Russia Ukraine War : युक्रेनमध्ये अडकलेल्या 182 विद्यार्थ्यांना घेऊन एअर इंडियाच्या विशेष विमान मुंबईत दाखल झाले आहे. बुखारेस्ट, रोमानिया येथील भारतीय विद्यार्थ्यांना सुरक्षित घेऊन एअर इंडियाचे विमान परतले आहे. विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यासाठी मंत्री नारायण राणे विमानतळावर पोहोचले. युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना सुरक्षित मायदेशी आणण्यासाठी केंद्र सरकारने एअर इंडियासह ऑपरेशन गंगा हाती घेतली आहे. भारतीयांना युक्रेन घेऊन परतणारे ही सातवी फ्लाईट आहे. एअर इंडियाचे विमान IX1202 मुंबई विमानतळावर पोहोचल्यावर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी भारतीय नागरिकांचे स्वागत केले.





 


युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांसाठी सरकारकडून युद्ध पातळीवर प्रयत्न सुरु आहेत. युक्रेनच्या बुखारेस्टमधून एअर इंडियाच्या आठव्या आणि नवव्या विमानानेही उड्डाण केले आहे. 218 भारतीयांसह हे विमान दिल्लीला रवाना झाले आहे. मंगळवारी पहाटे 5.30 वाजता परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी ट्विट करून 'ऑपरेशन गंगा'चे नववे उड्डाण दिल्लीला रवाना झाल्याची माहिती दिली. 







युक्रेनला भारताकडून मदतीचा हात



भारताने युक्रेनला मदत पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. भारताचे संयुक्त राष्ट्रातील स्थायी प्रतिनिधी टी.एस. तिरुमूर्ती यांनी सांगितले की, 'युक्रेनमधील मानवतावादी गरजा लक्षात घेत भारत सरकारने औषधांसह तत्काळ मदत पुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे. ही मदत मंगळवारी युक्रेनला पाठवण्यात येईल.'




महत्त्वाच्या इतर बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha