांना वेस्टर्न युक्रेनला जाण्याचे आवाहन करत आहोत. नागरिकांनी तिथे थेट सीमेवर जाऊ नये. सीमेवर खूप गर्दी असते.  त्यामुळे जवळच्या शहरामध्ये जावे. तेथे आमची टीम मदत करेल, अशी माहिती अरिंदम बागची यांनी दिली आहे. 


महत्वाच्या बातम्या