एक्स्प्लोर

JIO IPO :जिओ प्लॅटफॉर्म्स लिमिटेड आयपीओद्वारे 27 कोटी शेअर जारी करणार, जिओचा IPO 'या' तारखेला खुला होणार

JIO IPO : रिलायन्स उद्योग समुहाच्या मालकीच्या जिओ प्लॅटफॉर्म्स लिमिटेडचा आयपीओ लवकरच बोली लावण्यासाठी खुला होईल. आयपीएच्या माध्यमातून कंपनी 27 कोटी शेअर जारी करेल.

नवी दिल्ली : मुकेश अंबानी यांच्या मालकीच्या रिलायन्स इंडस्ट्रीजची टेलिकॉम क्षेत्रातील कंपनी जिओ प्लॅटफॉर्म्स लिमिटेडटच्या आयपीओचा किंमतपट्टा जाहीर झाला आहे. कंपनीनं आयपीएच्या लॉटमधील एका शेअरसाठी किंमत 1065 ते 1119 रुपये निश्चित केला आहे. या आयपीओच्या माध्यमातून जिओचे 27 कोटी शेअर जारी केले जाणार आहेत. उच्च किंमतपट्टा ग्राह्य धरल्यास जिओचा आयपीओ 30213 कोटी रुपयांचा असेल. हा भारतातील सर्वात मोठा आयपीओ ठरु शकतो. 
   
जिओ प्लॅटफॉर्म्स लिमिटेड नव्यानं 27 कोटी शेअर जारी करणार आहे. एका शेअरचं दर्शनी मूल्य 10 रुपये निश्चित करण्यात आलं आहे. आयपीओ सबस्क्राइब करण्यासाठी  21 ऑक्टोबरपासून खुला असेल तर सबस्क्रीप्शन 23 ऑक्टोबरला बंद होईल. अँकर इन्वेस्टर्स 19 ऑक्टोबरपासून बोली लावू शकतात.   
 
जिओ प्लॅटफॉर्म्सच्या आयपीओ कमिटीनं बुधवारी झालेल्या बैठकीत किंमतपट्टा निश्चित करण्यास मंजुरी दिली आहे.  जिओ प्लॅटफॉर्म्सच्या कर्मचाऱ्यांना प्रतिशेअर 54 रुपये सूट दिली आहे. जिओच्या कर्मचाऱ्यांसाठी 500 कोटींचे शेअर राखीव असतील. तर,रिलायन्स इंडस्ट्रीजच्या कर्मचाऱ्यांसाठी 2500 कोटींचे शेअर राखीव असतील. 

भारतात आतापर्यंत सर्वात मोठा आयपीओ ह्युंदाई मोटर्सचा आहे. ह्युंदाईचा आयपीओ 27859 कोटी रुपयांचा होता. तो आयपीओ 2024 मध्ये आला होता. तर, एलआयसीचा आयपीओ 20557.23 कोटी रुपयांचा होता. आता जिओचा आयपीओ भारतातील सर्वात मोठा आयपीओ ठरु शकतो. आयपीओचं लिस्टींग कसं आणि कधी होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. 

विशेष बाब म्हणजे ह्युंदाई मोटर्स इंडिया आमि एलआयसीचे आयपीओ ऑफर फॉर सेलचे होते. जिओ प्लॅटफॉर्म्स लिमिटेडचा आयपीओ नव्यानं शेअर जारी करणार आहे. यामुळं आयपीओतून उभी राहणारी रक्कम थेट कंपनीकडे जाईल, ती शेअरधारकांकडे जाणार नाही. 
  
जिओ प्लॅटफॉर्म्सच्या आयपीओच्या एका लॉटमध्ये 12 शेअर असतील. उच्च किंमतपट्ट्यानुसार एका लॉटसाठी 13428 रुपयांची बोली लावावी लागेल. हा आयपीओ 28 ऑक्टोबरला लिस्ट होण्याची शक्यता आहे. 

(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)  

युवराज जाधव एबीपी माझाच्या डिजीटल टीममध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत आहेत. डिजीटल पत्रकारिता क्षेत्रात त्यांच्याकडे ८ वर्षांचा अनुभव आहे. एबीपी माझासोबत ते मार्च 2024 पासून कार्यरत आहेत. आपल्या कारकीर्दीत त्यांनी महाराष्ट्रातील अग्रगण्य वृत्तसंस्थांसोबत काम केले आहे. यामध्ये महाराष्ट्र टाइम्स, टीव्ही ९ मराठी, ईटीव्ही भारत या नामांकित संस्थांचा समावेश आहे.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संज्ञापन आणि पत्रकारिता विभागातून (रानडे इन्स्टिट्यूट) मधून त्यांनी पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केले आहे. त्यानंतर त्यांनी डिजीटल पत्रकारिता क्षेत्रात कामाला सुरुवात केली. युवराज जाधव सातारा जिल्ह्यातील असून स्थानिक स्वराज संस्थाचं राजकारण ते राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरील घडामोडींबाबत लेखन करतात. याशिवाय,आंतराराष्ट्रीय घडामोडी, शिक्षण, क्रीडा क्षेत्रातील घडामोडींसह ते गाव खेड्यातल्या शेती क्षेत्रातल्या बातम्यांवर काम करतात.

 
Read More
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

अकलूजच्या घोडेबाजाराला दुष्काळाची झळ; 51 लाखांचा सिकंदर, 25 लाखांचे अनेक घोडे, पण चारा-पाण्याचा प्रश्न कायम
अकलूजच्या घोडेबाजाराला दुष्काळाची झळ; 51 लाखांचा सिकंदर, 25 लाखांचे अनेक घोडे, पण चारा-पाण्याचा प्रश्न कायम
Gold Rate : सोने आणि चांदीच्या दरात मोठी घसरण, IBJA कडून दर जाहीर, डिसेंबरमध्ये सोनं दीड लाखांचा टप्पा पार करणार, तज्ज्ञांचा अंदाज
सोने आणि चांदीच्या दरात मोठी घसरण, चांदी 3901 रुपयांनी स्वस्त, IBJA कडून दर जाहीर
केंद्र सरकारचा मोठा निर्णय, रब्बी हंगामातील खतांसाठी 62370 कोटींचं अनुदान मंजूर, मुद्रा योजनेसाठी 5000 कोटींना मंजुरी
केंद्र सरकारचा मोठा निर्णय, रब्बी हंगामातील खतांसाठी 62370 कोटींचं अनुदान मंजूर
RBI चा नवीन नियम माहित आहे का? आता बँक खाते नसतानाही तुम्ही पैसे मिळवू शकता, जाणून घ्या सविस्तर माहिती 
RBI चा नवीन नियम माहित आहे का? आता बँक खाते नसतानाही तुम्ही पैसे मिळवू शकता, जाणून घ्या सविस्तर माहिती 
Advertisement

व्हिडीओ

Hasan Mushrif PC Kolhapur : संजय राऊतांनी आमच्यापक्षात नाक खुपसू नये, हसन मुश्रीफांचा इशारा
NCP Crisis : शरद पवारांच्या राष्ट्रवादीत विलीनीकरणावरून चार वेगवेगळे मतप्रवाह
Omraje Nimbalkar call : आमच्या गावचा रस्ता कधी करता ? खासदार ओमराजेंना चिमुकल्याचा थेट सवाल
Ravindra Dhangekar on Chandrakant Patil:Satej Patil यांच्यावरील टीकेला उत्तर,चंद्रकांत पाटलांवर टीका
Majha Katta Mrudula Dadhe EP 1 : अजरामर गाण्यांमागच्या अफलातून गोष्टी, मृदुला दाढेंसोबत शब्दसुरांची मैफल
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nvidia :  एनवीडियाचे सीईओ जेनसेन हुआंग यांचा राजीनामा, चिनी महिलेसोबतचं प्रेमप्रकरण भोवलं, जेनसेन हुआंगच्या अडचणीत वाढ
एनवीडियाचे सीईओ जेनसेन हुआंग यांचा राजीनामा, चिनी महिलेसोबतचं प्रेमप्रकरण भोवलं
Nagpur Hotel Fire : नागपूरमधील अनंततारा हॉटेलला आग, शॉर्ट सर्किटनं आग लागली, एका व्यक्तीचा मृत्यू, तीन जण जखमी
नागपूरमधील अनंततारा हॉटेलला आग, शॉर्ट सर्किटनं आग लागली, एका व्यक्तीचा मृत्यू, तीन जण जखमी
NCP Merger : माझा भाऊ गेला तेव्हाच माझ्यासाठी तो विषय संपला,सुप्रिया सुळे यांचं राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चांवर भाष्य
माझा भाऊ गेला तेव्हाच माझ्यासाठी तो विषय संपला, सुप्रिया सुळेंचं विलिनीकरणावर स्पष्ट मत
दोन्ही राष्ट्रवादीने एकत्र यायचं ठरलं होतं, 18 जानेवारीला बैठक झालेली; विलिनीकरणाबाबत हर्षवर्धन पाटलांनी सगळं सांगितलं
दोन्ही राष्ट्रवादीने एकत्र यायचं ठरलं होतं, 18 जानेवारीला बैठक झालेली; विलिनीकरणाबाबत हर्षवर्धन पाटलांनी सगळं सांगितलं
Gold Rate : सोने आणि चांदीच्या दरात मोठी घसरण, IBJA कडून दर जाहीर, डिसेंबरमध्ये सोनं दीड लाखांचा टप्पा पार करणार, तज्ज्ञांचा अंदाज
सोने आणि चांदीच्या दरात मोठी घसरण, चांदी 3901 रुपयांनी स्वस्त, IBJA कडून दर जाहीर
तहसील कार्यालयात अस्वच्छता, मंत्री गिरीश महाजनांच्या हाती झाडू; दारुच्या रिकाम्या बाटल्या पाहून संताप
तहसील कार्यालयात अस्वच्छता, मंत्री गिरीश महाजनांच्या हाती झाडू; दारुच्या रिकाम्या बाटल्या पाहून संताप
मेकअप आर्टिस्टच्या घरातील पोटमाळ्यावर कोकेनचा साठा; साथीदारालाही अटक, 21 कोटींचे ड्रग्ज जप्त
मेकअप आर्टिस्टच्या घरातील पोटमाळ्यावर कोकेनचा साठा; साथीदारालाही अटक, 21 कोटींचे ड्रग्ज जप्त
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 नोव्हेंबर 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 नोव्हेंबर 2026 | गुरुवार
Embed widget