एक्स्प्लोर
तामिळनाडू विधानसभेत राडा, खुर्च्यांची तोडफोड, अध्यक्षांचे कपडे फाडले
चेन्नई : तामिळनाडू विधासभेत आज मोठा राडा पाहायला मिळाला. गुप्त मतदानावरुन डीएमकेच्या आमदारांनी तोडफोड केली. इतकंच नाही तर या गदारोळात विधानसभा अध्यक्ष पी. धनपाल यांचे कपडेही फाडले.
मुख्यमंत्री ई पलानीसामी यांच्यासाठी आजचा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे. विधानसभेत आज त्यांना बहुमत सिद्ध करायचं आहे. पण त्याआधीच विधानसभेत जोरदार राडा झाला.
डीएमके, एआयएडीएमके (पन्नीरसेल्वम गट) आणि इंडियन यूनियन मुस्लीम लीगच्या आमदारांनी विश्वासदर्शक ठरावासाठी गुप्त मतदानाची मागणी केली. मात्र विधानसभा अध्यक्षांनी हा प्रस्ताव फेटाळला.
यानंतर आमदारांनी विधानसभेत घोषणाबाजी करत अध्यक्षांसमोर खुर्च्यांची तोडफोड केली. कागदं फाडून फेकण्यात आले. डीएमकेच्या काही आमदारांनी विधानसभा अध्यक्षांना धक्काबुक्कीही केली. त्यानंतर गोंधळ एवढा वाढला की अध्यक्षांना विधानसभेतून बाहेर सुरक्षित बाहेर काढण्यासाठी मार्शल्सची मदत घ्यावी लागली.
इतकंच नाही तर डीएमकेच्या एका आमदाराने विधानसभा अध्यक्षांच्या खुर्चीवर बसून घोषणाबाजी केली.
प्रचंड गदारोळामुळे मतदान सध्या टाळलं असून कामकाज तीन वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं आहे. या गोंधळात जखमी झालेल्या अधिकाऱ्यांना उपचारासाठी नेण्यासाठी अॅम्बुलन्स बोलावण्यात आली होती.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement