चंद्राच्या कक्षेत पोहचलं रशियाचं लूना-25, भारताच्या दोन दिवस अगोदर उतरणार चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर
चंद्राच्या इक्वेटरवर आजवर मोहिमा झाल्या आहेत. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर प्रथमच रशिया आणि भारताचे यान सॉफ्ट लँडिंग करणार आहे.
नवी दिल्ली : भारताची चांद्रयान - 3 मोहीम (Chandrayaan 3) अखेरच्या टप्प्यात आहे. चांद्रयान मोहिमेसाठी आज महत्त्वाचा दिवस आहे. आज चांद्रयान -3 चं प्रोपल्शन मॉड्यूल लँडरपासून वेगळं होणार आहे. 23 ऑगस्टला चंद्राच्या पृष्ठभागावर चांद्रयान -3 उतरणार आहे. तर दुसरीकडे रशियानेही सोडलेले 'लुना-25' बुधवारी दुपारी 2.27 वाजता चंद्राच्या 100 किमी कक्षेत पोहचले आहे. रशियाचे 'लुना-25' हे चांद्रयान-3 च्या दोन दिवस अगोदर म्हणजे येत्या 21 ऑगस्ट रोजी चंद्रावर उतरणार आहे. आतापर्यंत चंद्राच्या इक्वेटरवर सर्व मोहिमा झाल्या आहेत. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर प्रथमच रशिया आणि भारताचे यान सॉफ्ट लँडिंग करणार आहे.
जवळपास पन्नास वर्षानंतर रशिया चंद्रावरील संशोधन करत आहे. रशियाने 10 ऑगस्ट रोजी 1976 मध्ये लुना-24 पाठवले होते. त्या मोहिमेनंतर जवळपास पाच दशकांनंतर प्रथमच लुना-25 अंतराळात पाठवण्यात आले. त्याने चंद्राकडे जाण्याचा अधिक थेट मार्ग स्वीकारला आहे. 11 दिवसांत म्हणजे 21 ऑगस्टला 'लुना-25'चंद्रावर उतरणार आहे. हे यान अधिक शक्तीशाली आणि खर्चिक रॉकेटद्वारे चंद्राच्या दिशेने निघाले होते.यानाच्या हलक्या वजनाच्या डिझाईन आणि इंधन साठवणुकीच्या क्षमतेमुळे कमी वेळेत हे यान चंद्राच्या कक्षात पोहचले.
चांद्रयान-3 मध्ये इंधनाचा कमी तसेच कमी खर्चात चंद्रवार उतरणार आहे.यासाठी इस्रोने पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाचा वापर केला आहे. या प्रक्रियेत इंधनाची बचत होते, मात्र त्यासाठी जास्त वेळ लागतो. त्यामुळे चांद्रयानाला चंद्रावर पोहोचण्यासाठी जास्त वेळ लागत आहे. भारताच्या चांद्रयान-3 ने आंध्रप्रदेशातील श्रीहरिकोटा येथून 14 जुलै रोजी रॉकेटमधून उड्डाण केले होते. तर रशियाने भारतानंतर जवळपास महिन्याभरानंतर 11 ऑगस्ट रोजी सोयूज 2.1 बी रॉकेटद्वारे अमूर ओब्लास्टच्या वोस्तानी कॉस्मोड्रोमवरुन लॉन्च केले होते.
जगाची नजर भारत आणि रशियाच्या मिशनवर आहे. दोन्ही मोहिमांना चंद्राच्या कक्षात पोहचवण्यासाठी लागणार वेळेचे कारण यानाचे डिझाईन आणि इंधन क्षमता हे आहे. Luna-25 चे वजन फक्त 1,750 kg आहे. जे चांद्रयान-3 च्या 3,800 kg पेक्षा जास्त हलके आहे. इस्रोच्या मते यानाच्या हलक्या वजनाच्या डिझाईनमुळे Luna-25 चंद्राच्या कक्षेत लवकर पोहचण्यास मदत झाली आहे.
भारत आणि रशियाची चंद्र मोहिम
भारतासह आणि रशिया चंद्राच्या पृष्ठभागावर उतरण्याच्या प्रयत्नात आहे. चांद्रयान-3 नंतर सुमारे एक महिन्यानंतर, मिशन लुना-25 लाँच करण्यात आलं आणि ते प्रथम चंद्राच्या पृष्ठभागावर उतरलं. रशियाच्या चंद्रमोहिमेमधील लुना-25 हे अंतराळयान 21 ऑगस्ट रोजी चंद्राच्या पृष्ठभागावर उतरण्याची शक्यता आहे. तर, भारताचं चांद्रयान-3 दोन दिवसांनंतर म्हणजेच, 23 ऑगस्ट रोजी चंद्रावर पोहोचणार आहे.
हे ही वाचा :
Moon Mission : चंद्रावर असं आहे तरी काय? याचा मानवाला काय फायदा? जगातील देशांमध्ये नेमकी स्पर्धा कशासाठी? वाचा सविस्तर...