Air Travel Price Hike : येत्या काळात हवाई प्रवास महागण्याची शक्यता आहे. विमान कंपन्या विमान प्रवासाचे दर वाढवू शकतात. युक्रेन-रशिया संघर्षामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती वाढल्यामुळे सरकारी तेल कंपन्यांनी विमान इंधनाच्या किमती (ATF) 3.2 टक्क्यांनी वाढवल्या आहेत, त्यानंतर देशातील एटीएफच्या किमती विक्रमी उच्चांकावर पोहोचल्या आहेत. दोन महिन्यांपेक्षा कमी कालावधीत एटीएफच्या किमतीत झालेली ही पाचवी वाढ आहे, परंतु क्रूड महाग होऊनही पेट्रोल आणि डिझेलचे दर सलग 118 व्या दिवशी स्थिर राहिले.
सार्वजनिक क्षेत्रातील पेट्रोलियम कंपन्यांनी सांगितले की, राष्ट्रीय राजधानीत एटीएफ (Air Turbine Fuel) ची किंमत 3.2 टक्क्यांनी वाढून 93,530 रुपये प्रति किलोलीटर झाली आहे. ही एटीएफच्या किंमतीचा सर्वोच्च दर आहे. ऑगस्ट 2008 मध्ये ATF ची किंमत 71,028.26 रुपये प्रति किलोलिटर होती.
आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाची किंमत मंगळवारी प्रति बॅरल यूएस डॉलर 147 वर पोहोचली, तेव्हा ब्रेंट क्रूड तेल प्रति बॅरल 100 डॉलरच्या वर होते. तेल कंपन्या दर 15 दिवसांना हवाई इंधनाच्या किमतींचा आढावा घेतात. 15 मार्च रोजी आढावा घेतला जाईल तेव्हा हवाई इंधनाच्या किमती पुन्हा वाढू शकतात, अशी शक्यता वर्तवली आहे.
पेट्रोल, डिझेल आणि हवाई इंधनाच्या किमती ठरवण्याचा अधिकार सरकारी तेल कंपन्यांना आहे. या कंपन्या हवाई इंधनाच्या किमतीत सातत्याने वाढ करत आहेत, मात्र उत्तर प्रदेश आणि पंजाबसारख्या राज्यांतील विधानसभा निवडणुकांमुळे पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ केली जात नाही. मात्र, याबाबत अधिकृतपणे काहीही सांगण्यात आलेले नाही.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- Russia Ukraine War : युक्रेनमधील 182 भारतीय विद्यार्थ्यांना घेऊन एअर इंडियाचे विमान मुंबईत दाखल
- Russia Ukraine War : कॅनडाकडून रशियन तेल आयातीवर बंदी, पंतप्रधान जस्टिन ट्रूडो म्हणाले...
- Russia Ukraine War : युक्रेनला भारताकडून मदतीचा हात; पहिली खेप आज होणार रवाना
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha