एक्स्प्लोर

सोनिया गांधींनी इतिहास वाचावा, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा सल्ला

क्रांतिदिनाच्या 75 व्या वर्धापनदिनानिमित्त लोकसभेचं आज विशेष सत्र बोलावण्यात आलं होतं. या सत्रात काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं नाव न घेता, टीका केली. त्यावर संघानेही प्रत्युत्तर दिलं आहे. सोनिया गांधींनी आधी इतिहास वाचावा, असा सल्ला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारप्रमुख मनमोहन वैद्य यांनी दिला आहे.

लखनऊ : क्रांतिदिनाच्या 75 व्या वर्धापनदिनानिमित्त लोकसभेचं आज विशेष सत्र बोलावण्यात आलं होतं. या सत्रात काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं नाव न घेता, टीका केली. त्यावर संघानेही प्रत्युत्तर दिलं आहे. सोनिया गांधींनी आधी इतिहास वाचावा, असा सल्ला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारप्रमुख मनमोहन वैद्य यांनी दिला आहे. मनमोहन वैद्य सध्या उत्तर प्रदेशमधील गोरखपुरमध्ये आहेत. शिवाय, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे देखील तीन दिवसांच्या आपल्या मतदारसंघाच्या दौऱ्यावर आहेत. सोनिया गांधींच्या टीकेनंतर मनमोहन वैद्य यांनी एबीपी न्यूजशी बातचीत केली. यावेळी त्यांनी सोनिया गांधींवर जोरदार हल्ला चढवला. सोनिया गांधींच्या टीकेला उत्तर देताना मनमोहन वैद्य म्हणाले की, ''काँग्रेसवरचा लोकांचा विश्वास उडाला आहे. त्यामुळे पक्षाची आज दयनीय अवस्था आहे. तर दुसरीकडे संघाची ताकद दिवसेंदिवस वाढत आहे.'' देशाला स्वातंत्र्य एका कुटुंबामुळे मिळालं नसल्याचं सांगून वैद्य पुढे म्हणाले की, ''संघ संस्थापक केशव बळीराम हेडगेवार यांनी स्वत: असहकार आंदोलनात सहभागी होऊन, तुरुंगवास भोगला. याशिवाय हजारो स्वयंसेवकांनी देशासाठी बलिदान दिलं आहे. 1934 मध्ये स्वत: महात्मा गांधींनी वर्ध्यातील संघाच्या शिबीराला भेट दिली होती.'' ''देशात अशा काही संघटना आहेत, ज्यांचा देशाच्या स्वातंत्र चळवळीत काहीही सहभाग नव्हता. त्यांनी महात्मा गांधींनी चालवलेल्या ‘चले जाव’ चळवळीलाही विरोध केला होता,” अशा शब्दांत काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर कडाडून हल्ला होता. संबंधित बातम्या देशाच्या स्वातंत्र्यात काडीचं योगदान नसणाऱ्यांचं राज्य : सोनिया गांधी  

महत्त्वाच्या बातम्या

Election Commission : 'कोणी नागरिक आहे की नाही ठरवण्याचा अधिकार ECI ला नाही'; सुप्रीम कोर्टाच्या माजी न्यायमूर्तींचा निवडणूक आयोगाच्या कामावर प्रश्नचिन्ह
'कोणी नागरिक आहे की नाही ठरवण्याचा अधिकार ECI ला नाही'; सुप्रीम कोर्टाच्या माजी न्यायमूर्तींचा निवडणूक आयोगाच्या कामावर प्रश्नचिन्ह
Smriti Irani On Rahul Gandhi : 'अमेठीत एकट्याने लढायची धमक नाही अन्...' स्मृती इराणींचा राहुल गांधींवर बोचरा वार
'अमेठीत एकट्याने लढायची धमक नाही अन्...' स्मृती इराणींचा राहुल गांधींवर बोचरा वार
Rahul Gandhi Vs Election Commission : ज्ञानेश कुमार यांचा 'निकाल' उद्याच लागणार? राहुल गांधींच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणीची शक्यता
ज्ञानेश कुमार यांचा 'निकाल' उद्याच लागणार? राहुल गांधींच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणीची शक्यता
Dhruv Rathee : आंदोलनासाठी भारतात आलेल्या ध्रुव राठीला सरकार अडकवणार? 2018 सालची फाईल उघडली, कोर्टाकडून नवीन समन्स जारी
आंदोलनासाठी भारतात आलेल्या ध्रुव राठीला सरकार अडकवणार? 2018 सालची फाईल उघडली, कोर्टाकडून नवीन समन्स जारी

व्हिडीओ

Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका
Shetitil Navdurga | Pooja Gawli | खेळाच्या मैदानातून शेतीच्या बांधावर! कॅनोइंगमध्ये पदकं जिंकली…
Shivsena Pune Election : पुणे पदवीधरची जागा भाजपला सोडल्यानं शिवसेनेत नाराजी
CJP Delhi : सीजेपीच्या दोन नेत्यांना न्यायालयीन कोठडी | Saurabh Das Ashutosh Ranka Judicial Custody
Rahul Gandhi Special Report : राहुल गांधींनी धक्का दिल्याचा महिला पत्रकाराचा आरोप; भाजपाचा हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'ते गोव्याला जाण्यापूर्वी…', नाना पाटेकरांची 'ती' शेवटची इच्छा अपूर्णच... सच्चा दोस्त गमावल्यानं मकरंद अनासपुरे भावूक, आठवणी सांगताना म्हणाले...
'ते गोव्याला जाण्यापूर्वी…', नाना पाटेकरांची 'ती' शेवटची इच्छा अपूर्णच... सच्चा दोस्त गमावल्यानं मकरंद अनासपुरे भावूक, आठवणी सांगताना म्हणाले...
Maharashtra Live blog updates: ठाणे जिल्ह्याची भविष्यातील तहान भागवणारे काळू धरण प्रकल्पावरील 10 वर्षांची स्थगिती उठवली
Maharashtra Live blog updates: ठाणे जिल्ह्याची भविष्यातील तहान भागवणारे काळू धरण प्रकल्पावरील 10 वर्षांची स्थगिती उठवली
Railway Bonus :रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज, केंद्र सरकारकडून बोनस जाहीर, प्रत्येक कर्मचाऱ्याला किती रुपये मिळणार?
रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज, केंद्र सरकारकडून बोनस जाहीर, प्रत्येक कर्मचाऱ्याला किती रुपये मिळणार?
Smriti Irani On Rahul Gandhi : 'अमेठीत एकट्याने लढायची धमक नाही अन्...' स्मृती इराणींचा राहुल गांधींवर बोचरा वार
'अमेठीत एकट्याने लढायची धमक नाही अन्...' स्मृती इराणींचा राहुल गांधींवर बोचरा वार
Rahul Gandhi Vs Election Commission : ज्ञानेश कुमार यांचा 'निकाल' उद्याच लागणार? राहुल गांधींच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणीची शक्यता
ज्ञानेश कुमार यांचा 'निकाल' उद्याच लागणार? राहुल गांधींच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणीची शक्यता
JIO IPO :जिओ प्लॅटफॉर्म्स लिमिटेड आयपीओद्वारे 27 कोटी शेअर जारी करणार, जिओचा IPO 'या' तारखेला खुला होणार
भारतातील सर्वात मोठा आयपीओ 'या' तारखेला खुला होणार, जिओच्या IPO संदर्भात मोठी अपडेट समोर
Tukaram Mundhe on Nana Patekar: नाना पाटेकर फोनवर बोललेलं 'ते' शेवटचं वाक्य आज मनाला बोचतंय, तुकाराम मुंढे शोकसभेत सर्वांदेखत भावूक झाले
नाना पाटेकर फोनवर बोललेलं 'ते' शेवटचं वाक्य आज मनाला बोचतंय, तुकाराम मुंढे शोकसभेत सर्वांदेखत भावूक झाले
मन हेलावणारी घटना, खाडीतील पाण्यात बुडून 4 मुलांचा मृत्यू; 2 दिवसापासून एकाच्या मृतदेहासाठी शोधमोहीम सुरू
मन हेलावणारी घटना, खाडीतील पाण्यात बुडून 4 मुलांचा मृत्यू; 2 दिवसापासून एकाच्या मृतदेहासाठी शोधमोहीम सुरू
Embed widget